तमीळ, संस्कृत, तेलुगु,कन्नड या चार भाषांना अभिजात दर्जा मिळेपर्यंत भाषेच्या प्राचीनतेची अट 500 ते 1000 वर्षे होती.
पण आपल्याला दर्जा मिळाला, आता इतरांना तो मिळू नये यासाठी क्न्नडवाल्यांनी पुढाकार घेतला. या चौघांनी संगनमताने केंद्र सरकारवर दबाव आणून हा काळ वाढवून 1500 ते 2000 वर्षे करायला लावला.
मराठीच्या द्वेषातून केलेला हा बदल होता.
आधुनिकतेचा आदर करायला सांगणारे हे दांभिक कुर्हाडीचे दांडे तमीळ, संस्कृत, .....यांना अभिजात दर्जा मिळाल्यापासून त्यांचा अनादर करू लागले काय? अभिजात साहित्याचा लोक आदर करतात की अनादर? ज्येष्ठांना आपण मान देत नाही काय? शब्दच्छल करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे, लोकांचा बुद्धीभेद करणे हाच यांचा धंदा.
अभिजातने फायदा होतच नाही उलट नुकसानच होते अशी खोटी आवई उठवणार्यांना आमचा सवाल आहे की मग तमीळ, संस्कृत...चा अभिजात दर्जा काढून घ्या अशी मागणी गेल्या 15 वर्षांत तुम्ही का केली नाही? मराठीला दर्जा मिळण्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच बरी तुम्हाला तोट्याची, आदराची आठवण झाली?
यांनाच उद्देशून संत एकनाथांनी चपराक लगावली होती. "संस्कृतवाणी देवे केली मग मराठी काय चोरापासून झाली?"
अमृतातेही पैजा जिंकणार्या मराठीचे भले झालेले ज्यांना बघवत नाही अशा या मराठीद्रोहींचे, आप्पलपोट्यांचे हे कारस्थान हाणून पाडणे गरजेचे आहे.
-प्रा.हरी नरके

No comments:
Post a Comment