१९९० मध्ये आम्ही अर्थनिती पंचायत भरवायला सुरूवात केली. देशाचा अर्थसंकल्प, विकास दर, महागाई, देशातील श्रीमंती आणि गरिबी, दारिद्र्य रेषा, नैसर्गिक संसाधने, मंदिर संपत्ती अशा विषयांवर आम्ही त्यात चर्चा सुरू केली. मित्रवर्य शुद्धोधन आहेर आणि टिम यांनी ह्या परिषदा यशस्वी करण्यासाठी अपार मेहनत घेतली.
आमची मांडणी प्रस्थापितांना अडचणीची असल्याने कार्यक्रमाच्या बातम्या मुख्य धारेतील वर्तमानपत्रे देणार नाहीत याची आम्हाला जाणीव होती. तसेही बातम्यांमुळे चतुर विरोधक / बलदंड वर्गशत्रू जागे होतात, ज्यांच्यासाठी आपण काम करीत असतो ते समाजघटक या बातम्या वाचतातच असे नव्हे.
त्यामुळे अशा बातम्या म्हणजे शत्रूला आपण टोचत असलेली लस असते. त्यामुळे त्यांची प्रतिकारक्षमता वाढते. आपल्या लोकांना या बातम्यांचा काहीच उपयोग नसतो. वर्षानुवर्षे शांतपणे, चिकाटीने तळात प्रबोधन, संघटन, प्रशिक्षण करावे लागेल, तेव्हा कुठे त्याचे परिणाम/निकाल दिसू लागतील यावर आमचा विश्वास होता, आहे. हे काम आजही चालूच आहे.
परळ, गोवंडी, विक्रोळी, कल्याण, कुर्ला, वरळी, पुणे, अहमदनगर, चेंबूरला अनेक परिषदा झाल्या. आज त्यातून या किचकट विषयांवर बोलणार्या २५ वक्त्यांचा संच तयार झालाय. किमान २५० वक्त्यांची टिम तयार करण्याचे आपले उद्दीष्ट आहे. नजिकच्या भविष्यात ते आपण गाठू शकू. या परिषदांना आम्ही कंच्या इलय्या, दया पवार, मा.म.देशमुख, शरद पाटील, अर्जुन डांगळे, विष्णू सूर्य वाघ आदी मान्यवरांना बोलवत असू. मला आठवते, दयाकाका आपल्या भाषणात म्हणाले होते, "हरी, हे आपले विषय नाहीत. हे मलबारहिलवाल्यांचे प्रश्न आहेत. सध्या तरी अन्यायाचा प्रतिकार, अत्याचार विरोध, अनुदान आणि आरक्षण एव्हढेच आपले प्रश्न आहेत." त्यांची चूक नव्हती. आजही वंचित अनु. जाती, जमाती, बौद्ध, बहुजनांना हे विषय जवळचे वाटत नाहीत. त्यांना त्यात रसच नाही. (यालाही अपवाद आहेत, असतात..) त्यामुळेच बाबासाहेब हे जागतिक किर्तीचे अर्थशास्त्रज्ञ असूनही आंबेडकरोत्तर सामाजिक चळवळीत आर्थिक विषयांवर अर्थनिती पंचायत नी (SEM.) वगळता फारसे काम झालेले नाही.
