Showing posts with label जातजाणिव. Show all posts
Showing posts with label जातजाणिव. Show all posts

Monday, June 15, 2020

२ री यादी- We Two आम्ही दोघे नांदतो सुखाने : आंतरजातीय विवाहीत-प्रा.हरी नरके

आंतरजातीय विवाह या विषयावरील माझ्या पोस्टला अतिशय भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यातून (माझ्या तीन फेबु खात्यांवर, फेबु पेजवर व ट्विटरवर मिळून) ५०० पेक्षा अधिक जोडप्यांची नावे पुढे आली. मी पहिल्या यादीत ज्यांची नावे लिहिलेली होती, त्यातले जे लोक फेसबुकवर आहेत त्यातल्या ९०% + लोकांनी ही पोस्ट अद्याप वाचलेली दिसत नाही. त्यांच्याकडून प्रतिसादाच्या स्वरूपात त्यांच्या माहितीतली आणखी नावे यायला हवी होती. ती आलेली आढळत नाहीत. ते फार मोठे लोक आहेत (सेलिब्रिटी आहेत.) बहुधा त्यांचा असल्या किरकोळ गोष्टीतला रस संपल्याने अथवा हा विषय त्यांच्या दृष्टीने कालबाह्य झालेला असल्याने त्यांनी प्रतिसाद दिलेला नसावा. कदाचित ते इतर महत्वाच्या कामात व्यग्र असतील. पण जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा ते ही पोस्ट वाचतील व नावांची भर घालतील अशी आशाय. असो... ज्यांनी स्वत:ची वा माहितीतली नावे कळवून बहुमोल प्रतिसाद दिला त्यांचे मन:पुर्वक आभार. ज्यांनीज्यांनी आंतरजातीय विवाह केलेला आहे, त्यांच्यामध्ये आपण एकटे नाही, आजूबाजूला आपले "सगेसोयरे"  बरेच आहेत याची जाणीव होऊन सुरक्षिततेची भावना या उपक्रमामुळे वाढेल.

बरेच लोक निवांतपणे रिअ‍ॅक्ट होतात. त्यांच्याकडची नावे १५ दिवसांनी येतील.

आलेली सर्व नावे आपण माझ्या पोस्टच्य कमेंट्समध्ये बघू शकता. विशेष म्हणजे यातले काही विवाह घरच्यांच्या संमतीने झालेले आहेत. बरेच प्रेमविवाह आहेत तर काही ठरवून केलेले आंतरजातीय विवाहही आहेत. काही कुंटुंबात दुसरी किंवा तिसरी पिढीही आंतरजातीय विवाह करायला पुढे आलेली दिसते. बदल होतोय. सनातन्यांनो, तुम्ही खुशाल तुमचं कोंबडं झाकून ठेवा, समतेचा सुर्य उगवणारच. जातींचा अंधार हटणारच.
काही लोकांना क्रांतीची घाई झालेली असल्याने त्यांनी जाती टाकल्या आता धर्म कधी टाकता, अमूक कधी करता, तमूक कधी करता असल्या प्रश्नांची तोफ ढागलीय. ( स्वत: काहीच न करणारे आणि फक्त उंटावरून सल्ल्यांच्या शेळ्या हाकणारे बरेच असतात.) हजारो वर्षांचे सामाजिक निर्बंध उठवून जातीबाहेर पडण्याचे बंड करणे, जातीच्या सीमा ओलांडणे हे काम सोपे नाही. कृपाकरून एकाच पिढीत त्यांच्याकडून सगळ्या भिंती तोडायची अपेक्षा करू नका. काही लोकांचा आंतरजातीय विवाहांना नानाविध कारणांनी विरोध आहे. असू द्या. लोक त्यांना जुमानण्याच्या मन:स्थितीत नाहीत.


*** जगात ८०० कोटी लोक आहेत. याचा अर्थ प्रत्येक युवक-युवतीला निवडीला ४०० कोटीमधून वाव आहे. फक्त भारताचा जरी विचार केला तरी १४० कोटी लोकसंख्या म्हणजे ७० कोटीमधून निवड करण्याऎवजी एखादी जात म्हणजे काही लाख किंवा हजारातून निवड करण्याची सक्ती स्विकारून तुम्ही आपला चॉईस कमी का करून घेताय? द्या झुगारून बंधनं आणि करा मोठ्या संख्येच्या जगातून निवड. जात, धर्म, भाषा, प्रदेश, वंश, गरिब-श्रीमंत हे काही खरं नव्हे. मानव तितुका एकच आहे गड्यांनो!


( सिनेमजगत, क्रिकेट, राजकारण, अशा वलयांकित क्षेत्रातील कित्येक नावे आली असली तरी त्यातली प्रातिनिधिक तेव्हढीच इथे घेतलीत. ) सेलिब्रिटींपेक्षा सामान्य माणसांनी हे धाडस करणे मला जास्त महत्वाचे वाटते. ज्या गोष्टीसाठी आजही निर्घृण हत्त्या होतात, सामाजिक छळ, बहिष्कार वाट्याला येतो, त्याला न घाबरता ५०० लोकांनी आपली नावे जाहीर करणे हेच एक धाडशी पाऊल आहे असे मी मानतो.... मित्र गणेश कनाटे यांनी जातीनिर्मुलनासाठी काही महत्वाच्या सुचना केलेल्या आहेत. ( Ganesh Kanate अत्यंत प्रभावी कृती म्हणून तीन गोष्टी सगळ्या जातींतल्या मुला-मुलींनी केल्यास दोन-तीन पावलं पुढे पडतील, अशी एक आशा वाटते.
१) ठरवून आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह
२) मुलांच्या जन्मानंतरच्या पहिल्या प्रमाणपत्रापासून त्यावर जातीचा आणि धर्माचा रकाना रिकामा ठेवणे
आणि
३) मुलांना आडनावं न देणे.)

