नगरात होणार्या चोर्या आणि पाकीटमार्यांना आळा घालण्यासाठी महाराजांनी अतिशय कडक पावलं उचलायचं ठरवलं.
त्यांनी जाहीर केलं की यापुढं खिसेकापूला जाहीरपणे भर चौकात फाशी देण्यात येईल. हजारो लोकांपुढे गुन्हेगाराला फाशी दिली की सगळ्यांना जरब बसेल. पुन्हा कुणीही खिसा कापण्याची हिंमत करणार नाही.
मोठा गाजावाजा करून एका खिसेकापूला हजारो लोकांसमोर फाशी देण्यात आली.
त्या गर्दीचा फायदा घेऊन 16 जणांचे त्याठिकाणी खिसे कापले गेल्याचं कार्यक्रम संपल्यावर दाखल झालेल्या तक्रारींवरून महाराजांना कळलं. सतरावे खुद्द महाराजच होते.

No comments:
Post a Comment