तर मुद्दा आहे मंदिर सम्पत्तीचा-
तर मुद्दा होता, मंदिर सम्पत्तीचा. फुले-शाहू-आंबेडकरी अर्थनितीनुसार संपत्तीची निर्मिती श्रमातून आणि बौद्धिक परिश्रमातून होते. तिचे आणि निसर्गाने दिलेल्या संसाधनांचे समान वाटप होण्यासाठी साध्याच माणसांचा एल्गार उभा करावा लागेल.छ.शाहू आणि पंजाबराव देशमुख यांनी मंदिर संपत्ती सामान्यांचे शिक्षण, आरोग्य, निवारा, रोजगार यासाठी वापरा अशी सर्वप्रथम भुमिक घेतली होती. ९० च्या दशकात आपण ती चर्चाविषय बनवली. छोट्यामोठ्या आंबेडकरी पेपरात त्याच्या बातम्या येत असत. पुणे-मुंबई वगळता, परगावी बोललो तर तिकडच्या मुख्य धारेतील वृत्तपत्रातही बातम्या येत. कारण तिकडचे पत्रकार बहुजन असत. असतात. एके दिवशी मला नरूभाऊंचा फोन आला. (डॉ. नरेंद्र दाभोळकर ) ते बातमी वाचून परेशान झालेले. त्यांनी विचारलं, " हरी, तू मंदिर संपत्तीचा जो ८० हजार कोटी रूपयांचा आकडा सांगतोयस तो मला तरी अतिशयोक्त वाटतोय. मला वाटतं फार तर ८०० कोटी रूपयांची मंदिर संपत्ती असेल." एका कार्यक्रमात निळूभाऊ, डॉ. लागू, अमरापूरकर यांच्या उपस्थितीत मी हे बोललो. ते तिघेही सॉलिड प्रभावित झाले. परत नरूभाऊ म्हणाले, " हरी अतिशयोक्ती करतोय." त्यांना प्रामाणिकपणे असं वाटायचं की एव्हढी कुठली आलीय मंदिर संपत्ती?
त्याचं कारण त्यांच्या बालपणात दडलेलं होतं. ते म्हणायचे, " हरी, असं बघ, आपल्या प्रत्येक गोष्टीची सुरूवात कशी असते? एक आटपाट नगर होतं आणि तिथे एक गरिब ब्राह्मण राहात होता. ब्राह्मण म्हटलं की तो गरिबच असणार! त्याच्याकडे कुठला आलाय एव्हढा पैसा?" नरूभाऊंचं बरोबर होतं. पुर्वीच्या काळी कित्येक ब्राह्मण गरिब असत. त्यांची मुलं वार लावून, भिक्षुकी करून शिक्षण घेत असत. पण त्याच वेळी बहुतेक सर्व बडे जमिनदार, सावकार, अगदी पेशव्यांनाही कर्ज देणारे ब्राह्मणच असत.
आटपाट नगरात फक्त ब्राह्मणच गरिब कसे?-
ब्राह्मण जातीचा हा गुणधर्मच आहे की श्रीमंती ठेवावी झाकून आणि गरिबी सांगावी ओरडून. बघा ना, एकतरी गोष्ट अशी आहे का? की एक आटपाट नगर होतं आणि तिथे एक गरिब मराठा, माळी, आग्री, वंजारी, तेली, कोळी, सुतार, नाव्ही, मातंग, चर्मकार, (पुर्वाश्रमीचा) महार किंवा कैकाडी राहात होता? नाही.का? काय हे सगळे लोक त्याकाळात श्रीमंत होते? नाही. मग तशा गोष्टी का नाहीत?
२ कारणे असावीत असे मला वाटते,
एक गोष्टींचे सगळे लेखक ब्राह्मण होते,
दुसरे, ब्राह्मणांची गरिबीची व्याख्याच वेगळी होती.
म्हणजे असं बघा की, "अमक्यातमक्याला दूध नव्हतं म्हणून त्याच्या आईनं पिठात पाणी कालवून तेच दूध म्हणून पाजलं, अमक्यातमक्याच्या चपलेचा अंगठा तुटला तर तो शिवायला पैसेच नव्हते."
बहुजनांचं मुदलात असंय की पिठात पाणी कालवायचं तर पिठच नाही, आणि चपलेचा अंगठा तुटायला चप्पलच नाही. पण ही गारिबी कथासाहित्याचा विषय कधीही झाली नाही. कारण त्यावेळी बहुजनांची दु:खं मांडणारे फुले, बाबासाहेब, अण्णाभाऊ, बागूल, दया पवार, ढसाळही नव्हते आणि सानेगुरूजी, श्री.म.माटे, व्यंकटेश माडगूळकर, अनिल अवचटही नव्हते.
