ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले १८४८ साली शाळेत शिकवायला जात असताना पुण्यातील काही "द्विज" समाजकंटक आणि सनातनी त्यांच्या अंगावर चिखल, शेण,दगड मारीत असत. २०१२ साली त्याच पुण्यातील एक तथाकथित "विद्वान" जोतीरावांच्या व सावित्रीबाईंच्या बदनामीचे लेखन करताना आढळुन आले आहेत.मात्र त्यांनी चतुराईने आपण "सत्यशोधक" नाटकाचे लेखक,श्री.गोपु देशपांडे,दिग्दर्शक ,अतुल पेठे आणि सावित्रीबाईंची भुमिका करणारी अभिनेत्री, पर्ण पेठे यांच्यावर हल्ला करीत आहोत अशी बतावणी केलेली आहे.{"गोभट्टविरचित सत्यशोधक: ऎसा जोती होणे नाही", अन्वीक्षण,एप्रिल-जुन} हे तिघेही जन्माने ब्राह्मण असल्याने त्यांच्यावरच्या या हल्ल्याने काहीजण गोंधळात पडले आहेत तर काहीजण खुष झाले आहेत.फुले-आंबेडकरी चळवळीत ब्राह्मणांना शिव्या बसत असतील तर अतिव समाधान वाटणारेही काही लोक आहेत. या लेखात ५०-६० ईंग्रजी पुस्तकातील अवतरणांचा बेफाम मारा करुन आपण फुल्यांवरील एकमेव अधिकारी विद्वान असल्याचा उत्तम भास निर्माण करण्यात आला आहे.अत्यंत थंड डोक्याने "संतप्तपणाची पोज" घेत हे तुफान उन्मादी लेखण करन्यात आलेले आहे.सदर गृहस्थ आपण फुल्यांच्या बाजुचे आहोत असे ओरडून सांगत असल्याने सुखावलेल्या मंडळींना मी सांगु ईच्छितो की हे लेखन फुल्यांचा अवमान क्रणारे आहे. त्याबाबतचे पुरावे मांडण्यासाठी हा लेख.
"सुनियोजित जातीय आणि धार्मिक दंगली घडवुन सर्व ब्राहमण पुरुषांची कत्तल करण्याची" चिथावणी देणारी "शिवरायांच्या बदनामीची केंद्रे"ही पुस्तिका लिहिणारे मराठा सेवा संघाचे श्री. पुरुषोत्तम खेडेकर यांचे किंवा मराठा महासंघाचे पुण्याचे अध्यक्ष श्री.शांताराम कुंजीर यांचे हे लेखण असावे असेच मला ते वाचताना वाटत होते. परंतु हे आकसपुर्ण लेखन करणारे स्कालर आहेत प्रा. विजय कुंजीर! अर्थात या तिघांच्या लेखनात गुणात्मक फरक फारसा नाही. कुंजीरांनी फुले पतीपत्नीवर लिहिण्यासाठी त्यांचे दोघांचे समग्र साहित्य आणि त्यांची अद्ययावत चरित्रे तरी किमान वाचलेली असावीत अशी माझी या विषयाचा एक विद्यार्थी म्हणुन अपेक्षा होती.कुंजीरांनी हि पुस्तके वाचलेली नाहीत.कुंजीरांनी फुल्यांची म्हणुन दिलेली बारिकसारिक माहितीही निराधार आणि नकली आहे.कुंजीरांची भाषा शिवराळ आणि अभिनीवेषपुर्ण आहेच परंतु त्यांची तात्विक मांडणीही पुरुषी,सरंजामी आणि सत्ताधा-यांचे हितसंबंध जोपासणारी "फुलेविरोधी" मांडणी आहे. "भट’,’बामण’,ब्राह्मण्यावरची" त्यांची टिका अनुषंगिक आहे.मुळात फुल्यांची बदनामी करण्यासाठी वापरलेला तो एक धूर्त डावपेच आहे.
फुलेवादी असणे म्हणजे दररोज त्यांच्या फोटो किंवा पुतळयाची पुजा करणे किंवा चढ्या सुरात आरत्या गाणे नव्हे. "स्त्री-पुरुष समता,जातीनिर्मुलन,ज्ञाननिर्मिती,चिकित्सा आणि संसाधनांचे फेरवाटप" हा फुलेविचारांचा गाभा आहे.कुंजीरांचे लेखन याला पोषक असेल तर ते फुलेवादी आणि ते त्याला घातक असेल तर ते फुलेविरोधी ठरवावे लागते.कुंजीर म्हणतात "हे नाटक फुकट होते म्हणुन मी पाहिले.हे नाटक पेशव्यांच्या शनिवारवाड्यापुढे करण्याला कुंजीरांचा तात्विक विरोध होता.मग ते हा प्रयोग बघायला का गेले?तर तो फुकट होता म्हणुन.याचा अर्थ पैसे वाचणार असतील तर त्यांची तत्वे गुंडाळुन ठेवायची तयारी असते याची कबुलीच ते देतात.मला हे नाटक शनिवारवाड्यापुढे करण्यात काहीही गैर वाटत नाही.ज्याकारणाने बाबासाहेब आंबेडकर महोत्सव शनिवारवाड्यासमोर करण्याला प्रतिकात्मक अर्थ आहे,त्याच कारणाने ’सत्यशोधक’ तेथे करणे आवश्यक होते.