धन्यवाद गणेश.

नावांमध्ये लिहिताना काही चुका झालेल्या असतील तर नजरेला आणून द्याव्यात. दुरूस्त करू.

आलेल्यातली काही व माझ्याकडची आणखी काही नावे पुढीलप्रमाणे-


(१) पु. ल. देशपांडे-सुनिता ठाकूर, (२) व्यंकटेश माडगूळकर, (३) राजेंद्र बहाळकर- वंदना वैद्य (४) जयंत गायकवाड,  (५) तिस्ता सेटलवाड जावेद आनंद, (६) प्रेमानंद रुपवते-स्नेहजा रुपवते, (७) दीनानाथ मनोहर, (८) बालाजी सुतार,  (९)निला लिमये - भीम रासकर,  (१०)सुवर्णा भुजबळ- सुरेश सावंत,  (११) गायत्री अमदाबादकर-गणेश कनाटे, (१२) शिवाजी सावंत, (१३) मिलिंद आवाड,  (१४) डॉ. प्रदीप गोखले,  (१५) अरूण टिकेकर, (१६) नागराज मंजुळे, (१७) रणजित देसाई- माधवी पेंढारकर,  (१८) अर्जुन कोकाटे-सुधा जोशी,  (१९) मंगेश पाडगांवकर,  (२०) समर खडस



(२१) सी. डी. देशमुख  (२२) सुनिल दत्त-नर्गिस  (२३) संजय अपरांती   (२४) करण थापर-निशा मेनेसेस  (२५) मोहम्मद अझरुद्दीन (२६ ) उर्मिला मार्तोडकर (२७ ) प्रियंका चोप्रा (२८ ) डॉ. पंजाबराव देशमुख  (२९) भक्ती बर्वे-शफी इनामदार (३० ) शंकर महादेवन  (३१) प्रगती बाणखेले- संतोष कोल्हे, (३२) मोहन गुंजाळ, (३३) मुकुल वासनिक-रविना खुराणा  (३४) सचिन पायलट   (३५) विलास सोनावणे, चिंचवड, (३६) विक्रम गायकवाड-सुवर्णा चव्हाण, नाशिक (३७) विजय मांडके- शकुंतला मांडके (३८ ) समता माने- बोराटे, (३९) आशा भोसले,    (४०) स्मिता पाटील- राज बब्बर,


(४१ ) अशोक चव्हाण- अमिता,  (४२) जयंत पवार (जेपी) (४३) अभिजीत पवार (सकाळ) (४४ ) ज्योत्स्ना निगम- हरिश सपकाळे  (४५) इंदिरा गांधी, (४६ ) सोनिया गांधी, (४७)  मनेका- संजय गांधी (४८) प्रियंका गांधी - रॉबर्ट वाड्रा (४९)   इरफान खान - सुतापा सिकदर (५०) अ‍ॅड. सयाजी शिंदे, (५१) पन्नालाल सुराणा - वीणा (५२) बंडू गोरे- मृणाल गोरे, (५३) डॉ . राम गायकवाड  (५४) अ‍ॅड. तथागत कांबळे- अ‍ॅड. सुष्मिता दौंड, (५५) अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते- अ‍ॅड. जयश्री पाटील  (५६) डॉ. हर्षदीप कांबळे (५७) एकेडी जाधव- राणी जाधव, (५८) प्राजक्ता लवंगारे वर्मा (५९) प्रविण परदेशी (६०) प्रविण दराडे- डॉ. पल्लवी दराडे, गेडाम


(६१) चित्कला झुत्शी (६२) डि. के. शंकरन- डॉ. जॉयस शंकरन (६३)  डॉ. अभय बंग- डॉ. राणी बंग (६४) सुलभा जोर्वेकर-उल्हास पाटील (६५ ) अजित सरदार-वसुधा (करमरकर) सरदार (६६)  डॉ समाधान इंगळे अमरजीत बाहेती  (६७) हनुमंत पवार - सपना कंदले  (६८) योगेश काणे-पुजा (६९) शर्मिष्ठा भोसले - सदानंद घायाळ ( ७०) सलीम शेख-विजया जाधव (७१) शितल साठे-सचिन माळी,  (७२)राजश्री चव्हाण- प्रवीण दामले,   (७३) जॅकलिन डोळस - अविनाश डोळस (७४) चंदु जगताप-श्रद्धा जोशी  (७५) मोहन गुंजाळ,   (७६) विजय तरवडे शोभा राऊत  (७७) Dr Prashant rokade- Sujun hade (७८) Mahendra Mahagaonkar (७९) टीना दाबी- अथर खान (८०) रणजित परदेशी-सरोज कांबळे,


