Saturday, March 7, 2020

८ मार्च : यासाठीच तर हवेय हिंदुराष्ट्र - प्रा.हरी नरके






उद्या आंतरराष्ट्रीय स्त्रीमुक्ती दिन.

सातआठ वर्षांपुर्वी दिल्लीमध्ये निर्भया अत्याचार प्रकरण घडले. तो अत्याचार इतका भयानक होता की पिडीतेवर बलात्कार करून त्यानंतर तिच्या मायअंगावर लोखंडी सळीने शेकडो वार करून तिच्या ओटीपोटातील सगळी आतडी तोडून बाहेर काढून फेकून देण्यात आली होती. इतका नीचपणा करणारे आरोपी दोषी असल्याचे सिद्ध होऊनही एव्हढे वर्षे जिवंत कसे?

न्यायव्यवस्थेतील त्रुटींचा चतुरपणे वापर करणे आणि पोलीस, तुरूंग व्यवस्थापन, सरकार यांच्या वरिष्ठांचे आशिर्वाद असणे यामुळे गुन्हेगारांची फाशी वारंवार पुढे ढकलली जाते आहे.

या गुन्हेगारातील एक विनय शर्मा हा उच्चजातीय/उच्चवर्णिय असल्याने त्याला फाशी दिल्यास ब्रह्महत्त्येचे पातक लागेल म्हणून त्याला फाशी देऊ नका अशी मागणी जाहीरपणे केली जातेय.
यासाठीच हवेय धर्मावर आधारित राष्ट्र.

मनुस्मृती स्पष्टपणे सांगते ब्रह्महत्त्या वर्ज्य आहे. कितीही भयंकर गुन्हे ब्राह्मणांनी केले तरी त्यांची हत्त्या करायची नाही. असा मनु ज्ञानोबातुकोबापेक्षा दोन पावले पुढे होता असे भिडेगुरूजी सांगतात. रामतिर्थकरबाई, इंदुरीकरबुवा आणि भाटेबाई मनुचे गोडवे गातात.

धर्मावर आधारित राष्ट्र म्हणजे मनुस्मृतीवर आधारित राष्ट्र.

भारतात इतर धर्माचे अल्पसंख्यक लोक राहतात म्हणून भारत सेक्युलर नसून सर्व भारतीय हिंदु स्त्रिया आणि अनुसुचित जाती, जमाती, विजाभज, इमाव, विमाप्र, एसिबीसी यांच्या हितासाठी धार्मिक राष्ट्र नको म्हणून भारत सेक्युलर हवाय. अल्पसंख्यकांचे काय होईल हा नंतरचा मुद्दा आहे. पहिले सर्व स्त्रिया आणि सर्व मागासवर्गीय यांची मनुच्या कायद्यानुसार कत्तल होईल जशी पेशवाईत होत होती. तेव्हा निर्भयाला न्याय मिळावा हीच स्त्रीमुक्तीदिनाची मागणी.

पाहा: मनुस्मृती, अध्याय ८ वा श्लोक क्र.३८०/३८१

प्रा.हरी नरके, ७ मार्च २०२०

No comments:

Post a Comment