"शेतकर्याच्या मदतीसाठी आम्ही पैसा कमी पडू देणार नाही, प्रसंगी तिजोरी खाली करू, लागलं तर वर्ल्ड बॅंकेकडून कर्ज काढू पण शेतकर्याला वार्यावर सोडणार नाही," हे निवडणुकीतलं भाषण होतं अध्यक्षमहाराज, ते खरं थोडंच मानायचं असतं?
आम्ही आज खरच जर कर्जमाफी केली तर सातवा वेतन आयोग कसा लागू करणार ? हजारो कोटींची स्मारकं कशी उभारणार ? जाहीरातीवर कोट्यावधी कसे उधळणार? आणि एका आर्थिक वर्षात 35000 कोटी रूपये तूट असताना राज्य कसं चालवणार अध्यक्षमहोदय?
तेव्हा विरोधक जर हे राज्य चालवायची हमी घेत असतील अध्यक्षमहोदय, तर सकारात्मक, प्रामाणिक आणि पारदर्शक विचार करता येईल अध्यक्षमहाराज!"
No comments:
Post a Comment