(८१) उमेश बगाडे-तिलोतमा झाडे (८२) रवींद्र साळवे - नीता चांदेकर (८३) Varsha Kale- Ankush Deshpande (८४) प्रशांत पवार - सविता ठाकूर (८५) अमृता सुभाष  (८६) रतन दादाभाई टाटा  (८७) डॉ. कैलास गौड - डॉ मेधा (८८) प्रा.संध्या रंगारी - श्री. रमेश कदम (८९) लिलाताई पाटील बापूसाहेब पाटील  (९०) प्रधान सुशील-साधना रेडकर (९१) कॉ. स्मिता पानसरे - कॉ. बन्सी सातपुते (९२) अॅड अभय टाकसाळ , (९३) कृष्णात स्वाती - स्वाती कृष्णात  (९४) अक्षय इंडिकर - तेजश्री कांबळे (९५ ) मुक्ता चैतन्य (९६) संघराज रुपवते  (९७) सुलभा जोर्वेकर-उल्हास पाटील (९८) विष्णू श्रीमंगले - कीर्ती बडवे (९९) सम्यक विमल मसू - अर्चना कुलकर्णी (१००) प्रफुल्ल शशिकांत - शिल्पा प्रफुल्ल


(१०१) अमृत बंग - आरती बंग (१०२) आरजु तांबोळी - विशाल पोखरकर (१०३) सतीश देशपांडे - अश्विनी फुंदे (१०४) संदीप शिंदे - अर्चना पिंपळकर (१०५) कुणाल शिरसाठे - तेजल कांबळे (१०६) अनिल जायभाये - मयुरी सामंत  (१०७ )प्रियंका माने - समाधान पाबळे (१०८) रणजित आचार्य - विद्या हतोलकर (१०९) विशाल लामतुरे - वर्षा कांबळे  (११०) राजन दांडेकर - क्रांती पोतदार (१११) परमेश्वर जाधव - मनीषा जाधव (११२) जितू लोकायत - कल्याणी लोकायत (११३) किशोर खोबरे - निकिता चांडक (११४) आरती नाईक - महेंद्र नाईक (११५) इब्राहिम शेख - श्रुती पानसे (११६) प्रणाली सिसोदिया - अद्वैत दंडवते (११७) पूजा देवगडे - विक्रम पटेल (११८) नंदू देवगडे - श्यामला देवगडे (११९) अमृता कुलकर्णी - विशाल गुरव (१२०) सुनीता गांधी - महेंद्र इंदुलकर


(१२१) अतुल शर्मा - सुषमा पद्मावार (१२२) गोपाळ गुणाले - कीर्ती मठकरी (१२३) पूनम पाचंगे - सतीश जाधव (१२४) सागर पाटील - ऋतुगंधा देशमुख (१२५) श्वेता वानखेडे - महेश लाडे  (१२६) रवी केसकर- भाग्यश्री वाघामारे (१२७) संतोष बुरंगे- रेखा बुरंगे (१२८) संध्या फुलपगार- महेश अचिंतलवार (१२९ ) आश्विन भालेराव - कांचन दुर्गकर (१३०) शारदा भालेराव - राहूल दिवांग (१३१) सुमित कारंडे - मोनिका मोरे (१३२) राजेश खन्ना- डिंपल कपाडीया  (१३३)  बाळू चोपडे-कुलगुरू  (१३४)  संजय मोने - सुकन्या कुलकर्णी (१३५)  आनंद शिंदे-गायक  (१३६)  मनोज वाजपेयी  (१३७)  हृतिक रोशन  (१३८)  ओमर अब्दुल्ला  (१३९)  शनवाज हुसेन  (१४०) मुक्तार अब्बास नक्वी


( १४१) अजित आगरकर (१४२)  झहीर खान-सागरिका घाटगे (१४३)  सचिन तेंडुलकर-अंजली मेहता (१४४) मोहम्मद कैफ (१४५)  सुहासिनी हैदर (१४६)  शर्मिला टागोर-पतौडी  (१४७) सोहा अली खान-कुणाल खेमु (१४८) विद्या बालन  (१४९) भाग्यश्री पटवर्धन, (१५०) मस्तानी-बाजीराव, (१५१) तुकोजीराजे होळकर, (१५२) जुही चावला, (१५३) किशोरकुमार - मधुबाला, (१५४)  सुनिल गावस्कर, (१५५) डॉ विकास महात्मे (१५६) Prasad Chougule (१५७) राजेंद्र कांबळे - कल्पना कांबळे इजंतकर (१५८)  अविनाश गाडे - धनश्री मेटकरी (१५९)  प्रमोद गोसावी - विद्या कांबळे (१६०) डॉ. राकेश गावतुरे - डॉ. अभिलाषा बेहेरे