कुंजीरांनी आपल्या लेखात ब्राह्मण स्रियांबद्दल तुच्छतेची भाषा वापरलेली आहे. स्त्रीयांविषयीची ही घृणास्पद विचारधारा फुले-आंबेडकरवादात बसते काय? "सत्यशोधक" या नाटकात सावित्रीबाईंची भुमिका अत्यंत तळमळीने साकारणा-या पर्ण पेठे यांच्याविषयी कुंजीर म्हणतात,"जोतीराव नाटकभर एका अल्लड शालेय कन्येसम सावित्रीबाईबरोबर संसार करत होते.फुले दुटप्पी वाटतात इतके ते सावित्रीबाईंचे पात्र मुल आहे.एकुण फेन्सी ड्रेस करुन शाळेतल्या वार्षिक स्नेहसंमेलनात फिरत असल्यागत सावित्रीबाई वावरते.इतके पोचट पात्र आहे सावित्रीबाईंचे." आजवर देशभरातल्या ४० हजारांपेक्षा जास्त लोकांनी "तिकीट" काढुन हे नाटक बघितलेले आहे.त्यात फुल्यांवरील अनेक अधिकारी विद्वान,जाणते रंगकर्मी, सामाजिक चळवळींचे नेते,कार्यकर्ते,आणि सामान्य नागरिक यांचा समावेश होता. दुषित पुर्वग्रहांनी माथेफिरु बनलेल्या "फुकट्या" कुंजीरांचा एकमेव अपवाद वगळता माझ्यासह सर्व प्रेक्षकांना पर्णचा अभिनय आवडलेला आहे. कुंजीरांचे फुले साहित्य, चरित्र, भाषा, समाजव्यवहार आणि नाट्यव्यवहार यांचे आकलन शाळकरी असल्याने त्यांनी शाळकरी उपमा दिलेली आहे.पेठेंनी आपल्या मुलीलाच सावित्रीबाईंच्या भुमिकेसाठी का घेतले?हा त्यांचा आक्षेप आहे. मी या नाटकाच्या निर्मितीप्रक्रियेत सुरुवातीपासुन आहे. सर्वप्रथम पेठेंनी या रोलसाठी बहुजन समाजातील अभिनेत्रींचीच निवड केलेली होती.माझ्या परिचयाच्या अशा तिघीजणींना त्यांच्या व्यक्तीगत अडचणींमुळे तालमी केल्यानंतरही नाटक सोडावे लागले.शेवटी प्रयोगाचा दिवस जवळ येवुन ठेपल्यानंतर पर्णने स्वता:हुन ही भुमिका मी करीन पण नाटक झालेच पाहिजे असे कर्तव्यबुद्धीने सांगितले.भगवान बुद्ध म्हणतात, कृतज्ञता ही सत्पुरुष भुमी आहे.कुंजीरांसारख्या ज्या लोकांचा कृतज्ञताबुद्धीशी परिचयच झालेला नसतो अशांच्या सरंजामी मानसिकतेला ही तळमळ समजणारच नाही.त्यामुळे ते असलेच गरळ ओकणार. या नाटकाची निर्मिती करणारी पुणे मनपा कामगार युनियन सफाई कामगारांसाठी अनेक वर्षे झटत आहे.ज्या लोकांनी आयुष्यात कधीही नाटकात काम केलेले नव्हते अशांना आठआठ महिने अहोरात्र राबुन पेठेंनी रंगमंचावर समर्थपणे व सफाईने उभे केले.गोविंदराव फुले,शाहीर,लोखंडे,शेटीबा फुले अशा अनेक उत्तम भुमिका करवुन घेतल्या.कुंजीरांचा आक्षेप आहे की पेठेंनी भरतमुनींच्या नाट्यशास्त्रानुसार मुख्य रोल उच्च वर्णियांना दिलेत आणि दुय्यम रोल बहुजनांना.एकतर हे खरे नाही आणि भरताच्या नाट्यशास्त्राची साक्ष काढुन कुंजीरांनी आपले अडाणीपणच उघडे केलेय. नाटकात भुमिका करणे हे कायम निम्न जातींचे काम मानले गेलेय.त्यात सगळेच रोल मग ते प्रमुख असोत कि दुय्यम शुद्र-अतिशुद्रच करत आलेत हे कुंजीरांच्या गावीच नाही. या नाटकातील संवादांवर कुंजीरांचा प्रमुख आक्षेप आहे. तो बरोबर असावा असे प्रथमदर्शनी काहींना वाटतेही.त्यांचा दावा आहे की, सावित्रीबाई, "व्रत", "प्रकृती" असले ब्राह्मणी आणि सावरकरी शब्द वापरुच शकत नाहीत. त्यावरुन ते थेठ गोपुंची जात काढुन गोपुंनी हे नाटक फुल्यांची बदनामी करण्यासाठीच लिहिल्याचा आरोप करतात.पण त्याआधी कुंजीरांनी जोतीराव-सावित्रीबाईंच्या भाषाशैलीचा काडीमात्रही अभ्यास केलेला नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या साहित्यात त्यांनी अनेकदा "व्रत","प्रकृती" हे शब्द वापरलेले आहेत..{पाहा:महात्मा फुले समग्र वांग्मय, पृ.२६७,६३२ आणि सावित्रीबाई फुले समग्र वांग्मय,पृ.८, ९९} कुंजीरांच्या मते गोपुंची ही भाषा सावरकरी आहे, ब्राह्मणी आहे.पण प्रत्यक्षात ही भाषा फु्ल्यांची असल्याने तेच कुंजीरनितीनुसार सावरकरी आणि ब्राह्मणी ठरतात.हा फुल्यांचा अवमान नाही?
या नाटकाद्वारे मुख्य प्रवाहामध्ये फुल्यांना पोचविण्यासाठी प्रतिभावंत दिग्दर्शक अतुल पेठे यांनी आपल्या आयुष्यातील एक वर्ष स्वत:च्या खिशाला खार लावुन विनामुल्य काम केले.म्हणुन कामगार युनियनने कृतज्ञतेपोटी काही रक्कम पेठ्यांना प्रवासखर्चासाठी दिली. तीही त्यांनी सफाई कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तिथल्यातिथे देणगी म्हणुन देवुन टाकली. ही "दानत" "शोषक" सरंजामदारांना कशी समजणार? या "फुकट्यांचा" अपराधभाव मग जागा झाला. एकीकडे अजाअज,इमावच्या आरक्षणाला संपुर्ण विरोध करणारी आणि त्याच वेळी आम्हालाही इमावमध्ये आरक्षण द्या म्हणणारी ही सत्ताधारी मानसिकता असल्याने कांगावा करुन "दलितांना आरक्षणाऎवजी खाजगी धर्मादाय मार्गाने हे ब्राह्मण शिकवु पाह्तायत" अशा ते चोराच्या उलट्या बोंबा मारतात.महाराष्ट्रातील सत्ताधारी आज अजाअज. इमाव,विजाभज चे शिक्षण बंद करीत आहेत हे आता झाकुन राहिलेले नाही.तेव्हा हा कांगावा शोभत नाही.
