Wednesday, July 4, 2012

मराठीसाठी प्राध्यापक झटत नाहीत


मराठीसाठी प्राध्यापक झटत नाहीत - नरके
-
Saturday, June 30, 2012 AT 03:15 AM (IST)

पुणे - 'निश्‍चित नोकरी आणि मजबूत पगार असल्यामुळे शिक्षक-प्राध्यापक मराठीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झटत नाहीत, याचा मला शिक्षक म्हणून खेद वाटतो. अनेक भाषा लोप पावत आहेत. मराठी शाळा बंद पडत आहेत. अशा स्थितीत मराठीला सक्षम करण्यासाठी आपण जागे व्हायलाच हवे,'' असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. हरी नरके यांनी गुरुवारी येथे केले.

शिक्षणतज्ज्ञ ग. ह. पाटील स्मृतिप्रीत्यर्थ साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे "अभिजात मराठी भाषा' या विषयावर नरके यांचे व्याख्यान झाले. या वेळी मंडळाच्या कार्यकारी विश्‍वस्त डॉ. मंदा खांडगे, अध्यक्ष डॉ. ज्योत्स्ना आफळे उपस्थित होते.

नरके म्हणाले, 'मराठी श्रेष्ठ दर्जाची भाषा आहे. जे नाही म्हणतात, त्यांचे मत विचारात घेतले जाऊ नये. मराठी ही जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी भाषा आहे. तिचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शिक्षक-प्राध्यापकांनी स्वत:हून पुढाकार घ्यायला हवा. पण, विनंती करूनही ते पुढे येत नाहीत. मराठीसाठी विधायक वातावरण निर्माण व्हावे. मराठीला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी आता सर्वांनी एकत्र प्रयत्न करायला हवेत.''

2 comments:

  1. प्रतिक्रिया
    On 30/06/2012 05:43 PM RAMZAN TAMBOLI said:
    माझे शिक्षण मराठी भाषेतून पूर्ण झाले आहे म्हणून सांगतो मराठी भाषा हि जर का आपल्याला जपायची असेल तर प्रत्येक भाषेतील ज्या शाळा चालू आहेत त्या प्रत्येक शाळेत मराठी विषय अनिवार्य(कम्पल्सरी) करावा मग ते उर्दू असो कि इंग्रजी. तरच आपली मायबोली टिकेल पण यामध्ये राजकारण कुठेही नको.

    ReplyDelete
  2. Milind Kotwal:" मुळातच "अजागळ" असे भारतीय राष्ट्रीयत्व मान्य केल्या मुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे ... मराठी हे राष्ट्रीयत्व आहे हे जर मान्य केले गेले तरच मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन होऊ शकेल. भारतीय राष्ट्रीयत्वाची भाषा ही हिंदी आणि Indian राष्ट्रीयत्वाची भाषा ही इंग्रजी आहे ... त्यामुळेच त्या दोन भाषा वाढत आहेत".
    8 hours ago · like · 1

    Sunil Tambe:" मराठी भाषा किती वर्षं टिकवली पाहीजे? हजार, दोन हजार, तीन हजार? याबाबत निर्णय झाल्यावर भाषेचे घटक, रचना इत्यादीच्या आधारे, काय करायचं याचा तपशीलवार कार्यक्रम आखता येणं शक्य आहे का? म्हणजे असं की घर बांधताना वा इमारत बांधताना तिचं आयुष्य किती याचा विचार करून घराचा आणि बांधकाम साहित्याचा तपशील ठरवला जातो, डागडुजी करण्याचाही त्यानुसार रचना करण्यात येते. तसं भाषेच्या बाबतीत शक्य आहे का. भाषा का मरतात, उदा. पाली, अर्धमागधी, संस्कृत, याचा कोणी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे का? संस्कृत वा लॅटिन या ज्ञानभाषा असून का मृत झाल्या? हिब्रू या भाषेला नवसंजीवनी का मिळाली? छत्तीसगढी, राजस्थानी, ह्या भाषांना मान्यता मिळावी या मागण्या विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वा एकविसाव्या शतकात का जोर धरू लागल्या?"
    8 hours ago · like · 2

    Milind Kotwal वापर हा एकुलता एक जिवंतपणा निकष आहे ...
    बाकी सगळे बदल गरजे प्रमाणे घडत जातात .
    आणि वापर हा राजाश्रयाने आणि लोकाश्रायाने वाढतो.
    राजाश्रय आणि लोकाश्रय हा स्वाभिमानाने प्राप्त होतो......
    8 hours ago · like · 1

    Vaibhav Nagarkar: "marathi baddal abhiman ahe khupch pan ji bhasha sanskrut madhun tayar zali tila abhijat darja kasa denar!"
    4 hours ago · Like

    Hari Narke: :"मराठी भाषेवर संस्कृत भाषेचा फार मोठा प्रभाव असला तरी ती संस्कृतपासुन जन्मलेली नाही. राजारामशास्त्री भागवत यांच्या मते मराठी ही संस्कृतपेक्षाही जुनी भाषा आहे.{पहा:दुर्गा भागवत संपादित,मराठ्यांसंबंधी चार उद्गार,प्रस्तावना}संस्कृत ही वैदिक भाषेपासुन जन्माला आलेली आहे.जुनी मराठी जिला महाराष्ट्री प्राकृत किंवा महारठी भाषा म्हणतात ती लोकभाषा आहे.संस्कृत ही ग्रंथभाषा आहे.मराठीचे नाते पैशाची,पाली,शौरसेनी,मागधी यांच्याशी आहे.ती संस्कृतपासुन जन्मलेली नाही.
    28 minutes ago · Like · 1

    ReplyDelete