माझा एक टिकाकार मित्र एक गोष्ट सांगत असतो.
एक होता राजा.कुस्त्यांचा शौकीन.जिंकणार्या पहिलवानाला मागेल ते देणारा.
एकदा असेच जिंकलेल्या पहिलवानाला राजा म्हणाला, काहीही माग, जे मागशील ते मिळेल.
पहिलवान मागण्यांची यादी करायला लागला.जमीन, बंगला,गायी-म्हशी, सोनं,सम्पत्ती.....
यादी वाढतच चालली तेव्हा चतुर राजा म्हणाला, हे बघ. माझा शब्द असल्यामुळे तुला मागशील ते मिळेलच.
पण आता माझी एक अट आहे.जेव्हढे तुला देईन, त्याच्या दुप्पट तुझ्या शेजार्याला देईन.
पहिलवानाने मागण्यांची यादी फाडून टाकली.म्हणाला, त्याला माझ्या दुप्पट मिळणार?
मग असं करा महाराज, माझा एक डोळा फोडा!
माझा मित्र म्हणतो तो पहिलवान समाजवादी नेता असणार. हो नेताच. कारण समाजवाद्यांमध्ये प्रत्येकजण नेताच असतो. कार्यकर्ता असतो कुठे?
मला काही हे पटत नाही.
मुळात सर्व क्षेत्रात हारण्याचं, आत्मनाशाचं, स्वकीयांबद्दलच्या जळफळाटाचं, भांडकुदळपणाचं आणि दळभद्रीपणाचं वर्ल्ड रेकॉर्ड केलेले समाजवादी
कुस्ती जिंकणं शक्य आहे? जे जिंकतात, यशस्वी होतात ते कडू असतात असं जे मानतात, ते जिंकण्याचा डाग स्वत:ला लावून घेतील?
तेव्हा तो जिंकलेला पहिलवान समाजवादी असू शकत नाही.

-प्रा. हरी नरके, १५/५/२०२०
No comments:
Post a Comment