( १६१) Manisha Prabhu (१६२) प्रशांत वाघमारे -नीलम साळुंखे (१६३) बेबी लांडे-कॉ.सुभाष लांडे. (१६४) शहनाज(शर्मिला)-सुनील गोसावी (१६५) सुधीर नरके - मीरा (१६६) Ravindra Medhe  (१६७  )  उपेंद्र टण्णू  (१६८) विजय वावरे- शबाना; (१६९) उत्कर्षा रूपवते- प्रशांत सलियान,   (१७०) Sagar Shaila Raghunath (१७१) पुष्पा क्षीरसागर (१७२) शितल माकर - आशिष चव्हाण (१७३)  संजय गायकवाड - मंगला भुजबळ,               (१७४) सतीश देशपांडे- अश्वीनी फुंदे( १७५) अॅड आरती राव -Mahesh Shirtode (१७६) गणेश भांगरे -  शमीम शेख, (१७७) रजत अवसक - अश्विनी  (१७८) ऋषाली आरोटे - सुतार, (१७९) माया मंडलिक - महेश, (१८०) नवले - गुजर,


(१८१) प्रतीक हुळवळे, (१८२) प्रा. वीणा- उदय जोशी, (१८३) प्रा. अविनाश कांदेकर- प्रा. स्मिता, (१८४) प्रकाश पोळ - प्रा. अनुराधा परदेशी, (१८५) प्रदीप बच्छाव, (१८६) किशोर सोनवणे,  (१८७) Nitin Gore (१८८) दिव्या भारती-साजिद नाडीयलवाला (१८९) अमोल आडसुळे - मिरा मल्लिक (१९०) राजू देसले- सुवर्णा, (१९१) adv राजपाल शिंदे- चित्रा, (१९२) नीतीश डावरे- कल्याणी (१९३) सुप्रिया गीते-सुरेश जोर्वेकर (१९४) माया लखवानी-विनोद भोईर (१९५) बेबी बेल्हेकर-भास्कर जगताप (१९६) विद्या पाटील-गिरीश चौक (१९७) सुनिता राठी-अनिल पाठक(१९८) निलेश कुलकर्णी - सुरेखा भालेराव, (१९९) प्रमोद वागदरीकर-कुमुद साळवे (२००) मेघना दगडे-प्रीतम कोटकर


(२०१) संध्या पवार-मिलिंद खेडेकर (२०२) Satish Makasare    (२०३) रुपराव नाटेकर- रोशनी आत्राम (२०४) सत्यवान हरी टण्णू (२०५) अजय सीताराम टण्णू (२०६) मिलींद सीताराम टण्णू (२०७) चारूशिला ज्ञानेश्वर टण्णू ( २०८) हर्षल अजित टण्णू (२०९) प्रशांत सातपुते  (२१०) कमलेश खरे- कंचन  (२११) Santosh Adsule- Megha Gaikwad  ( २१२) नरेंद्र चावरे- वर्षाराणी वाघमारे (२१३) लीना डुबल - लीना प्रशांत कहार  (२१४) Nishant - Vijaya Bhaskar Jadhav (२१५) Priyanka Revansiddha Chaudhary- Hitesh Suresh Ramwani (२१६) मधुरा तांबे  (२१७) कृतिका चव्हाण - सावंत (२१८) अविनाश महातेकर - अलका दामले (२१९) शिवाजी लांडे - मंदा दाणी (२२०)  कतुषा लांडे - चंद्रवदन गायकवाड


(२२१) अजय लांडे- सोनाली कमोद (२२२) राहुल नाईक - नेहा मोगरे (२२३) सुभाष लांडे- बेबी शिंदे, (२२४) हमीद शेख- लता काळे (२२५) लालासो पाटील-शकिला शेख, सांगोला (२२६) प्रकाश पोळ-अनुराधा परदेशी (२२७) शोभा चव्हाण  (२२८) अमित चंद्रमोरे (२२९) महेश चव्हाण (२३०) रुपाली रोटे-सोनावणे (२३१) राहुल यशवंते (२३२) अनिता बधान-जयवंत हिरे (२३३)  (२३४)  असिफ शेख( २३५) फिरोज खान (२३६) अनिल मोरे- रामेश्वरी शिंदे (२३७) मिलिंद शिंदे (२३८) संदिप शार्दुल (२३९) विलास रुपवते (२४०)  संजय जाधव-संगीता


(२४१) नितिन जाधव (२४२) विपुल हिरे-सुगंधा (२४३) फकिरा आहिरे (२४४) अशोक ससाणे-सुनंदा एळींजे (२४५) प्रणालि एळींजे- परमित वाघ (२४६) सुमित कारंडे - मोनिका मोरे (२४७) सागर झोलेकर, (२४८) संघराज रुपवते - जीना,  (२४९) सुबोध मोरे (२५०) किर्ति ढोले-सरमळकर  (२५१) सुनील सरदारे-निशी सरदारे (२५२) चित्रा एळींजे (२५३) सखु एळींजे-दास (२५४) दीपाली वाघ-शंतनु कांबळे (२५५)  सारिका-किशोर कर्डक( २५६) आनंद हरीभाऊ हिरे (२५७) संतोष गौतम कांबळे(२५८) प्रविण संदानशीव (२५९) गजानन भगत (२६०) प्रा.रमेश कांबळे