तेव्हा नोंदी महत्वाच्या, अनुभव नव्हे-
तेव्हा गरिबी असली नसली तरी ती साहित्य, चित्रपट, नाटकात, कथा. कादंबरी, कवितेत ती येणं अधिक महत्वाचं. बहुजनांनी ब्राह्मणांकडून आणखी एक गोष्ट शिकायला हवी. ते फुगीरी करीत नाहीत. कितीही पैसा (श्रीमंती) असली तरी ते तिचे प्रदर्शन मांडीत नाहीत. बहुजनांचं म्हणजे असण्यापेक्षा तिचा बाजार मांडण्यातच जास्त रस.
मला सांगा तुम्हाला एक तरी ब्राह्मण असा माहितीय की ज्याने किलोकिलो सोने अंगावर मिरवलेय?
आपल्याकडे बघा, गोल्डमन वांजळे, लांडे, दादा, काका, अप्पा, मामा आणि अमूकतमूक झाटूमल. आमच्या सगळ्यांना मिरवायची हौस. भयंकर दाखवेगिरी, फुगिरी आणि बाजारू मानसिकता.
ब्राह्मण पैसे निगुतीने खर्च करतील, योग्य ठिकाणी गुंतवतील, बारमध्ये ऎय्याशी करीत बाराबालांवर उडवणार नाहीत.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "७६ लाख कोटी रूपयांचं सोनं मंदिरांमध्ये पडून आहे. कोरोनामुळे देश अडचणीत आहे तर ते २ टक्के व्याजाने सरकारने कर्जाऊ ताब्यात घ्यावे. हिंदुत्ववादी किती पिसाळले. त्यांनी बहुजनांमधले अनेक पोपट पाळलेले आहेत. त्यांना त्यांनी चव्हाणांवर सोडले. लागले हे बहुजन दलाल बोलायला. गुलाम साले. कुर्हाडीचे दांडे गोतास काळ. ज्यांना गुलामीच्या बेड्या हेच अलंकार वाटतात अशा बहुजन, ओबीसी, अनु. जाती, जमातीच्या हिंदुत्ववादी चमच्यांबद्दल काय बोलावे?
माझे रोकडे ४ मुद्दे स्पष्ट करतो...
१) मंदिर संपत्ती म्हणजे सर्व धर्मिय उपासना स्थळांमधली संपत्ती मला अभिप्रेत आहे... त्यात मंदिरं, गुरूद्वारे, चर्च, मशिदी, अग्यारी, विहारं, मठ सारं सारं आलं. त्रावणकोरच्या (केरळ)
तिरूअंनतपुरममधल्या एकट्या पद्मनाभ मंदिरात काही लाख कोटी रूपयांची ($22 billion) संपत्ती सापडलेली आहे. ती केरळच्या बजेटच्या हजारोपट जास्त आहे.
एकट्या कर्नाटकात ४० हजार श्रीमंत मठ आहेत. देशात अंदाजे दहा लाख मंदिरं आहेत.
त्यावर पोसले जाणारे लाखो भिक्षुक हे देव, धर्म, देश यांचे नाव घेत बहुजनांना भ्रमित करीत असतात. संमोहित केलेले हे तथाकथित मराठा, माळी, आग्री, वंजारी, तेली, कोळी, सुतार, नाव्ही, मातंग, चर्मकार किंवा कैकाडी पोपट चूटपूट स्वार्थासाठी मालकांचे हितसंबंध सांभाळीत स्वकीयांचे बळी घेत असतात. हे विकले गेलेले दलाल म्हणजे किरकोळ सन्मान किंवा चार आठ आण्यात वेठबिगारी करणारे भुक्कड लोक असतात. काही तर यातले फुकट फौजदारी करीत असतात. बहुतांश बहुजन म्हणजे "बिन पगारी फुल अधिकारी. गर्वसे कहो, घंटा हिलाओ, तुम मुझे क्या खरिदोगे, मै तो यहा मुफ्त में उपलब्ध हूं!" आपली लढाई ब्राहमण पुजारी, वा बडव्यांशी नाही, खरी लढाई या बहुजन गुडघ्यांशी/ भ्रमिष्ठांशी आहे.
