जातीबाहेर प्रेम केलं म्हणुन पुण्यात नुकतीच विराज जगतापची निर्घृण हत्त्या झाली. काही दिवसांमागे अशाच कारणाने हत्याकांडं झाली. नितीन आगे, आशा शिंदे, मंगला कांबळे, सोनई हत्त्याकांड, इंद्रजित कुलकर्णी- मेघना पाटील (कोल्हापूर), यांच्या हत्त्या झालेल्या होत्या. सजातीय विवाह हा नियम झालेला आहे. किंबहुना ‘लग्न म्हणजे सजातीयच, ही धारणा समाजमनात पक्की झालेली आहे. आंतरजातीय विवाह म्हणजे अधःपतन / वर्णसंकर / कुलभ्रष्ट होणे हा अर्थ न उच्चारताही इथे रूजवण्यात आलेला आहे. आपल्याला या नॉर्मलसीला आव्हान द्यायचंय आणि ती नाकारायची आहे म्हणून आंतरजातीय विवाह हा जाहीर उल्लेख आवश्यक ठरतो. यातून आंतरजातीय संबंध हे विवाह म्हणवून पात्र आहेत, नव्हे तो आमचा अधिकारच आहे हे आपण दाखवून देत आहोत. यातूनच नवी नॉर्मलसी रूजेल. रूळेल. समाजमान्य होइल. जातीबाहेर विवाह/प्रेम केलं म्हणून ज्या निर्घृण हत्त्या होतात त्यांना मिडीयाने " ऑनर किलिंग" म्हणणे चुकीचे आहे. ह्या संघटित गुन्हेगारीच्या कृत्याला " ऑर्गनाइज्ड क्राईम", " ब्रुटल मर्डर", "निर्घृण हत्त्या" असेच म्हटले पाहिजे.
समाजाची ही चौकट मोडून बंड करून कमीअधिक किंमत मोजून ज्यांनी ठरवून किंवा प्रेमातून आंतरजातीय/आंतरधर्मिय विवाह केले अशांची संख्या एकुणात भले कमी असेल परंतु आपल्या आजुबाजूला अशी जोडपी बरीच आहेत. तुम्ही किंवा तुमच्या माहितीत कुणी असा आंतरजातीय/आंतरधर्मिय विवाह केला असेल तर ती नावे कमेंट मध्ये लिहा. मागे काहीवर्षांपुर्वी मी फेबुवर अशी यादी केली होती तेव्हा ती नावे हजाराच्या वर झालेली होती. आतातर त्यात कितीतरी भर पडलेली असेल. आंतरजातीय विवाहाची दहशत, सामाजिक दडपण कमी करण्यासाठी नव्या पिढीला या यादीचा उपयोग होईल...आपल्या आजूबाजूला इतक्या मोठ्या संख्येने आंतरजातीय विवाह केलेले लोक आहेत, सुखी आहेत आणि महत्वाचं म्हणजे आपल्या कर्तृत्वाने त्यांनी या नात्याला समाजमान्यता, आदर, स्नेहही मिळवलाय. फारच प्रेरक बाब आहे ही आणि अनुकरणीयही.
१. एक विनंती, जातीबाहेर किंवा पोटजातीबाहेरसुद्धा झालेला प्रत्येक विवाह हा स्वागतार्हच आहे. मात्र इथे आपण जातीबाहेर झालेलेल्या विवाहांचीच यादी करतो आहोत. त्यामुळे उदा. कोकणस्थ, देशस्थ, कर्हाडे आदी पोटजातीत झालेले विवाह इकडे नोंदवू नयेत.
२. ज्यांचे विवाह जातीतल्या जातीत झालेले आहेत त्यांनी ह्यानिमित्ताने दुरूस्ती करण्याच्या फंदात पडू नये. नाहीतर नवी समस्या निर्माण व्हायची. जातीतल्या जातीत लग्न झालेय त्यांनी कोणीही अपराधी वाटून घेऊ नये. पुढच्या पिढीला जातीत लग्न करायला भाग पाडू नये, इतके केले तरी भरपूर झाले.