कुंजीरांचा आरोप आहे की, भांडारकर प्रकरणामुळे मराठा जातीयवादाला उत्तर म्हणुन पेठ्यांनी हे नाटक बसवले. प्रयोगात पुढे मराठ्यांबद्दलचे ९६ कुळी ,पंचकुळी हे उल्लेख गाळल्याबद्दल हेच कुंजीर तक्रारही करतात.जर यातुन पेठेंना मराठा जातीयवादाला उत्तरच द्यायचे असते तर हे उल्लेख गाळण्याऎवजी त्यांनी ते अधिक ठळक केले असते.पण तर्कहीन पद्धतीने कुंजीर दोन्हीबाजुंनी बोलत राहतात. दुतोंडी वाचाळपणा करीत पाल्हाळ लावित जातात. त्यांचा आरोप आहे की "हे नाटक ब्राह्मणांना मोठेपणा देण्यासाठीच लिहिलेले आहे,यात लोखंड्यांनी केलेला टिळक-आगरकरांचा सत्कार ही अनैतिहासिक घटना दाखवण्यात आली ती त्याच हेतुने." खरी गोष्ट अशीय की टिळक-आगरकरांना ते तुरुंगात असताना फुले दहा हजार रुपयांचा जामीन द्यायला गेले होते, तुरुंगातुन सुटल्यावर त्यांचा सत्कार फुल्यांनीच घडवुन आणला होता.पण हे कुंजीरांना माहित नसल्याने ते तो प्रसंगच काल्पनिक ठरवुन मोकळे झाले.
कुंजीर असेही सुचवतात की, " फुले द्रष्टे नव्हतेच, फुल्यांना संस्कृतचा गंधही नव्हता,ते संस्कृतचे विरोधक होते, फुल्यांना ईतिहासकरणाची जाण नव्हती,फुल्यांना खरी राष्ट्रभक्ती कळलीच नव्हती, फुल्यांचे ’महा्त्मेपण’ जे काही होते ते केवळ ख्रिस्ती मिशन-यांमुळेच होते,ते ब्राह्मणद्वेष्टे होते,ते हिंदु हा शब्द वापरतच नसत." कुंजीरांचे हे सारेच आरोप निराधार आणि अडाणीपणाचे आहेत. जोतीरावांची बदनामी करण्यासाठीच कुंजीरांनी हे आरोप केलेले आहेत.
फुल्यांच्या लेखनात "हिंदु" हा शब्द अनेकदा आलाय.{पाहा:म.फु.स.वा.,पृ.१९७,३३६,३४९,३६३,३६५,४१९} सावित्रीबाईंनी तर या धार्मिक भेदभावावर कवितेतुन प्रश्नही उपस्थित केलेला आहे.{सा.फु.स.वा.पृ.८३-८७} सावित्रीबाई आणि जोतीरावांनी आपल्या लेखनात असंख्य संस्कृत श्लोक पान नंबरसकट उद्धृत केलेले आहेत.जोतीरावांना संस्कृत भाषेची आवड होती.ते संस्कृत ग्रंथांचे नियमित वाचक होते.त्यांनी पाठक गुरुजींची खाजगी शिकवणी लावुन संस्कृतचा व्यासंग केलेला होता.{पाहा:आम्ही पाहिलेले फुले,पृ.६१ आणि म.फु. स.वा.पृ.२६४} "इतिहास" आणि "नेशन{राष्ट्र"}विषयक जोतीरावांची मांडणी वाचली की कुंजीरांच्या याबाबतच्या अज्ञानाची किव येते.{स.वा.पृ.२६५,५२३, आणि सा.फु.स.वा.४५-५०} महात्मा फुल्यांच्या जडणघडणीत बुद्ध,अश्वघोष, येशु,प्रेषित महंमद पैगंबर, कबीर, तुकाराम, टामस पेन आणि मिशनरी अशा अनेकांचा वाटा होता.त्यांच्या प्रतिभेचे आणि द्रष्टेपणाचे सारे श्रेय केवळ मिशन-यांना देणे हा फुल्यांचा अवमानच होय.मिशन-यांनी दिलेले शिक्षण जरी महत्वाचे असले तरी ते इतरही अनेकांना मिळाले होते मग ते का नाही फुले बनू शकले? "आपल्याला बालपणीच्या मुस्लीम मित्रांच्या संगतीमुळे हिन्दुधर्माविषयी व जातीभेदाविषयी प्रश्न पडु लागले" असे फुले स्वत:च आवर्जुन नमुद करतात.{म.फु.स.वा.पृ.३३६} पण हे काहीही कुंजीरांनी वाचलेले नाही.
कुंजीरांनी वारकरी संप्रदायाबद्दल अत्यंत उथळ मांडणी केलीय.बहुजनांच्या जिव्हाळ्याचा हा विषय एव्हढ्या सवंगपणे हाताळण्याचा विषय नाही.त्यात फार मोठी सामाजिक गुंतागुंत आहे.फुले स्वत: देहु-आळंदीला वारीच्या काळात व्याख्यानांसाठी जात असत.{आ.पा.फु.पृ.७४-७५} सत्यशोधक समाजाचे बहुतेक सर्व सभासद वारकरी होते.फुल्यांनी केलेली सत्यधर्माची स्थापनाच मुलत: बुद्ध-अश्वघोष,कबीर,तुकारामादींच्या विचारांवर आधारित होती. लोकांपासुन फटकुन राहण्यालाच क्रांतीकारकत्व मानणारे कुंजीरांसारखे लोक विक्षिप्त {सिनिकल} असतात!
कुंजीरांनी मराठी रंगभुमीविषयी अत्यंत गलिच्छ भाषा वापरलेली आहे.नाटकाच्या निमित्ताने खुलेआम "संभोग" करता यावा यासाठी नाटक केले जाते ही त्यांची मांडणी संतापजनक आहे. मराठीतले पहिले आधुनिक नाटक १८५४ साली जोतीरावांनी लिहिलेले आहे. त्याचे नाव "तृतीय रत्न" असे आहे.जोतीरावांना संस्कृतचा द्वेष वाटत असता तर त्यांना त्याचे नाव "तिसरे" रत्न ठेवता आले असते. मराठी नाटक,नाटककार आणि रंगभुमी यावरील कुंजीरांची सगळी टिका कमरेखालची आणि हिडीस आहे. ही टिका आपण गोपु किंवा पेठेंवर करित असल्याचे ते भासवित असले तरी त्यांचा खरा रोख पहिले आधुनिक नाटककार महात्मा फुले यांच्यावरच आहे.
