अभिनेता जितेंद्र 7 एप्रिलला वयाची 75 वर्षे पुर्ण करीत असताना त्याला आपल्या पहिल्या चित्रपटाची नक्कीच आठवण येत असणार.
व्ही. शांताराम हे अतिशय नामवंत निर्माते आणि प्रतिभावंत दिग्दर्शक. त्यांनी जितेंद्रला ’गीत गाया पत्थरोने’ या चित्रपटात सर्वप्रथम नायकाची भुमिका दिली.
त्यासाठी त्याला लेखी करार करावा लागला. त्याला मानधन म्हणून एकुण 20 हजार रूपये देण्यात आले. या करारानुसार पुढील 3 वर्षे त्याला इतर संस्थेच्या चित्रपटात काम करता येणार नव्हते.
जितेंद्रचा ’गीत गाया पत्थरोने’ हा पहिलाच चित्रपट खुप गाजल्यामुळे जितेंद्रला प्रचंड मागणी आली. एक निर्माता त्याला एका चित्रपटासाठी 1 लाख रूपये द्यायला तयार झाला. जितेंद्र व्ही. शांताराम यांना भेटला. परवानगी द्यावी अशी त्यानं विनंती केली. त्याबदल्यात व्ही.शांताराम यांच्याकडून मिळालेली सर्वच्या सर्व रक्कम म्हणजे 20 हजार रूपये त्यांना परत करायची त्याने स्वत:हून तयारी दाखवली.
व्ही.शांताराम हे व्यवहाराच्या बाबतीत अतिशय काटेकोर आणि कठोर होते. त्यांनी जितेंद्रला एका अटीवर परवानगी द्यायची तयारी दाखवली.
ते म्हणाले, " तुला मिळणार्या रकमेतले 20 हजार रुपये तू घे आणि उर्वरित 80 हजार रूपये माझ्या कंपनीच्या खात्यात आणून भर."
जितेंद्रला ही अट मान्यच करावी लागली.

No comments:
Post a Comment