( २६१)  सुरेंद्र अ बनसोडे-शुभांगी जोशी ( २६२) डॉ. राहुल नेत्रगावकर - शिवनंदा पाटील (२६३) नवीन देशमुख - मधुरिमा (२६४) Vimaltai mundada- Nandakishor (२६५) Ashish Chandanshive - पूजा सावंत (२६६) अमोल सावंत-- बीकी राऊळ (२६७) सागर सावंत -- हर्षा (२६८) दिक्षा गावंडे (२६९) सागर कांबळे (२७०) शीला गांगुर्डे--देविदास कंजे (२७१) दर्शना साळवे-- नितीन निचळ (२७२) Ajit Agarkar (२७३) Dhiraaj Deshmukh (२७४) Amit Deshmukh (२७५) उषा- प्रकाश रोकडे (२७६) तुषार- तृप्ती मराठे (२७७) पिंकी मोडक- शेख (२७८) दिव्या मोहकर- मयुर बेलवले (२७९) रमेश कोष्टी (२८०) उमेशचंद्र मेश्राम,


(२८१) अमित गोसावी, (२८२) रुपेश नाईक, (२८३) बनसोड (२८४) अभिजीत हिरप - मनिषा मेश्राम (२८५) प्रभाकर बारहाते - अरुणा खरात (२८६) मनोज टाक - नीलिमा पाका (२८७) किरण कांबळे - सविता भईरट (२८८) किरण दीक्षित - प्रसाद खेकाळे (२८९) संतोष पवार - शालिनी राऊत (२९०) स्मिता पाटील - संतोष अवसरमोल (२९१) हेमंत कारले - संगीता कुलकर्णी (२९२) दिनेश भोयर - प्रज्ञा मनवर (२९३)Satish Panpatte (२९४) Renuka Tammalwar -Harshad Ravikar (२९५) वैशाली सौन्दनकर- महेश क्षीरसागर (२९६) धनश्री सौन्दनकर- चंद्रशेखर आदमाने (२९७) अमित वेल्हेकर- नेहा मार्वे (२९८) ऍड. महेंद्र सन्दनशिव - ऍड अंजली (२९९) कल्पना सुर्यवंशी - खिजेंद्र गेडाम (३००) स्वप्नील इंगळे- निशा सिरसाट


(३०१) धनंजय बनसोड - रोशनी  (३०२)  (३०३) लौकिक माने - डॉ. हर्षद आढाव (३०४) प्रकाश सांगवीकर - अंजली कुलकर्णी (३०५) ॲड. डॉ. सुभाषचंद्र पाटणकर - डॉ. प्रतिभा सुभाषचंद्र पाटणकर (सुनिता सावरकर)  (३०६) Sanjay Vishnu Sathe (३०७) कॉम्रेड राम बाहेती (३०८) डॉ.स्मिता अवचार (३०९) Pooja Natu Gaikwad -Yogesh Gaikwad (३१०) सोहम गायकवाड - अमृता सुरवसे (३११) शुभांगी त्रिभुवन - रोहन खैरे (३१२) रहीम सौदागर - गुड्डी भिंगारे (३१३) Dr Narendra Jadhav - Vasundhara (३१४) दिलीप चव्हाण-सुप्रिया गायकवाड (३१५)किशोर ढमाले-प्रतिमा परदेशी (३१६) राजू जाधव-संगीता ठोसर (३१७) किशोर जाधव-शुभांगी कुलकर्णी (३१८) मयुरी सामंत-अनिल जायभाय (३१९) Deepraj Gaikwad - Babasaheb Ghodke (३२०) Pankaj Gaikwad - Nikita

(३२१)Tejas M - Swati Mahajan, (३२२) Ashutosh Bankhele- Vrushali Shardul (३२३) Sneha Dive (३२४) Abhijeet valhe - Shital Yelve (३२५) रोशन गजभिये-सारिका (३२६) डॉ. सुरभी गजभिये-डॉ.पवन, ( ३२७) प्रतीक गजभिये -सोनाली, (३२८) प्रदीप रामटेके - संगीता, (३२९) रणजीत रामटेके - शोभना (३३०) अशोक मेश्राम-सविता घोडे, (३३१) गायत्री जवरकर-सुनील सातपुते, (३३२) रुपाली तेलतुंबडे, (३३३) कैलाश वाघमारे - मीनाक्षी राठोड (३३४) मारोती खंदारे-सरिता शर्मा (३३५) स्नेहा गिरी- सोनू अग्रवाल (३३६) अमृता कदम - सौरभ मेहता (३३७) आश्लेषा कदम - सुयश सिंग (३३८) Rajani Bhagat (३३९) श्रीराम गावंडे (पाटील) - उषा लोडाया (३४०) दुर्वेश जावळकर - रुद्राणी मिश्रा


(३४१) राहुल खोना- अभिलाषा पंत  (३४२) अॅड. राधिका इंगोले (पाटील) - चिराग ठक्कर (३४३) आदित्य दामले - रोहिणी (ऋजुता) गायकवाड  (३४४) Gautam Jadhav - सरोज नाईक (३४५) मृणालिनी आहेर -अजित गाढवे (३४६) अजय नवले -वैशाली मंडलिक (३४७) सचिन रोकडे - मनीषा प्रभू (३४८) मीनल पिंपळे-निकुंज बन्सल (३४९) जितेंद्र बनसोडे -पूजा पवार (३५०) वनिता ताठे -आनंद त्रिपाठी  (३५१) वैशाली घोरपङे- सुजीत रासकर (३५२) Mayur Chandorkar (३५३) Sanjay Navgire (३५४) Ujwal Kadam - Pinto  (३५५) देविदास पोळके - सरोज जगताप (३५६) सुहास फरांदे- देवयानी फरांदे, (३५७) नवनीत कौर- रवी राणा, (३५८) दीपाली कोतवाल-दुर्वास पाटील (३५९) प्रभाकर सांगळे-स्मिता दफ्तरदार (३६०) विजय सांगळे- गीता कुमठा