गोपुंच्या सत्यशोधकची संहिता पुस्तकरुपाने १९९६ पासुन बाजारात उपलब्ध आहे.मग त्यावर हल्ला करण्यासाठी कुंजीर एव्हढी वर्षे का थांबले होते? पेठेंनी बसवलेले हे नाटक गाजु लागले,त्यातुन खरे फुले लोकांपर्यंत पोचु लागले.ज्यांना फुल्यांचे अपहरण करुन सत्ताधारी वर्गाचे हितसंबंध जपायचे आहेत त्यांना बहुजनांचे लक्ष ख-या प्रश्नांकडुन विचलीत करण्यासाठी ब्राह्मणद्वेषाचे नाटक करावेच लागते. चिकित्सेचे दरवाजे कायमचे बंद करण्यासाठी हेतुपुर्वक शिवराळभाषा वापरायची,जातीय हेत्वारोप करायचे,त्यातुन ब्राह्मण-ब्राह्मणेतरांतील सामाजिक अभिसरण रोखायचे, सगळे काही जन्मावरच ठरते अशी सनातनी भुमिका घ्यायची आणि बुद्ध, फुले, आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचारांची नसबंदी करायची हे यांचे सत्ताधारी राजकारण असते.हे नाटक बघायला मोठ्या संख्येने जाणा-या बहुजन वर्गाचा बुद्धीभेद करण्यासाठी आणि त्याला नाटक पाहण्यापासुन रोखण्यासाठीच कुंजीरांनी हे लेखन केलेले आहे. ज्यांनी हे नाटक बघितलेले नाही,त्यांची माथी भडकविण्याच्या हेतुनेच कुंजीरांनी हे लेखन केलेले आहे.नाटक बघितलेले कुंजीरांशी सहमत होत नाहीत.
खरेतर कुंजीरांना गोपु,पेठे यांच्यावर साधार,संयत आणि समर्पक वैचारिक टिका करुन ही चर्चा पुढेही नेता आली असती. चर्चेने बहुजनांचे प्रबोधन होत असते.पण मग ज्ञाननिर्मितीबाबत कुंजीरांना तुच्छता पसरवता आली नसती. जातीनिर्मुलन, धर्मचिकित्सा, स्त्रीपुरुषसमता या फुले-आंबेडकरवादी विषयपत्रिकेकडे लोक वळले तर ते कुंजीरांना नको आहे.
हे नाटक मी अनेकवेळा बघितलेले आहे.ते अत्यंत श्रेष्ट दर्जाचे नाटक आहे.अतुल पेठे यांनी रंगावृती एका मोठ्या उंचीवर नेवुन ठेवलेली आहे.गोपु आणि पेठे यांना "समरसतावादी,प्रतिगामी, बामणी", म्हणणे ही कुंजीरांची चाल आहे.मी तिचा निषेध करतो.या नाटकामुळे फुल्यांचे सत्ताधा-यांकडुन होणारे "जातीय अपहरण" रोखले जात आहे.या नाटकातुन पैसे कमावणे हा पेठेंचा हेतु नाही. मोफत, अल्पदरात किंवा चेरिटी शो करुन फुले-आंबेडकरी चळवळीतील अनेक संस्थांना पेठेंनी लाखो रुपयांची मदत या नाटकातुन आजवर मिळवुन दिलेली आहे.कुंजीर ईतके लबाड आहेत की त्यांनी सफाईकामगारांचा आपल्याला कळवळा असल्याचे भासवित त्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवुन हे सारे लेखन केलेले आहे.पण प्रयोगातील त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल ब्र सुद्धा उच्चारलेला नाही. पेठे आणि गोपुंचे राहुद्या. पण ही सफाई कामगार मंडळी तर आपली होती ना?मग त्यांना दाद देण्याची तुमची दानत कुठे गेली? मुळात या वर्गाशी कुंजीरांना काहीही देणेघेणे असते तर त्यांच्या अभिनयाबद्दल त्यांनी मौन पाळले नसते.
"हे नाटक म्हणजे जोतीरावांचे समग्र चरित्र नव्हे.एका मोठ्या माणसाचे अल्पसे दर्शन घडवण्याचा त्यामागे इरादा आहे..फुले पतीपत्नीच्या गौरीशंकराएव्हढ्या कामाचे टेकेडीवजा दर्शन घडवणारा तो एक सत्यशोधक जलशा आहे"असे स्पष्ट आणि स्वच्छ निवेदन नाटकाच्या सुरुवातीलाच गोपुंनी केलेले आहे.नाट्यव्यवहार या विषयातले केवळ वर्तमानपत्री ज्ञान असल्यामुळे अडाणीपणाने या नाटकात "हे का नाही? आणि "ते का नाही?" असले बाष्कळ प्रश्न कुंजीर विचारतात. सगळ्यांची नावे असायला ही संहिता म्हणजे काही प्रस्थापितांची लग्नपत्रिका नाही की वाण्याच्या सामानाची पोतडीही नाही.आजवर फुल्यांवर शंकरराव मोरे यांच्यापासुन मिरजकरांपर्यंत अनेकांनी नाटके लिहिलेली आहेत. आपापल्यापरिने फुल्यांचा शोध त्यांनी घेतलेला आहे.यातली किती नाटके कुंजीरांनी वाचलीयत किंवा पाहिलीयत याची कल्पना नाही.कारण त्यांचे "फुकट्यांसाठीचे" प्रयोग झालेले नाहीत. नाटक फुकट असेल तरच ते बघतात ना! एक बदनामीकारक,खोटारडा,रटाळ,पाल्हाळिक आणि अत्यंत दुर्बोध लेख खरडणे आणि उत्तम नाटक लिहिणे यात फरक असतो.हजारो लोकांना विचार करायला लावणारे,अस्वस्थ करणारे,अनेकांच्या डोळ्यांतुन अश्रु काढणारे हे नाटक म्हणजे फुले-आंबेडकरी चळवळीला ताकद देणारे श्रेष्ट नाटक आहे.आम्ही "सत्यशोधकसाठी" गोपु,पेठे,कामगार युनियन आणि सर्व टीमचे कृतज्ञ आहोत. हे नाटक बंद पडावे यासाठीच कुंजीरांची ही लेखणकामाठी आहे.त्याला आपण बळी पडता कामा नये.
आजकाल रातोरात प्रसिद्ध होण्याच्या काही क्लुप्त्या पुढे आलेल्या आहेत.ख्यातनाम असलेल्या महात्मा फुले यांच्यासारख्यांची गचांडी धरायची,नळावर धरतात तशा झिंज्या धरणारे वर्दळीवरचे जातीय भांडण गोपु आणि पेठेंशी करीत असल्याचा भास निर्माण करायचा आणि राज्यात जातीय खळबळ माजवुन देत "गाजायचे" ही ट्रिक "पब्लीसिटी स्टंट" म्हणुन कुंजीर वापरित आहेत. पेठे-गोपुंना "बुकलुन" काढताना तुमचा खरा निशाना फुल्यांवर आहे हे आम्हाला कळलेय एव्हढेच आम्ही त्यांना सांगु ईच्छितो.
