हिंगोलीच्या पिंपळदरीत उभारला भव्य बुद्धविहार, प्रा. हरी नरके यांच्या भाषणाने जमली वर्गणी
मराठवाड्यातील हिंगोलीच्या बर्याच गावांना विद्यापीठाच्या नामांतरविरोधी दंगलीची झळ बसलेली होती. त्यातून सावरण्यासाठी कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांनी संघटना उभारण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले.
यावेळी २००३ साली सर्व तरूणांना प्रा. हरी नरके यांचे व्याख्यान ऎकवण्यात आले. त्यांच्या व्याख्यानाने तरूण इतके भारावुन गेले की विहारासाठी उत्स्फुर्तपणे वर्गणी जमू लागली. तरूणांनी केलेल्या श्रमदानातून व स्वत:च्या वर्गणीतून अतिशय भव्य बुद्धविहार उभा राहिला. असा बुद्धविहार की ज्याची किर्ती जगातल्या १६ देशात पोचलेली आहे.
या उपक्रमाला सर्व स्थानिक नागरिक व जयाजीराव पाईकराव, साहेबराव कांबळे, न्या.एम.एल.भगत व इतरांचा हातभार लागला. गावातील गरिब महिला शांताबाई महादू खिल्लारे यांनी आपले मंगळसुत्र विकुन विहाराच्या बांधकामाला देणगी दिली.
No comments:
Post a Comment