(३६१) बिपीन सांगळे- नीलम जैन (३६२) अभिजित सांगळे- प्रिया दळवी (३६३) डॉ. प्रीती सांगळे- डॉ. अश्विन गर्ग (३६४) डॉ. राहुल सांगळे-डॉ. वंदना जैन (३६५) रमेश जाधव -सोनल देशमुख. (३६६) प्रा.शैलेश बनसोडे (३६७) प्रा.व्यास (३६८) चंद्रकांत शिंदे, (३६९) प्राचार्य सीताराम गोसावी- प्रा.सीमा नाईक (३७०) आल्हाद काशीकर- स्वाती कोहे (३७१) रोहिणी गोसावी - अभिजीत देवकर (३७२) माया गोसावी - सुरज भुजबळ  (३७३) Dr Supriya Pandit Dr Amit Pedgaonkar (३७४) Santosh Parad (३७५) पंकज वाहोकार- उमा माने (३७६) सुनील इंगोले - जया भारती (३७७)  गुलाब वाघमोडे,   (३७८) परीत्याग रुपवते - अर्चना (३७९) बंधमुक्ता प्रेमानंद रुपवते - अर्शद खान , (३८०) ऊत्कर्षा प्रेमानंद रुपवते - प्रशांत सालियन


(३८१) चिरंतन संघराज रुपवते  (३८२) अपूर्व संग्राम रुपवते (३८३) दिक्षा मिलिंद गायकवाड (३८४) डॉ. गुड्डी कोळगे (३८५) युगांतर बळ्ळाल (३८६) स्वराज मिलिंद गायकवाड (३८७) Krushna More  (३८८) निलेश शिंदे - कल्याणी पवार  (३८९) प्रशांत महाले - डॉ. शीतलप्रभा मोरे  (३९०) भारती खरटमल - सतिश वानखेडे  (३९१) पद्मावती अर्धापुरे - बालाजी दमकोंडवार  (३९२) चारुशीला महाजन - दिपक संदानशिव  (३९३) गौरव कांबळे -वासंती पाटील  (३९४) Kundlik Khetri  (३९५) Adv Sunil Rathod (३९६) Kishor Ughade  (३९७)  (३९८) जगदिश सोनवणे  (३९९) सतिश कांबळे -शेख  (४००) निमिष लिमये-वर्षा गायकवाड


(४०१) विवेक कुलकर्णी- रेश्मा चव्हाण (४०२) उज्ज्वला - अनंत जोग,  (४०३) गणेश भवरे - काजल  (४०५) रंजित लष्करे - प्रियंका  (४०६) आश्विन भालेराव- कांचन दुर्गकर  (४०७) शारदा भालेराव - राहूल दिवांग  (४०८) चंद्रकांत भालेराव-तृप्ती महाडीक  (४०९) लता भालेराव- भट  (४१०)  मनिषा भालेराव - संदिप कांबळे  (४११) किशोर वाघ  (४१२) अनिल खराडे (बीड)   (४१३) हसन पठाण (बीड)   (४१४) रुपाली निंबर्ते- मंगेश भुताडे (अमरावती)  (४१५) गणेश फुले - ज्योती घोगरे (४१६) रोहन जोशी -अश्विनी नेमाड (४१७) डॉ.  प्रसाद डोके - डॉ.  स्नेहा बागडे  (४१८) रुबिना दलवाईं  (४१९) इला दलवाईं (४२०) स्मृती शिंदे



(४२१) जोधा-अकबर  (४२२) क्षिती जोग - हेमंत ढोमे,  (४२३) नरेश शिर्के - मेघना शिर्के  (४२४) विकास तांबे - कुंजल पटेल ( ४२५) Adv. Pruthviraj Jadhav- निशा धारप (४२६) Gaurav Zurunge (४२७) प्रशांत सागरे - प्रतिभा  जोशी  (४२८) Sameer Dhumal (४२९) योगेंद्र यादव- मधुलिका बॅनर्जी, (४३०) सुभाष लोमटे - निलिमा  (४३१) मिलन चव्हाण- नयना पटेल (४३२) शैला - द्वारकादास लोहिया (४३३) श्रीराम जाधव- शोभा शिराढोणकर (४३४) इंदुमती जोंधळे-महावीर जोंधळे (४३५) प्रा. डॉ.रविंद्र मेढे- शीतल कोटकर
(४३६) निलेश कुलकर्णी - सुरेखा भालेराव (४३७) Swapnil Malwande (४३८) शुभम पवार - आरती शिंदे


- प्रा. हरी नरके, १५/६/२०२०

Thursday, June 11, 2020

जातीव्यवस्था : मजबूत होतीय की खिळखिळी? - प्रा. हरी नरके, ( भाग-१ )