............................................
"फुले-आंबेडकरी चळवळीत...." महाराष्ट्राला फुले-शाहू-आंबेडकरी चळवळ माहिती आहे, ही शाहू विरहित चळवळ कुणी सुरु केली हो नरके सर?
ReplyDelete"सगळ्यांची नावे असायला ही संहिता म्हणजे काही प्रस्थापितांची लग्नपत्रिका नाही..." हे प्रस्थापित म्हणजे क्षत्रिय मराठे,क्षत्रिय माळी की क्षत्रिय धनगर याचे उत्तर मिळाले असते तर बरे झाले असते नरके सर. बाकी लेख आवडला.
...पण गोपुचे ते नाटक आणि सरंजामी कुन्जीरांची त्यवारली फुलेद्वेशी प्रतिक्रिया वाचल्याशिवाय आम्ही १०० % आपल्याशी सहमत होऊ शकत नाही. क्षमस्व.
Leena Mehendale:
ReplyDeleteखूप अभ्यासपूर्ण आणि सामाजिक सामंजस्य नष्ट करू पहाणा-यांना चोख उत्तर देणारा लेख आहे.
{ From:facebook}
Narendra Lanjewar:
ReplyDeleteI read this article. welldone !!! Salute you .....
FROM: FACEBOOK
खेडेकर किंवा कुंजीर यांचे लेखन म्हणजे एक प्रकारची विकृतीच आहे. मी खेडेकरांचे पुस्तक थोडेसे वाचले आहे सगळे पुस्तक मी वाचू शकलो नाही कारण वाचत असताना प्रत्तेक वाक्यागणीक मला मळमळू लागले होते. तीच गत कुंजीरांच्या लेखाची आहे.
ReplyDeleteदिशादर्शक
ReplyDeletejagdish more jagdishmore@gmail.com
23 Jul (2 days ago)
आदरणीय नरके सर,
तुमचा हा लेख खरोखर छान आहे. तुमचे सर्वच लिखाण छान आणि दिशा देणारे असते. अर्थात, तुम्हाला असं प्रमाणपत्र देण्याएवढी माझी लायकी नाही. पण मनापासून वाटलं म्हणून हे लिहून टाकलं. असो, पण तुमची ही भूमिका बाबासाहेबांच्या व्यंगचित्रावरील वादंगाच्या वेळीही होती. त्यामुळे आमच्यासारख्यांना नक्कीच एक विचारांची दिशा मिळते. केवळ फटकून वागणे म्हणजे क्रांतिकारी नाही किंवा केवळ ब्राह्मणद्वेष म्हणजे फुले- आंबेडकरवादी नाही. कुणाचा द्वेष करून या महापुरुषांना आपण एवढे संकुचित का करावे? यातून नवे काही साध्य होणार नाही. म्हणून तुमच्यासारख्यांनी सांगितलेले निदान काही लोकांना तरी पटेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
-जगदीश मोरे
9967836687
Reply Forward
Medha Kulkarni मेधा कुळकर्णी kulmedha@gmail.com
ReplyDelete23 Jul (2 days ago)
to Hari, me
हो. हरी, मी तो दीर्घ लेख वाचला. (त्याचं आता पुस्तकच येऊ घातलं आहे म्हणा!) मलाही त्या लेखाच्या हेतूविषयीच शंका आली. तसंच त्यांच्या तर्कशास्त्राला, तथाकथित भाष्यांना ( खरं तर शेरेबाजीला) कुठलाच ऎतिहासिक आधार नाही असंही वाटलं. पण माझा तितका अभ्यास नाही. तुझ्यासारख्या महात्मा फुले या विषयावर अधिकार असलेल्या व्यक्तीने त्या लेखाची चिकित्सा करणं योग्य आहे. खरं तर मी तो लेख मोठ्या अपेक्षेने वाचायला घेतला होता. एक चांगला डिबेट वाचायला मिळेल, माझ्या स्वतःच्या दृष्टिकोनाला नवं परिमाण मिळेल; असं मला वाटलं होतं. पण घोर निराशा झाली. आणि अशा बटबटीत खोट्या आणि द्वेषमूलक लिखाणाचं अतीव दुःख झालं. काय चाललंय हे आपल्या महाराष्ट्रात?
--
--मेधा
Medha Kulkarni
Ganesh Visputay:...{BY:messege}
ReplyDeleteअत्यंत विखारी, आणि मस्तवाल भाषेतल्या, गरळ ओकणार््या लेखाला हे सणसणीत उत्तर आहे. असहिष्णू होत चाललेल्या समकालीन समाजात अशा वादांना शिंगावर घेऊन समर्पक उत्तर द्यावे लागते. ते इथं दिलं गेलं आहे. त्याबद्दल मराठी वाचक हरी नरके यांचे ऋणी राहातील. Thank you Hari! You have done a noble work.
4 hours agoGanesh Visputay
श्रुती आणि गणेश
Sanjay Sonawani:{By Email}
ReplyDelete21 Jul (4 days ago)
to me
Haribhau,
atyant parinamakarak lekh jhalay. abhinandan.
-sanjay
कुंजीरांनी केलेली फुले बदनामी
ReplyDeleteInbox
x
Hari Narke
> मा.संपादक, > परिवर्तनाचा वाटसरु, > कृपया प्रसिद्धीसाठी.. > > कुंजीरांनी केल...
22 Jul (3 days ago)
Sagar Bhandare
23 Jul (2 days ago)
to me
हरिभाऊ,
त्या कुंजीरांची तुम्ही चांगलीच जिरवली आहे. केवळ अप्रतिम लेख.
अशा जातीयतावादी फुटीरांना त्यांची योग्य जागा दाखवून देणे गरजेचेच असते.
आणि तुमच्यासारखा खंदा विचारवंत यासाठी समर्थ आहेच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे समाजाचे ऐक्य टिकावे असे वाटणार्या ८० ते ९० % लोकांना तुम्ही एका दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत आहात.
आजच्या काळातील बहुजन समाजाबरोबरच भविष्यातील बहुजन समाज देखील यासाठी आपला कायमचा ऋणी राहीन. आणि तुम्ही दाखवलेल्या दिशेनेच वाटचाल करुन सध्या अशक्य असलेली समता प्रत्यक्षात आणेन.
आपले विचार माझ्याबरोबर वाटून घेतल्याबद्दल आपला आभारी आहे.
