सर , जयभीम !
आपली चूक नसतानाही चळवळीच्या भल्याचा विचार करुन आपण समंजसपणाने एक पाऊल मागे घेतले आहे. हे प्रगल्भतेचे लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही आणखी मोठे व्हाल व तुमची विश्वासार्हतादेखील वाढेल.
तथाकथित आपल्या जातीची माणसे ब्राह्मण्यग्रस्त संघटना तसेच गैर फुले - आंबेडकरवादी संघटनांसोबत असताना त्यांबाबत सोईस्कर मौन बाळगणारे तुम्हाला प्रमाणपत्र द्यायला उत्साहाने पुढाकार घेतात तेव्हा त्यांच्या धाडसाचे कौतुक वाटते.
आमच्या नात्यांत तसेच परिचितांमध्ये व्यसनाधीन पती व त्यांचा कौटुंबिक हिंसाचार सहन करणाऱ्या महिलांची संख्या फार मोठी आहे. मुंबईत आम्ही आदर्श जयंती अभियान चालवताना प्रत्येक वस्तीत व्यसनाचा मुद्दा हमखास चर्चेला येतो. काही मंडळांना तर ‘दारु पिणाऱ्यांना जयंती मिरवणुकीत स्थान नाही ‘ असे जाहिर करावे लागते ! यांवरुन हा दारुचा रोग व त्याचे दुष्परिणाम यांची तीव्रता समजून येते. रोगाचे अस्तित्व नाकारणे वेगळे व रोगावर उपाय करणे वेगळे ! जे रोगाचे अस्तित्वच नाकारतात त्यांच्याकडून उपायांची अपेक्षा ती काय करणार ? असो.
शेवटी प्रामाणिक प्रश्नांना सहज उत्तरे देता येतात. परंतु हितसंबंधी व्यक्तींचे प्रश्न वेगळे असतात व कितीही तर्कशुद्ध उत्तर दिले तरी त्यांचे समाधान होत नसते !
भविष्यात अशा व्यक्तींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे उचित राहिल, असे वाटते.
एकाच वेळेस आपण सर्वांचे समाधान करु शकत नाही.
शेवटी तथागत सम्यक संबुद्ध यांची अनित्यता आपणांस देखील लागू आहेच !
आम्ही आपल्या सोबत आहोत.
आपले,
१- शुद्धोदन आहेर.
२- संजय गायधनी.
३ - वैशाली गेडाम (पीएच.डी. स्कॉलर, अमेरिका)
४ - अशोक अंकुश.
५ - डॉ. हेमलता माहिश्वर, नवी दिल्ली.
६- उपाली जी उर्फ एस एस धवराळ.
७- संदीप हिरे.
८- दिपक गांगुर्डे.
No comments:
Post a Comment