लागोपाठच्या जातीअत्त्याचारांनी, हत्त्यांनी जातीचा विषय पुन्हा एकदा ऎरणीवर आलाय. चर्चाविषय बनलाय. जातीव्यवस्था ही एक मानसिकता आहे आणि भौतिक व्यवस्थासुद्धा. ती माणसांच्या तनामनात खोलवर रूजलेली आहे. अगदी अबोध मनावरही तिचीच सत्ता आहे. बलदंड ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य पुरूष हे तिचे लाभार्थी आहेत. सर्व स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र हे तिचे बळी आहेत. हे लाभार्थी शतकानुशतके जातीचे हितसंबंध जपण्यासाठी राबत असतात. जातीचा प्रचार, पगडा, दरारा कायम ठेवण्यासाठी ते सदैव झटत असतात. वर्षभर झोपा काढून एका दिवसापुरते नाचत नसतात.जातपिडीत एकमेकांबद्द्ल संशय घेत, परस्परांना शिव्या घालीत अधिक एकटे पडत जातात. तिकडे तथाकथित उच्चजातीय-उच्चवर्णिय संघटित असतात. त्यांच्यात पोलादी ऎक्य असते. ते जागृत आणि प्रबळ असतात. त्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे, प्रचाराची यंत्रणा आहे. त्यांच्याकडे बळकट साधनसंपत्ती आहे. सरकार, (शासन व्यवस्था) मिडीया, अर्थसत्ता, धर्मसत्ता आणि न्यायव्यवस्थासुद्धा त्यांच्याच ताब्यात असल्याने त्यांच्या शब्दांना सामाजिक प्रतिष्ठा असते. तथाकथित खालच्या जातींचे लोकसुद्धा आपापल्या वा अधिक खालच्या जातीच्या विचारवंतांचे फारसे मनावर घेत नाहीत. त्यांना " वरचे" काय म्हणतात हे महत्वाचे वाटते. वरच्यांची मान्यता मिळावी, वरच्यांनी आपल्याला शाबासकी द्यावी यासाठी आटापिटा करीत असतात.


या तथाकथित वरच्यांच्या शब्दाला अधिक विश्वासार्हता असते, तिच्यासाठी खालचेही जीव टाकीत असतात. पाटलाचं घोडं आणि **** भूषण! ही म्हणच आहे. यामुळे जातबळींना न्याय मिळणे दुरापास्त ठरते. गरिब माणसं सहज विकली जातात. बळाच्या जोरावर फोडता येतात. कुर्‍हाडीचे दांडे गोतास काळ ठरतात. भारतात २६ जाने. १९५० ला संविधान आलं पण संविधानाची मानसिकता आली नाही.

मानसिकता आजही जातीची, सरंजामी, सामंती, भांडवली आणि धार्मिक उन्मादाचीच आहे. शहरीकरण, महानगरीकरण, शिक्षण, आरक्षण आणि औद्योगिकरण यामुळे सुबत्ता आली. उंच इमारती वाढल्या. मोबाईल्स, इंटरनेट आले. शेकडो चॅनेल्स आले. मनोरंजन आणि चंगळवाद यांचा पगडा वाढला. त्या गतीनं प्रबोधनाचा वारसा या नवशहरी वर्गात, नवमध्यमवर्गात, नवशहरी भागात विस्तारला नाही. उलट देवदेव वाढला. रूढी, परंपरा, नारायण नागबळी, जातीचा माज वाढत गेला.


"बघतोस काय रागानं, **** आणलंय वाघानं," ही जुन्या सरंजामी पीळाला अधिक सुदृढता देणारी व्यवस्था  जोडीला आली. जमिनीला सोन्याचे भाव आले. गुंठेवारीचा पैसा आला. सुयोग्य गुंतवणीचे शिक्षणच नसल्याने तो लग्न, देवकार्यावर, चैनीवर उधळला जाऊ लागला.  श्रीमंती आली म्हणजे सुजाणता येतेच असे नाही. अडाणीपणा जातोच असेही नाही. तोही भुमितीश्रेणीत वाढतो. ही सगळी जातअहंकाराची जळमटं आणि सरंजामीवृत्ती सहजासहजी जाणार नाही. ती घालवण्यासाठी प्रबोधन करावेच लागेल. जातीनिर्मुलनाचा अजेंडा राबवावा लागेल. पर्यायी संस्कृती विकसित करावी लागेल. तसे फारसे न करता  " जातीयता ही एक अंधश्रद्धा आहे,"  " जातीचा अभिमान असलाच पाहिजे,"  "दुसर्‍या जातीचा द्वेश करू नका, पण आपल्या जातीचा गर्व बाळगा",  "एक *** लाख ***"  असली सुभाषितं तोंडावर फेकली जातात.


भलेभले सुशिक्षित, उच्चपदस्थ ही सुभाषिते, हे नॅरेटिव्ह वापरतात. कळत नकळत रूजवतात. त्याच्या जोडीला "जी जात नाही ती जात" ही शिवाजीराव भोसलेटाईप वाक्ये लोकप्रिय केली जातात. रा.स्व.संघ व सावरकरवादी हे अस्पृश्यता, जातीभेद नको म्हणतात. मात्र ते जातीनिर्मुलनाचे आंदोलन चालवित नाहीत.  त्यांचा जातीभेदाला तेव्हढा विरोध आहे. जातींना नाही. जाती राहाव्यात फक्त भेद तेव्हढे जावेत ही भुमिका वरवर बघता, प्रथमदर्शनी बरोबरही वाटते.