हा लेख छापून आल्यावर कृपया मला त्याची लिंक देखील पाठवा. माझ्या मित्रमंडळीत तुमचा हा लेख प्रसवण्याचा विचार आहे.
धन्यवाद,
- सागर
From: Hari Narke
To: Sagar Bhandare
Sent: Sunday, 22 July 2012 7:52 PM
Subject: कुंजीरांनी केलेली फुले बदनामी
Hari Narke
ReplyDeleteमा.संपादक, परिवर्तनाचा वाटसरु, कृपया प्रसिद्धीसाठी.. कुंजीरांनी केलेली फुले ब...
23 Jul (2 days ago)
Jaidev Dole:
23 Jul (2 days ago)
to me
Hari,very profound argument.hope Kunjeer will realise his mistake.On the part of Vatsaru too it was wrong to publish such an atrocious article.--jaidev
Sunil Tambe suniltambe07@gmail.com
ReplyDelete22 Jul (4 days ago)
to me
"परिवर्तनाचा वाटसरू मध्ये कुंजीर यांचा असा लेख प्रसिद्ध व्हावा ह्याचं
आश्चर्य वाटतं.
परिवर्तन हा निसर्गाचा नियम असतो. दिशा महत्वाची असते.
परिवर्तनाचा वाटसरू भलत्याच दिशेला वा धारेला लागलेला दिसतो."
सुनील तांबे...{By: email}
Yajurvendra Mahajan yajurvendra79@gmail.com
ReplyDelete22 Jul (4 days ago)
to me
"khup bhari.... asha lokancha asach samachar ghyayla hava"...{BY..:EMAIL}
Shriranjan Awate shriranjan91@gmail.com
ReplyDelete23 Jul (3 days ago)
to me
"मत्प्रिय हरी नरके सर,
सर्वप्रथम आपण मला हा लेख पाठविलात त्याबद्दल धन्यवाद.श्री.विजय कुंजीर यांचा दीर्घ लेख मी वाचला होता माझ्या मित्र वर्तुळात त्यावर चर्चाही झाली होती. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर मला सरांची शैली आणि व्यक्त झालेला ब्राम्हण द्वेष पसंत नव्हता पण मुद्दे योग्य आहेत असे वाटत होते.आपल्या लेखामुळे माझ्या अपु-या वाचनाची जाणीव मला झाली मला वाचन वाढविण्याची नितांत गरज असल्याचे ध्यानात आले. हिंदू ,प्रकृती,व्रत,पुरुषसत्ताक दृष्टीकोन,नाटक-भरत,जन्माधिष्ठित सारे काही,संयत भाषा ...इ अनुषंगाने आपण मांडलेले मुद्दे संदर्भासह (अगदी पृष्ठ क्रमांकासाहित )असल्याने बिनतोड आहेत यात शंका नाही.
दोन मुद्दे असे
१. संयत भाषेची अपेक्षा आपण कुन्जीरांकडून करत असताना "पचकन थुंकला " फुकट्या " यासारखे शब्दप्रयोग खटकतात.
२ जन्माधिष्ठित सारे काही नसते हे सांगतानाही कुन्जीराना मराठा जातीच्या दांभिकतेचा मुद्दा आपण विचारणे संयुक्तिक वाटले नाही.( लहान तोंडी मोठा घास! तरीही जे वाटले ते प्रमाणिकपणे मांडले.आपणास अप्रस्तुत वाटल्यास आपण माफ कराल ही आशां )
अर्थात लेखामुळे ब-याच वस्तुस्थितीचा उलगडा झाला.आपला व्यासंग प्रचंड आहे"
{bY:EMAIL}.
raja shirguppe rajashirguppe712@gmail.com
ReplyDelete14 Jul (12 days ago)
to me
Dear sir
Thank you for sending me your brief comment on Kunjir. Your opinion is
correct but was expected at length.ANYWAY it's ok. Your obitury to
Bapat sir is also nice one.
With regards
Raja..{by:email}
raja shirguppe rajashirguppe712@gmail.com
ReplyDelete22 Jul (4 days ago)
to me
Sir
Nice!..{BY:EMAIL}
lata jadhav latajadhav47@gmail.com
ReplyDelete22 Jul (4 days ago)
to me
आपण याबद्दल लिहिले हे फार बरे झाले. मी तो लेख वाचायला घेतला व कंटाळा आला. मला त्याच्यावर कोणाशी चर्चा करावी हेचं कळात नव्हते. आपली चर्चा पुन्हा विस्ताराने झाली पाहिजेत.
महात्मा फुलेंचे चरित्र अभ्यासताना हे पुन्हा पुन्हा अपेक्षित नाही. - लता जाधव ...{by:email}
Manisha Gupte manishagupte@gmail.com
ReplyDelete22 Jul (4 days ago)
to Pethe, Parna, Manohar, me, Bipin, biraj.patnaik, SUGAN, Brian, kamayani, BGVS, Milind, Dr, Milind, Milind, Abhay, Akash, AVEHI, cfar, Chaitanya, geetanjali, Leni, Sadhana, deepak, Deepika, energy
माननीय श्री. नरके सर,
आपण लिहिलेले उत्तर अतिशय मार्मिक आहे. धन्यवाद. आपण म्हणालात तसे फुल्यांचा शोध अनेक लोकांनी आज पर्यंत केलेला आहे. जोतीराव आणि सावित्रीबाई फुलेंवर कोणाही एकाची मक्तेदारी नाही. त्यामुळे इतर कोणाला वाटत असेल त्याप्रमाणे त्यांनी आपले नाटक लिहावे, लोकांपुढे आणावे आणि त्यावरील सिंहावलोकन किंवा चर्चा होऊ द्यावी.
अतुल पेठेंचे कर्तुत्व हे एक जाणते आणि निपुण नाटककार म्हणून तर आहेच, परंतु त्यांची सामाजिक बांधिलकी वाखाणण्यासारखी आहे. महाराष्ट्रातील सर्वांचाच आतापर्यंत त्यांची आगळी पद्धत माहित झालेले आहे. प्रत्येक नाटकाची बांधणी आणि प्रोसेस ही त्यात काम करणार्यांना सबळ करणारी असते. केवळ नामांकित स्टार्सना घेऊन ते काम करत नाहीत तर तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत ते महिनोंमहिने काम करून, आपले 'करियर' आणि आजच्या युगातील मीडियाच्या जगातील लाख-कोटींची कमाई बाजूला ठेऊन कार्यकर्त्यांमधील कलाकार ते जागा करतात. या नाटकाबद्दल बोलायचे तर पुण्यातील सफाई कामगार युनिअन बरोबर त्यांनी कैक महिने संपर्क ठेऊन अनेक आविष्कार घडवून आणलेले आहेत.