३. नावात वा आडनावात काही चुका आढळल्यास क्षमस्व-
४. मला सहज आठवलेली काही नावं पुढीलप्रमाणे-
(१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर- डॉ. शारदा कबीर (२) बाळासाहेब आंबेडकर - अंजली मायदेव (३) निळू फुले - रजनी मेहता (४) गोपीनाथ मुंडे
(५) सु्शीलकुमार शिंदे (६) रामदास आठवले (७) भालचंद्र फडके (८) हरी नरके- संगिता (९) सुषमा देशपांडे - कणेकर (१०) सुप्रिया सुळे
(११) गार्गी फुले- ओंकार थत्ते (१२) संजय सोनवणी (१३) प्रदीप आवटे- माधुरी (१४) संजय आवटे- अर्चना (१५) महेश भागवत (१६) सुनिल तांबे- सविता कुडतरकर
(१७) कौस्तुभ दिवेगावकर- प्रियंका बोकील (१८) गणेश विसपुत्ये- श्रुती तांबे (१९) नागनाथ कोत्तापल्ले (२०) शर्मिला रेगे
(२१) रजिया पटेल - श्रीकांत सावंगीकर (२२) युवराज मोहिते (२३) नागेश चौधरी- पुष्पा (२४) अन्वर राजन - अरूणा तिवारी (२५) मनस्विनी ल.र. - सतिश मन्वर
(२६) समीर भुजबळ - शेफाली (२७) विलास वाघ- उषा कुलकर्णी (२८) हुसेन दलवाई - शमा पंडीत (२९) संघमित्रा खोरे - सचिन कांबळे, (३०) मुकुंद बहाळकर
(३१) मनोहर कदम- प्रतिमा जोशी (३२) संजय मं. गो.- लतिका (३३) वसंत चव्हाण- (३४) अशोक जैन- सुनिती (३५) रितेश देशमुख- जेनेलिया
(३६) डॉ. अनिरूद्ध फडके (३७) जुई फडके (३८) डॉ. सई ठाकूर (३९) चिन्मयी सुर्वे- सुमित राघवन (४०) लक्ष्मण माने - शशी भोसले
(४१) पार्थ पोळके (४२) मिहीर थत्ते- बोराटे (४३) गगनविहारी बोराटे (४४) अशोक अंकुश (४५) तेज निवळीकर (४६) प्रदीप मोहिते
(४७) नंदा पाटील (४८) डॉ. निलम जाधव- पन्हाळे (४९) सुनिता-दिलीप अरळीकर (५०) प्रज्ञा दया पवार - अभय कांता
(५१) शाहरूख खान-गौरी (५२) अमिर खान- किरण (५३) सैफ अली खान - करिना कपूर (५४) ऎश्वर्या नारकर- अविनाश (५५) प्रशांत दळवी- प्रतिक्षा लोणकर
(५६) भाऊ पाध्ये- शोशन्ना (५७) पुष्पा भावे- अनंत भावे (५८) अस्मिता दुभाषी- संतोष मोहिते- (५९) सचिन अहीर (६०) नामदेव ढसाळ- मल्लिका अमर शेख
(६१) शाहीर अमर शेख (६२) अनिल बर्वे (६३) भारत सासणे (६४) पद्मकांत कुदळे (६५) रवींद्र सुर्वे- देशपांडे (६६) चंद्रकांत वानखेडे - माया कुलकर्णी
(६७) भास्कर चंदावरकर- मिना कुलकर्णी (६८) सुधाकर जाधव - माया देशपांडे (६९) निरजा पटवर्धन- संदीप सावंत (७०) दिनेश ननोरे- सविता
(७१) संजय धिवरे- भाग्यश्री बानायत (७२) दत्ता बाळसराफ-कुसुम रोकडे (७३) पद्मभुषण देशपांडे (७४) कपिल पाटील- - वर्षा कांबळे (७५) येशू पाटील-मेरी (७६) अमर हबीब - आशा
(७७) मंदार फणसे- संपदा डावखरे (७८ महेश म्हात्रे- सुमेधा रायकर (७९) सीताराम रायकर (८० चिन्मय मांडलेकर
(८१) संग्राम खोपडे (आर.जे.) (८२) राणा जगजितसिंह पाटील (८३) रंगा राचुरे - बजाज (८४) अनिल खैरे (८५) निलिमकुमार खैरे
(८६) आनंद सोनावणे- (८७) परिमल माया सुधाकर (८८) सुभाष वारे (८९) शांताराम पंदेरे- मंगल खिंवसरा (९०) प्रशांत कोठडिया- उज्वला मेहेंदळे
(९१) प्रतिभा शिंदे (९२) शिवाजी गायकवाड- निशा शिऊरकर (९३) यमाजी मालकर- अंजली (९४) शबाना वारणे- अजित जोगळेकर (९५) चंद्रकांत पुरी- स्वाती बॅनर्जी
(९६) प्रवीण चव्हाण- अनघा तांबे (९७) नितीन कोत्तापल्ले (९८) मनिषा तोकले- आशोक तांगडे (९९) राजन सुमन खान (१००) मुग्धा कर्णिक- धनंजय
(१०१) शैला नार्वेकर - राम सातपुते (१०२) स्नेहल नारकर - अनिल नेने (१०३) सरिता आवाड (१०४) गणेश राऊत- ज्योती भोसले (१०५) शेखर सोनाळकर
(१०६) वर्षा शेडगे (१०७) ऋत्वीज काळसेकर (१०८) मधुकरराव पिचड (१०९) मयुरा डोळस (११०) अस्मिता जोगदंड- दीपक चांदणे
(१११) भारत पाटणकर- गेल ओम्वेट (११२) सुनिल सरदार (११३) नितीन सरदार (११४) सतिश पावडे - निशा शेंडे (११५) कुमुद पावडे (११६) जयंत पवार - संध्या नरे (११७) दिलीप चव्हाण (११८)अविनाश हावळ-गुत्तीकर (११९) ज्योती सुभाष (१२०) नसिरूद्दीन शहा-रत्ना पाठक
(१२१) रणवीर सिंग- दिपिका पदूकोन (१२२) विराट कोहली - अनुष्का शर्मा (१२३) रामविलास पासवान (१२४) जनार्दन वाघमारे (१२५) बापू काळदाते, (१२६) फ.मु.शिंदे, (१२७) उत्तमराव भोईटे
-प्रा. हरी नरके, १२/६/२०२०
No comments:
Post a Comment