म्हणूनच ती जास्त अवघड आहे.
२) मध्यंतरी मी भोपाळला गेलो होतो. तिथल्या एका संस्थेने आपल्या नावात बदल करून संस्था या शब्दाऎवजी मंदिर असे परिवर्तन केलेले होते. चौकशीत असे समजले की त्या संस्थेला ( प्रॉपर्टी टॅक्स) म्हणुन भोपाळ मनपाला काही लाख रूपये दरवर्षी द्यावे लागत असत. संस्थेच्या नावात मंदिर शब्द जोडल्याबरोबर मनपाला कर तर द्यावाच लागत नाही, उलट सरकारकडून अनुदान मिळते.
सगळ्या शासकीय सुविधा मोफत किंवा अल्प दरात मिळतात. त्यामुळे मंदिरात देव-धर्म नाही तर आर्थिक हितसंबंध गुंतलेले नाहीत काय?
३) महात्मा फुले यांनी आमची लग्ने आम्ही लावू, भटजीला बोलावणार नाही म्हटल्यावर धर्म बुडाला असा कांगावा करीत ओतुरचे जोशी-कुलकर्णी कोर्टात गेले. बुडाला म्हणले धर्म, भरपाई मागितली रू.६/- म्हणजे भाषा धर्माची पण व्यवहार रोकडा पैशाचा हे खरे नाही काय?
बाबासाहेब म्हणायचे, "धर्मसत्ता ही मुलत: अर्थसत्ता आणि राजसत्ता आहे" याचे आकलन व्हायला बहुजनांच्या आणखी किती पिढ्या जायला लागतील?
४) पुजारी, धर्माधिकारी जर "हिंदु धर्माचे" आहेत, तर मग "सर्व हिंदुंना" शंकराचार्यपदी का बसू दिले जात नाही? का नियुक्त केले जात नाही? गुणवत्तेवर ह्या सर्व नियुक्त्या का केल्या जात नाहीत?
त्यासाठी सर्वांना खुली असलेली परीक्षा का ठेवली जात नाही? आजही पुण्यातल्या वेदभवनची जाहीरात काय असते? फक्त ब्राह्मण मुलांना प्रवेश मिळेल. का ब्राह्मण मुलींना का नाही? इतर हिंदुंनी काय पाप केलेय? त्यांना का प्रवेश नाही? ठेवा गुणवत्तेवर प्रवेश.
का ब्राह्मणांचा गुणवत्तेवर भरोसा नाही काय? होऊ द्याना, एखादा मराठा, माळी, आग्री, वंजारी, तेली, कोळी, सुतार, नाव्ही, मातंग, चर्मकार किंवा कैकाडी शंकराचार्य. होऊ द्याना त्यांना जगन्नाथ पुरी, पद्मनाभ,शबरीमाला, तिरूपतीचे प्रमुख पुजारी.
मला सातारा जिल्ह्यातले एक असे मंदिर माहित आहे की जिथे ३५५ दिवस पुजारी गावातला गुरव असतो. फक्त दहा दिवस हा अधिकार गावच्या ब्राह्मणाला असतो. ( यातली लबाडी अशी की वर्षातले ३५५ दिवस मंदिराला किरकोळ उत्पन्न असते. तेव्हा गुरव राबतो. मात्र नवरात्रात इकडे लाखो भाविक येतात. त्याकाळात निदान रू. २५ लाखांचे उत्पन्न मिळते. नेमके तेच दहा दिवस ब्राह्मणाच्या ताब्यात असतात.)