आपला लढा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने मांडण्यानेचे धाडस व दूरदृष्टी दाखवल्याबद्दल कामगार नेत्या मुक्ता मनोहर व त्यांचे सर्व सहकारी यांचे मनपूर्वक अभिनंदन करायला हवे. हे सर्व काही बाळबोध लोक आहेत का? आपला व्यवसाय आणि नोकरी-धंदा बाजूला ठेऊन नाटक करणे मध्यम वर्गीयांना सुद्धा जमणे अशक्य असते, मग हे सर्व कलाकार आपले घर आणि आपली संघटना कशी चालवीत असतील बरे?
'सत्यासोधक' च्या सर्व टीमला आमचा सलाम, जय भीम आणि झिंदाबाद.
आपली विश्वासू,
मनीषा ..{by:email}
purn sahmat aahe. Atul baddal tine lihilela shabd-n shabd khara aahe..
ReplyDeleteAtul aani tyachya sahkaryanna JOHAR
Dr.sugan baranth...{by:email}
Sadhana Dadhich sadhana.dadhich@gmail.com
ReplyDelete23 Jul (3 days ago) .हरी नरकेचा लेख वाचून मला धक्का बसला ,कारण गोपू पेठे हे त्यांचे लक्ष्य असणार हे थोडेसे लेख न वाचताही मला वाटले होते, पण खुद्द जोतीरावच लक्ष्य आहेत..हे हरीचा लेख वाचून कळले .
साधना...
.{by:email}
नमस्कार .
ReplyDeleteआहेत कोण हे दिव्य लेख लिहिणारे कुंजीर ? मूळ लेख मी वाचलेला नाही, पण तुमच्या लेखातून त्यात काय असावे याची कल्पना येते...उत्तम आणि तर्कशुद्ध झालाय तुमचा लेख.
प्रगती.
{BY: EMAIL}
Dear Prof Narke,
ReplyDeleteI read your full article and could not agree more with the Phule philosophy you have revisited in it. I have not seen a more concise and yet more accurate one-line summary of the philosophy than your statement - "फुलेवादी असणे म्हणजे दररोज त्यांच्या फोटो किंवा पुतळयाची पुजा करणे किंवा चढ्या सुरात आरत्या गाणे नव्हे. "स्त्री-पुरुष समता,जातीनिर्मुलन,ज्ञाननिर्मिती,चिकित्सा आणि संसाधनांचे फेरवाटप" हा फुलेविचारांचा गाभा आहे". This is exactly what he stood for, and his teachings also propagate the same message.
I am born into a progressive family fortunately, and was always given the freedom and encouragement to seek not only deeper knowledge but also the ability to interpret and analyse it. But it worries me a great deal that young impressionable minds are possibly subjected to the writings such as Mr Kunjir's and may catch an extremely narrow and inaccurate version of Phule's philosophy.
I recently read a piece of news in Sakal which gave the community-wise literacy rate in Maharashtra and India in the 19th century. The 'upper' layers had between 15% and 60% literacy then (depending on the caste) while Bahujan Samaj had less than 1%. This tells you what a towering task and challenge lay in front of the visionaries then. This huge and utterly insane difference would have destroyed our country long back if it wasn't for efforts of highly progressive and liberal leaders like Jyotirao Phule, Savitribai Phule, Gopalrao Agarkar.
Casteism is completely anachronistic in today's world. It is an artifact from the bygone era and is one of the biggest furdle blocking our way forward. But at the same time, till we reach a stage where there are equal opportunities for all and opportunities do not vary based on an absurd thing like caste, we need to be aware of the 2500-years plight of those who were put at a disadvantage and work to correct it.
Having said this, sir, I honestly do not think people like Mr Kunjir have the intelligence and maturity of thought to understand what you are trying to say here. And unfortunately such people carrying the thought of hatred are everywhere, in every community.
I fully support your quest and your struggle against this bigotry, and for a more progressive, liberal and knowledge-seeking society ('enlightenment' is such an accurate word for it - I am not sure, but I do believe this is what Jyotirao and Savitribai always strived for and fought for - enlightenment).
Thanks and regards,
Yogesh
{BY:EMAIL}
स्वातंत्र्य्वीर सावरकर महात्मा फुले यांना खरे हिंदुत्ववादी म्हणत असत
ReplyDelete--पुरुषोत्तम खेडेकर[भारतीय समाजचित्रात बहुजन शोध]
महात्मा फुले यांच्या शाळेत एक महार शिपाई होता.तो ख्रिस्ती व्हायला निघाला होता.म.फुलेंनी त्याला धर्मांतरापासून परावृत्त केले.सत्यशोधक समाजात जानवे घालण्याचा कार्यक्रम होत असे.गायत्रीमंत्रास म.फुल्यांनी मूळ बीजमंत्र म्हट्ले आहे.फुल्यांचा वारसा सावरकरांन्री आणखी पुढे चालवला.त्यांनी स्वत:च्या मुलांच्या मुंजी केल्या नाहीत आणि गायत्रीमंत्रासही कालबाह्य ठरवले.सावरकरांचे हिंदुत्व हे प्रचलित हिंदुधर्मापेल्षा वेगळे होते.केवळ मातृभूमीवरील निष्ठा हेच त्यांचे हिंदुत्व होते.त्याला विद्न्याननिष्ठेची जोड मिळावी असा त्यांचा आग्रह होता.सर्व धर्मग्रंथांना त्यांनी कालबाह्य ठरवले होते.
सावरकरांचे विचार व उपदेश वाचताना महात्मा फुले यांनी १८८७मध्ये ’सत्यशोधक समाजा’साठी जे विवाह व पूजाविधी तयार केले होते त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
ReplyDeleteभटाला बहिष्कृत करून स्वत:चे विधी स्वत:च करणे या मुख्य हेतूने महात्मा फुले यांनी ते नियम तयार केले होते.
अर्थात सावरकरांनी महात्मा फुले यांच्या कितीतरी पुढचा टप्पा गाठलेला होता.
भटाला बहिष्कृत करण्याबद्दलची योजना मात्र दोघांतील समान मुद्दा आहे.
