Wednesday, March 15, 2017

मनोहर पर्रिकर

गोवा आणि महाराष्ट्र सख्खे शेजारी आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, मुख्यमंत्रीपद सोडून देशाचे संरक्षणमंत्री झाले. शरद पवारांनीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले. मनोहर पर्रिकर यांचीही वाटचाल याच मार्गे झाली.
मात्र शरद पवारांना देशाच्या संरक्षणमंत्रीपदावरून पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रात परत पाठवले किंवा त्यांना यावे लागले काहीही म्हणा.
मनोहर पर्रिकरही गोव्याला पाठवले गेलेत की परतले आहेत?
त्यांची कोणाला अडचण होत होती? पीएमोला की रिलायन्सला?
महाराष्ट्र हे देशातले उ.प्र. खालोखाल सर्वाधिक खासदार निवडून देणारे राज्य आहे. तर गोवा सर्वात कमी.
पर्रिकरांकडे नमोंचे महत्वाचे वारसदार म्हणुन पाहिले जात होते. मग त्यांचे डिमोशन का झाले?
परतल्यावर पवारांची जी उतरण सुरू झाली ती आजवर थांबलेलीच नाही.
पर्रिकरांचे काय होईल? त्यांची काही विधाने वादग्रस्त ठरली असली तरी हा स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे. अतिशय साधा आणि निगर्वी आहे. मुख्यमंत्री पदावर असतानाही ते सायकलवर किंवा स्कूटरवर फिरायचे.
गोवा त्यांना पुन्हा दिल्लीला पाठवणार?
हा आपदधर्म आहे की शाश्वत धर्म?
बघावे लागेल.

No comments:

Post a Comment