हिंदू धर्माच्या ठेकेदारहो, तुम्ही जर अहोरात्र, देव, धर्म, देशाचे ढोल वाजवता तर मग आज कोरोनामध्ये देश आणि सामान्य माणसं अडचणीत असताना मंदिर संपत्ती २ टक्के दराने सरकारला कर्जाऊ द्यायला तुम्ही का तयार नाही? तुम्ही देशद्रोही आहात आहात काय?
तुमचे देशप्रेम हा निव्वळ देखावा आहे काय? नाही ना? मग चला, सिद्ध करण्याची एक सुवर्णसंधी आलीय, व्हा तय्यार. व्हा खरे देशभक्त!
-प्रा.हरी नरके, २०/५/२०२०
संदर्भासाठी पाहा-
https://www.ndtv.com/photos/news/who-should-control-kerala-temples-22-billion-treasure--10860#photo-135723
Who should control Kerala temple's $22 billion treasure? Updated: July 05, 2011 18:12 ISTThe centuries-old Sree Pasmanabhaswamy temple in Thiruvananthapuram in Kerala on its way to become the richest shrine in India. Ornaments and valuables reportedly worth a whopping Rs. one lakh crore have already been recovered from the secret cellars of the temple. Now the big questions is, who should control all this wealth.
Inventory of the treasure
The Supreme Court of India had ordered an amicus curiae appointed by it to prepare an inventory of the treasure. Full details of the inventory have not been revealed. However, newspaper reports gave an indication of some of the possible contents of the vaults.[4] About 40 groups of objects were retrieved from Vault E and Vault F. Another 1469 groups of objects found in Vault C and 617 in Vault D. Over 1.02 lakh (102,000) groups of objects (referred to as articles collectively) were recovered from Vault A alone.
According to confirmed news reports some of the items found include:
A 4-foot (1.2 m) high and 3-foot (0.91 m) wide solid pure-golden idol of Mahavishnu studded with diamonds and other fully precious stones.[7]
A solid pure-golden throne, studded with hundreds of diamonds and precious stones, meant for the 18-foot (5.5 m) idol of deity
Ceremonial attire for adorning the deity in the form of 16-part gold anki weighing almost 30 kilograms (66 lb)
An 18-foot (5.5 m) long pure-gold chain among thousands of pure-gold chains
A pure-gold sheaf weighing 500 kilograms (1,100 lb)
A 36-kilogram (79 lb) golden veil
1200 'Sarappalli' pure-gold coin-chains encrusted with precious stones weighing between 3.5 kg and 10.5 kg
Several sacks filled with golden artifacts, necklaces, diadems, diamonds, rubies, sapphires, emeralds, gemstones, and objects made of other precious metals
Gold coconut shells studded with rubies and emeralds
Several 18th-century Napoleonic-era coins
Hundreds of thousands of gold coins of the Roman Empire
An 800-kilogram (1,800 lb) hoard of gold coins dating to around 200 BC[7]
According to varying reports, at least three if not many more, solid gold crowns all studded with
diamonds and other precious stones
Hundreds of pure gold chairs
Thousands of gold pots
A 600-kg cache of gold coins from the medieval period
While the above list is on the basis of reports describing the July 2011 opening (and later) of Vaults A, C, D, E and F, a 1930s report from The Hindu mentions a granary-sized structure (within either Vault C or Vault D or Vault E or Vault F) almost filled with mostly gold and some silver coins.[8]
..................................
https://en.wikipedia.org/wiki/Padmanabhaswamy_Temple
The Padmanabhaswamy temple is a Hindu temple located in Thiruvananthapuram, the state capital of Kerala, India. The name of the city of Thiruvananthapuram in Malayalam translates to "The City of Lord Ananta",[1] referring to the deity of the Padmanabhaswamy temple. The temple is built in an intricate fusion of the Chera style and the Dravidian style of architecture, featuring high walls, and a 16th-century gopura.[2][3] While the Ananthapura temple in Kumbla is considered the original seat of the deity ("Moolasthanam"), architecturally to some extent, the temple is a replica of the Adikesava Perumal temple in Thiruvattar.[4]
The principal deity Padmanabhaswamy (Vishnu) is enshrined in the "Anantha Shayana" posture, the eternal yogic sleep on the serpent Adi Shesha.[5] Padmanabhaswamy is the tutelary deity of the royal family of Travancore. The titular Maharaja of Travancore, Moolam Thirunal Rama Varma, is the trustee of the temple.