पण लग्ने नैर्बंधिक[रजिस्टर्ड]पद्धतीने करावी व श्राद्धादीबाबतीत समाजकार्य,राष्ट्रार्थ दान किंवा राष्ट्रसेवा करावी किंवा राष्ट्रालाच निर्मिक मानावा या दोन बाबतीत सावरकरांनी पुढचा टप्पा गाठलेला आहे.
निर्मिक आणि स्वत: व्यक्ती[यजमान,निर्मिकाचा भक्त] यामधील मध्यस्थाची[भटजीबुवांची] हकालपट्टी करण्याची क्रांतिकारक योजना त्या काळात मांडल्याबद्दल महात्मा फुले यांचा गौरव करावा लागेल.
पण त्याचबरोबर त्यानंतर फक्त ३५ वर्षांच्या आत
सावरकरांनी वरील विचारांचा स्वत: उच्चवर्णीय ्संस्कारात वाढलेले असतानाही निष्ठेने व आग्रहाने प्रचार केला याबद्दल त्यांचाही यथोचित गौरव केला पाहिजे.
ब्राह्मणशाही[पुरोहितशाही] नष्ट करण्यासाठी सावरकरांनी मांडलेल्या या योजनेबद्दल त्यांच्या गौरवाचे दोन शब्द बोलताना मात्र कोणी दिसत नाही.
अनुयायीही नाही.विरोधकही नाही.
सावरकरांचे हे विचार पटत नाहीत म्हणून बहुसंख्य अनुयायी,
तर हे विचार माहीतच नाहीत म्हणून बहुसंख्य टीकाकार,
हे विचार माहीत असताही मुद्दाम सावरकरांची विकृत प्रतिमा निर्माण करणारे काही संशोधक व विरोधक
या सर्वां्नी मिळून
सावरकरांची ब्राह्मणशाही नष्ट करण्याची खरी भूमिका जनतेसमोर कधी आणली नाही,येऊ दिली नाही.
वस्तुत: महात्मा फुले यांचाच वारसा सावरकरांनी पुढे चालवलेला आहे.
[सावरकरांच्या सामाजिक क्रांतीचे अंतरंग या पुस्तकाच्या प्रस्तावनेतून]
ReplyDeleteसावरकरांचे सामाजिक विचार म.फुले वा डा.आंबेडकर यांच्या विचारापेक्षा कुठेही कमी क्रांतिकारक नव्हते,हे हा ग्रंथ वाचून लोकांना कळेल.चातुर्वर्ण्य,रोटीबंदी,बेटीबंदी,धर्मग्रंथप्रामाण्य,वर्णवर्चस्व,भटशाही यांच्याविरुद्ध त्यांनी क्रांतिकारक विचार मांडून प्रत्य्क्ष कार्यही केलेले आहे.यासाठी त्यांना सातत्याने ब्राह्मणव्र्गाशीच संघर्ष करावा लागला.इतर वर्णाशी आम्हाला आमचे ह्क्क द्या म्हणून संघर्ष करण्यापेक्षा स्वत:च्याच वर्णाविरुद्ध ’तुमचे हक्क सोडा’म्हणून संघर्ष करणे हे अधिक अवघड असते.दुर्दैवाने,बहुजन समाजाने त्यांच्या समाजक्रांतीची दखल घेतली नाही.त्यांच्या हिंदुत्वाच्या परिभाषेमुळे त्यांच्या समाजकारणाच्या अंतरंगात जाऊन पाहण्याचा त्या समाजाने प्रयत्न केला नाही.वस्तुत: सावरकरांचे सामाजिक विचार व कार्य बहुजनांच्या हिताचे होते;त्यांनाच ते अधिक पटायला हवे होते;त्यांनीच सावरकरांचा यासाठी गौरव करायला हवा होता;फुले,शाहू,आंबेडकर या परंपरेत त्यांना मानाचे स्थान द्यायला हवे होते;घरात या चौघांची छायाचित्रे एकत्रित लावलेली दिसायला हवी होती.परंतु,बहुजनांनी सावरकरांच्या समाजक्रांतीचा अभ्यासच केला नाही.सावरकरांच्या अनुयायांनाही याची कधीच खंत वाटली नाही....
सावरकरांच्या समाजक्रांतीला समजून न घेऊन,उलट काहींनी विपर्यास करून त्यांनाच मनुवादी ठरवून,समाजाने त्यांच्यावर फार मोठा अन्याय केला आहे.
Manohar Kakade: आता कुंजीर यावर ६०/७० पानी प्रतिक्रीया ‘पवा’ मधून देतील.
ReplyDeleteJuly 26 at 1:46am ·
Shrikant Umrikar: नरके यांनी एक महत्त्वाच्या चर्चेला तोंड फोडले आहे. केवळ जातीत जन्मलो म्हणून त्याचे फायदे अथवा तोटे दोन्हीची मानसिकता किती दिवस आपण जपणार आहोत? 1950 ला आपण घटना स्विकारली तरी अजून जातीय दृष्टिकोन जात नसेल तर आधुनिक काळात आपला निभाव लागणार कसा? निदान विचारांच्या, कलेच्या, वाङ्मयाच्या क्षेत्रात तरी आपल्याला हा जातीय दृष्टिकोन बाजूला ठेवावा लागेल.
कुंजीरांच्या या दृष्टीकोनाचा जास्त धोका बहुजन समाजालाच आहे. कारण ग्रामिण भागातून जवळपास ब्राह्मण समाज हद्दपार झाला आहे. जिल्ह्याचं, विभागाचं मोठं शहर किंवा परदेशात आता त्याचं वास्तव आहे. आणि स्थलांतर करता यावं इतकी कमी संख्या त्यांची आहे. कुंजीरांना उत्तर द्यायला ब्राह्मण रिकामे नाहीत. फार थोडे ब्राह्मण आता कला, साहित्य, संगित यात शिल्लक आहेत. त्यांना व्यापकपणे समाविष्ट करून घेणं हेच बहुजनांच्या हिताचं आहे. उलट ज्या बहुजनांची बाजू कुंजिर मांडतात त्यांची संख्या इतकी प्रचंड आहे की त्यांना भयाण ग्रामिण वास्तवापासून स्थलांतर करणं जवळपास अशक्य आहे.
तेंव्हा बहुजनाचे प्रतिनिधी ते स्वत:ला समजत असतील आणि प्रज्ञा दया पवार आपल्या नियतकालिकात त्यांचे लेख छापत असतील तर त्यात सगळ्यात जास्त हानी बहुजन विचारवंतांचीच होणार आहे...{From: Facebook}