Thursday, July 12, 2012

मेरिट कशाला म्हणायचे?

       आरक्षण चर्चा काही निरिक्षणे: राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्यायासाठी आंतरजातीय विवाह, धर्मचिकित्सा, आर्थिक फ़ेरवाटप, स्त्रीपुरुष समता, आरक्षण,साधनसंपत्तीचे समान वाटप,सर्वांना समान संधी हे टप्पे अनिवार्य आहेत.

      १.आरक्षण हा विषय अतिशय संवेदनशिल आहे.काही तासात किती मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, होतेय. याचा अर्थ मिडीयाच्या भाषेत बोलायचे तर हा खुप टीआरपी खेचणारा विषय आहे.
     २.माणसे भरभरुन मते व्यक्त करतात, हे निश्चितच स्वागतार्ह आहे.सर्वांना धन्यवाद.
     ३.काही गंमतीदार मुद्देही पुढे आले.ज्यांना स्वताला आरक्षण हवे आहे, त्यांची "आमची जात ओबीसीत घाला" अशी मागणी आहे, तेही आरक्षणाला विरोध करण्यात पुढे असावेत?ही दांभिकता कधी जाणार?
     ४.काहींचा आरक्षणाला विरोधही आहे, आणि त्याचवेळी त्यांना आर्थिक आधारावर आरक्षणही हवे आहे, हा दुटप्पीपणा का?
     ५.काही कांगावाबहाद्दर आजोबाची शिक्षा नातवाला का वगैरे ?विषयांतर करीत आहेत, किंवा मुळ हेतुला बगल देत आहेत.
     ६.शिक्षेचा सवालच नाही. ओपणवाले मुळात लो्कसंख्येत किती आहेत? अ. जा. अ.ज.+ओबीसी +विजाभज +विमाप्र= ८० टक्के होतात. त्यांना सर्वांना मिळुन आरक्षण किती?५० टक्के. उर्वरित २० टक्केंना जागा किती? ५० टक्के. कुठेय शिक्षा? सर्वांचा १०० टक्के वाटा एकट्याने खायची सवय जडल्याने हा २०टक्के ओपणवाल्यांना अन्याय वाटतोय.या देशाच्या साधनसंपत्तीत सर्वांचा वाटा नाही काय?
    ७.मेरिट कशाला म्हणायचे? फक्त मार्क्स म्हणजे मेरिट? ते कसे मिळाले? त्यांची अनुकुल प्रतिकुल परिस्थिती बघायची नाही?सुशिक्षित पालक, उत्तम शिक्षक, दर्जेदार शाळा,नामवंत क्लासेस,अभ्यासाच्या सोयी,साहित्य,यांच्यामुळे मार्क्स वाढतात, उलटी स्थिती असेल तर कमी होतात, हे बघायला नको?
    ८.गुणवत्ता=उपजत प्रतिभा+अनुकुल परिस्थिती+परिश्रम+संधी.......
    ९.पिढ्यांनपिढ्या संधी नाकारली गेल्याने अनेक मागासांच्या गुणवत्तेला देश मुकला हे का दिसत नाही?
    १०. मागासांमधली अपवादात्मक उदाहरणे{शहरी, नवश्रीमंत, सुस्थितीतील, २ किंवा ३ पिढ्यातील}घेवुन सामाजिक अन्यायाकडुन लक्ष दुसरीकडे वळवायचे टेक्निक जुने झालेय. काही नवे आक्षेप तरी शोधावेत, प्रतिभावंतांकडे एव्हढा दुष्काळ ?
     ११.आरक्षण पालीसीत काही दोष आहेत, हे आम्ही नाकारलेलेच नाही.जरुर दोष दाखवा,विधायक चर्चा करा, पर्याय सुचवा.स्वागतच आहे.

2 comments:

  1. Shubham Shrotri आरक्षण हे हिंदू एकतेला लागलेला सुरुंग आहे..आरक्षणाचे दुष्परिणाम सांगायचे झाले तर ते काही प्रमाणात पुढीलप्रमाणे सांगता येतील
    १) एक दोन महिन्यापूर्वीच्या news paper मध्ये एक बातमी अशी वाचण्यात आली कि IIT delhi येथील २ विद्यार्थ्यानी आत्महत्या केली आणि ते दोघेही obc होते...या आत्महत्येला त्यांनी non co operative professors न कारणीभूत मानले आहे..पण खोलवर विचार केला तर याचे कारण वेगळेच दिसून येते...IIT संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी jee नावाची एक कठीण परीक्षा द्यावी लागते..या परीक्षेत 400 पैकी साधारण 150 मार्कांच्यापुढे marks मिळवल्यास ओपेन catagory मधल्या मुलांना IIT मध्ये प्रवेश मिळतो पण हाच cut off obc साठी ९० पर्यंत घसरतो..आता मला सांगा ज्या विद्यार्थ्याला ९० marks मिळाले आहेत त्या विध्यार्थ्याची बौद्धिक क्षमता हि नक्कीच १५० मार्क्स मिलाव्नार्यापेक्षा कमी आहे..पण तरीही ९० मार्क्स मिळवणाऱ्या विध्यार्थ्याला १५० मार्क्स मिळवणाऱ्या vidhyarthyabarobar प्रवेश dila जातो...त्याला मोठ mothya packages chi swapna dakhvali jatat...पण मूलतः तो विध्यार्थी कुठेतरी कमी आहे...प्रवेश घेतल्यावर त्याला आणि १५० मार्क्स मिळवणाऱ्या विध्यार्थ्याला same treatment दिली जाते...पण तेवढी बौद्धिक तयारी झाली नसल्याने(करणे काहीही असोत) तो विध्यार्थी मागे पडतो..आपण आपल्या आई बाबांची स्वप्ने पूर्ण करण्यात अपयशी पडणार अश भीती त्याला वाटू लागते आणि मग तो आत्महत्येचा पर्याय स्वीकारतो..हे AIMS आणि IIT सारख्या संस्थांमध्ये सतत होते आता या आत्महत्यांना जबाबदार कोण? तर चुकीची यंत्रणा system म्हणजेच आरक्षण...आरक्षणामुळे अशा अनेक दलित विध्यार्थ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या..राजकारण्यांच्या गलीच्च राजकारणामुळे.....हि आरक्षणाची काळी बाजू आपण समजून घेतली पाहिजे..
    २)जर जातींमध्ये काहीच फरक नाही तर जातीनुसार आरक्षण का म्हणून? नव्या युगात पैसा हीच जात झाली आहे...गरीब ब्राह्मणाकडे जर मुबलक पैसे नसतील तर शिक्षणाच्या क्षेत्रात तो अस्पृश्य आहे आणि एखाद्या shrimant obc kade पैसे astil तर तो savarna ch आहे....arthik आरक्षण aanale तर potat dukhnyache काय कारण?? अशा aarakshananusar गरीब obc न सुधा फायदा आहे आणि गरीब ब्राह्मनासुधा फायदा आहे..माझ्या ओळखीत असे अनेक obc आहेत जे महिन्याला २ लाखापर्यंत सहज कमावतात..अशा लोकांना आरक्षण द्यायची काय गरज?? ते मागास आहेत का?
    ३) आरक्षण हि कल्पनाच थोडी बदलायची गरज आहे...तुमच्यासाठी एवढ्या जागा रिक्त राहतील हे चुकीचे आहे...याने अभ्यास करण्याला प्रोत्चाहन मिळत नाही...उलट गरीब विध्यार्थी जर sincere असेल तर त्याला अभ्यास करण्यासाठी पाहिजे ती मदत दिली गेली पाहिजे..उदा. संपूर्ण फी माफ...पण मार्कांमध्ये compramise करता कामा नये..तुला कमी मार्क्स मिळाले तरी प्रवेश सहज मिळेल त्यामुळे तू अभ्यास कमी केलास तरी चालेल असे शिकवणे दाखवून देणे चुकीचे आहे कि जे आरक्षणामुळे होत आहे...
    22 hours ago · Like · 1{FROM: FACEBOOK}

    ReplyDelete
  2. सर, तुमच्या ह्या लेखाची लिंक कोहम मोहक ने त्यांच्या ब्लॉग वर दिली आहे.तुम्ही लिहिता

    //शिक्षेचा सवालच नाही. ओपणवाले मुळात लो्कसंख्येत किती आहेत? अ. जा. अ.ज.+ओबीसी +विजाभज +विमाप्र= ८० टक्के होतात. त्यांना सर्वांना मिळुन आरक्षण किती?५० टक्के. उर्वरित २० टक्केंना जागा किती? ५० टक्के. कुठेय शिक्षा? सर्वांचा १०० टक्के वाटा एकट्याने खायची सवय जडल्याने हा २०टक्के ओपणवाल्यांना अन्याय वाटतोय.या देशाच्या साधनसंपत्तीत सर्वांचा वाटा नाही काय??//

    हा मुद्दा पटत नाही.ज्या २०% लोकांना तुम्ही ५०% आरक्षण म्हणत आहात त्या ५०% लोकांमध्ये आरक्षित समाज ही येतो.म्हणजे आरक्षित समाजाला आधिचे ५०% आरक्षण आहेच व उरलेल्या अनारक्षित जागा ही ते घेऊ शकतात.असा दुहेरी फ़ायदा आहे.मग नुकसान तर अनारक्षित वर्गाचेच आहे न? आज ज्या प्रकारे स्पर्धा वाढली आहे त्या साठी आरक्षणाला विरोध करण्या वाचुन आमच्या कडे काय पर्याय आहे?माझे काही चुकले असल्यास अवश्य दाखवावे. तुमच्या कडुन उत्तराची अपेक्षा ठेवतो.....

    ReplyDelete