सुपरस्टार दिलीपकुमारचा विमानप्रवास
अभिनेता दिलीपकुमार लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाचा काळ होता. एके दिवशी त्याला मुंबईचे शूटींग संपवून संध्याकाळच्या फ्लाईटने दिल्लीला
जायचे होते. सामान्यपणे विमान कोणासाठीही थांबवून ठेवले जात नाही, परंतु खुद्द कॅप्टन आणि विमानातले सगळेच कर्मचारी दिलीपकुमारचे फॅन होते. आणि दिलीपकुमारची इंट्री झाली. सगळ्यच प्रवाशांनी त्याचे जोरदार स्वागत केले. त्यानं सर्वांना अभिवादन केलं.
बिझनेस क्लासमध्ये तो बसला तेव्हा त्याच्या लक्षात आलं आख्खं विमान आपल्याकडं बघतय. मात्र शेजारच्या म्हातार्याला त्याची काहीच खबर नव्हती. तो पेपर वाचत बसला होता.
दिलीपकुमारनं मुद्दामच उठून खाली बसताना तोल गेला असं दाखवत म्हातार्याला धक्का मारला. पेपरमधून डोकं बाहेर काढत म्हातारा दिलीपकुमारकडं बघून हसला आणि परत पेपर वाचू लागला. हा अपमान दिलीपकुमारला फारच झोंबला. बघून परत पेपर वाचत बसतो काय? त्यानं पुन्हा तसंच केलं. म्हातार्याकडं बघत सांगितलं, "मी सुपरस्टार दिलीपकुमार."
ते वृद्ध गृहस्थ अतिशय नम्रतेनं म्हणाले, " हो का. धन्यवाद. बाय दे वे काय करता आपण?"
दिलीपकुमार म्हणाला, " तुम्ही सिनेमे पाहात नाही?"
ते म्हणाले, "नाही हो, मी या वयात फक्त अठराच तास काम करू शकतो. अनेक वर्षांपुर्वी मी शाळेत असताना माझ्या आईसोबत एक बघितला होता. तोच एकमेव."
दिलीपकुमारचा इगो दुखावला गेला. " तुम्ही आहात तरी असे कोण?"
ते वृद्ध अतिशय आपुलकीनं म्हणाले, " तरूण मुला, माझं नाव जे. आर. डी. टाटा. मी एक सामान्य उद्योजक आहे."

No comments:
Post a Comment