Temple assets
Hidden treasure worth billions of dollars discovered in Indian temple
The temple and its assets belong to Lord Padmanabhaswamy, and were for a long time controlled by a trust, headed by the Travancore royal family. However, for the present, the Supreme Court of India has divested the Travancore Royal Family from leading the management of the temple.[29][30][31][32] T P Sundararajan's litigations changed the way the world looked at the Temple.
In June 2011, the Supreme Court directed the authorities from the archaeology department and the fire services, to open the secret chambers of the temple for inspection of the items kept inside.[33] The temple has six hitherto known vaults (nilavaras), labelled as A to F, for book keeping purpose by the Court (Since, however, an Amicus Curie Report by Justice Gopal Subramaniam, in April 2014, has reportedly found two more further subterranean vaults that have been named G and H). While vault B has been unopened over centuries, A was possibly opened in the 1930s, and vaults C to F have been opened from time to time over recent years. The two priests of the temple, the 'Periya Nambi' and the 'Thekkedathu Nambi', are the custodians of the four vaults, C to F, which are opened periodically. The Supreme Court had directed that "the existing practices, procedures, and rituals" of the temple be followed while opening vaults C to F and using the articles inside, while Vaults A and B would be opened only for the purpose of making an inventory of the articles and then closed. The review of the temple's underground vaults was undertaken by a seven-member panel appointed by the Supreme Court of India to generate an inventory, leading to the enumeration of a vast collection of articles that are traditionally kept under lock and key. A detailed inventory of the temple assets, consisting of gold, jewels, and other valuables is yet to be made.
While vault B remains unopened, vaults A, C, D, E and F were opened along with some of their antechambers. Among the reported findings, are a three-and-a-half feet tall solid pure golden idol of Mahavishnu, studded with hundreds of diamonds and rubies and other precious stones.[34] Also found were an 18-foot-long pure gold chain, a gold sheaf weighing 500 kg (1,100 lb), a 36 kg (79 lb) golden veil, 1200 'Sarappalli' gold coin-chains that are encrusted with precious stones, and several sacks filled with golden artefacts, necklaces, diadems, diamonds, rubies, sapphires, emeralds, gemstones, and objects made of other precious metals.[35][36][37][38] Ceremonial attire for adorning the deity in the form of 16-part gold anki weighing almost 30 kilograms (66 lb), gold coconut shells studded with rubies and emeralds, and several 18th century Napoleonic era coins were found amongst many other objects.[3] In early 2012, an expert committee had been appointed to investigate these objects, which include lakhs of golden coins of the Roman Empire, that were found in Kottayam, in Kannur District.[39][40] According to Vinod Rai, the former Comptroller-and-Auditor-General(CAG) of India, who had audited some of the Temple records from 1990, in August 2014, in the already opened vault A, there is an 800 kg (1,800 lb) hoard of gold coins dating to around 200 BCE, each coin priced at over ₹2.7 crore (US$380,000).[41] Also found was a pure Golden Throne, studded with hundreds of diamonds and other fully precious stones, meant for the 18-foot-long Deity. As per one of the men, who was among those that went inside this Vault A, several of the largest diamonds were as large as a full-grown man's thumb.[42] According to varying reports, at least three, if not more, of solid gold crowns have been found, studded with diamonds and other precious stones.[43][44][45] Some other media reports also mention hundreds of pure gold chairs, thousands of gold pots and jars, among the articles recovered from Vault A and its antechambers.[46]
This revelation has solidified the status of the Padmanabhaswamy Temple as the wealthiest place of worship in the world.[47]
No comments:
Post a Comment