एका कार्यक्रमानंतर एक चाहते भेटले.
म्हणाले, "सर, ओळखलत का? मी अमुकतमूक. माझं अमुकतमूक पुस्तक वाचलंत का? कसं वाटलं?"
"चांगलं लिहिलंय तुम्ही. हात लिहिता ठेवा. भरपूर वाचा. खुप पुढे जाल. माझ्या शुभेच्छायत."
तो त्याच्यासोबतच्या मित्रांना म्हणाला, "सरांची शाबासकी म्हणजे काय साधी गोष्ट नाय. सर म्हणजे साहित्यातली अथॉरिटीय."
..............
स्थळ तेच.
दहापंधरा मिनिटांनी दुसरे एक सज्जन भेटले. त्यांचाही तोच प्रश्न. " सर, माझा कवितासंग्रह कसा वाटला?"
"अहो, तुमच्या कविता तशा बर्यायत. पण तुम्ही पुस्तक प्रकाशनाची थोडी घाई केली असं वाटतं.
थोडं थांबायला हवं होतं. चांगल्या कविता वाचा. भरपूर अनुभव घ्या. एक दिवस नक्कीच चांगली कविता लिहाल तुम्ही."
त्याचा चेहरा पडला.
तो थोडं पुढं जाऊन मला ऎकू येईल अशा आवाजात सोबतच्या मित्रांना म्हणाला," अरे याला कवितेतलं काय घंटा कळतंय? माझ्या कविता अशा ऎर्यागैर्या नथ्थू खैर्याला थोड्याच कळणारेत? त्यासाठी कवितेतलं समजण्याची प्रतिभा हवी. जान हवी.
आणि दुसरं असं की मुदलात हा काय समीक्षक हाय का? मी काय म्हणतो, ह्याची लायकीच नाय माझ्या कवितांवर बोलण्याची!"
.............
कौतुक केलं की तुम्ही कोण, तुमची लायकी काय हे कोणीच विचारत नाहीत. तुम्ही मोठे. थोर्थोर.
मात्र उणीवा सांगितल्या, सौम्य टिका केली तर लगेच फणा काढून सारेच विचारतात, तुमची लायकी काय? तुम्हाला साहित्यातलं काय घंटा कळतं?
रंग माणसांचे!
- प्रा.हरी नरके

No comments:
Post a Comment