सत्यशोधक केशवराव विचारे हे महात्मा फुले यांच्यानंतर त्यांची चळवळ समर्थपणे पुढे नेणारे प्रमुख नेते.
वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी ज्यांनी आपली क्लास वनची सरकारी नोकरी सोडली आणि पुढे 38 वर्षे पुर्णवेळ सामाजिक काम केले.
सहकार शिक्षण, सामुदायिक शेती व उद्योग प्रकल्प उभारणी, कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग चालवणे, हजारो महिलांना वक्तृत्वाचे प्रशिक्षण देणे आदी कामांवर भर देऊन सामाजिक व आर्थिक पर्यावरण विकसित केले.
स्वत: मराठा समाजातले असताना लेकींची लग्नं आंतरजातीय करून दिली.
ज्या माणसाच्या महान कार्याचा गौरव मुक्तकंठाने वैकुंठलाल मेहता, शंकरराव किर्लोस्कर, सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे, गाडगेबाबा, भास्करराव जाधव, डा. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाहीरपणे केलाय त्यांना आज आपला समाज विसरलाय.
आज मी त्यावर बोलणार आहे.
मी 25 वर्षांपुर्वी त्यांच्यावर सर्वप्रथम लोकसत्तेत लिहिले.
त्यांच्या समग्र साहित्याचा धांडोळा घेऊन ते पुस्तक 20 वर्षांपुर्वी मी संपादित व प्रकाशित केले.
त्यांनी घडवलेले विद्यार्थी म्हणजे प्रा.एन.डी.पाटील, शाहीर फरांदे, शाहीर लाहीगुडे, राजारामबापू पाटील आणि त्यांच्या नापास विद्यार्थिनी म्हणजे शालीनीताई पाटील.
त्यांच्या कामाची पद्धत कळावी म्हणुन एक उल्लेख - त्यांनी बहुजन समाजातील महिला वक्ते तयार केले. त्यात मराठा, वडार, मातंग,चर्मकार अशा अनेक वक्त्या होत्या. त्यातील अनेकजणी कोल्हापुरातील बिंदू चौकात हजारोंच्या सभेत भाषणे करीत.
वर्गात भाषणाची कला शिकवून ते मुलींना/महिलांना प्रत्यक्ष बोलायला लावित असत. ज्या बोलायला घाबरत त्यांनी स्टेजवर जाऊन, "मला बोलता येत नाही पण मी लवकरच शिकेन"
एव्हढे तरी बोललेच पाहिजे असा त्यांचा नियम होता.
त्यांच्या सुनबाई कमलताई विचारे यांच्यामुळे मला सत्यशोधक च्ळवळीवरील संशोधनकार्य करता आले.
आजच्या जातीय विषाने भारलेल्या ब्रिगेडी वातावरणात किती मराठा मित्रांना हे माहित असेल?
No comments:
Post a Comment