मात्र संघ-सावरकर व फुले - आंबेडकर यांच्या भुमिकांमध्ये मुलभूत फरक आहे. एक भूतदयेवर, वरच्यांच्या मेहरबानीवर जगायला सांगते तर दुसरी सर्वांना समान मानवी अधिकार हवेत, असे सांगते. फुले -आंबेडकर म्हणतात, जातीच नकोत, जातीनिर्मुलन झाले पाहिजे असे ते सांगतात. कारण जातीयता ही पायर्‍यापायर्‍यांची, श्रेणीबद्ध विषमतेची व्यवस्था आहे. ती राहू द्या असे म्हणणे म्हणजे जातीय हितसंबंध, अहंकार, श्रेणी कायम ठेवा असेच म्हणणे होय. जात राहणार तर जातीय द्वेश, विखार, पायरीने राहा ही वृत्ती राहणारच. सर्व जाती एका पातळीवर नाहीत. त्या एकाखाली एक किंवा एकावर एक अशा उभ्या आहेत.


जाती राहणार असतील तर अन्याय, पक्षपात, भेदभाव राहणारच. तेव्हा जातच गेली पाहिजे. स्वत:च्या जातीचा गर्व, अभिमान बाळगणे म्हणजेच दुसर्‍या जातींचा द्वेश करणे होय. तथाकथित वरच्या जातींना मागासांची प्रगती का बघवत नाही, माजलेत असे का वाटते, कारण त्यांनी आपल्या पायरीने राहावे, गुलाम राहावे, स्वाभिमानाने जगू नये असे वाटते म्हणून.  मित्रहो, आपला अजेंडा जातीभेद निर्मुलनाचा नसून जातीनिर्मुलनाचा आहे. हा फरक नीट लक्षात घ्या. समरसतावाद्यांना ह्यातला फरक कळणार नाही. कळला तरी वळणार नाही. कारण ते जातीव्यवस्थेचे लाभार्थी आहेत. आपण पिडीत आहोत. आपण त्यांचे गुलाम राहण्यात त्यांचा फायदा असला तरी आपला त्यात काय लाभ आहे? काहीच नाही. जातीव्यवस्था मान्य करणे म्हणजेच उच्चनिचता, श्रेष्ठकनिष्ठता, मालक-गुलाम ही मानसिकता स्विकारणे होय हे नीट समजून घ्या.


जातीव्यवस्था माणसाने निर्माण केलीय. जी गोष्ट अनित्य आहे, ती जातेय. ती जाणार. जातीव्यवस्था आज खिळीखिळी होत आलीय. प्रतिगामी शक्तींनी तिला बळकट करण्यासाठी बुस्टर दिलाय खरा. पण तरीही ती जाणारेय.मात्र  ती आपोआप जाणार नाही. त्यासाठी तुम्हालामला एकजुटीने काम करावे लागणार आहे. जगातील ८०० कोटी लोकांपैकी अवघ्या १५० कोटींमध्ये जातीव्यवस्था आहे. उरलेल्या ६५० कोटींमध्ये वर्णभेद, वंशभेद, भाषाभेद, राष्ट्रभेद असतीलही पण हे आणि जातीव्यवस्था या वेगळया बाबी आहेत. त्यांच्यात गल्लत करू नका. परत सांगतो, जात ही व्यवस्था आहे. मानसिकता आहे. भौतिक आधारावर ती पोसली गेलीय. तिला अर्थसत्ता, धर्मसत्ता, कुटुंबसत्ता, शिक्षणसत्ता यांचा आधार असल्याने ती अधिक किचकट, गुंतागुंतीची, चिवट, सबळ आणि भयंकर आहे. पाताळयंत्री आहे.


"आरक्षणामुळे जातीयता वाढली," "शाळेच्या दाखल्यावरून जात काढली की जात आपोआप जाईल," "मनुस्मृती कुणी वाचलीय? कशाला मनूला बिचार्‍याला दोष देता?" " समान नागरी कायदा आणा, " असले युक्तीवाद भलेभले करीत असतात. हे युक्तीवाद पोरकट, विक्षिप्त, अगदी बालीश, भ्रामक, भंपक आणि मुर्खपणाचे आहेत. जातीयतेने शूद्र-अतिशूद्रांवर अन्याय केला त्याची भरपाई म्हणून आरक्षण आलेय. जात समाजात शेकडो वर्षे होती म्हणूनच आरक्षण द्यावे लागलेय.


आरक्षणाने जातीयता आलेली नाही. समाजात जातीची मानसिकता होतीच, आजही आहे, म्हणून जात शाळेच्या दाखल्यावर आलीय. दाखल्यावर आल्यामुळे समाजाला ती कळलेली नाही. ती आधीच होती. नोंदवली नाही की ती जाईल असे म्हणणे म्हणजे कोरोना टेस्ट करू नका, उपचारही करू नका, कोरोना नाहीच असे म्हणा, थाळ्या, टाळ्या वाजगा, गो कोरोना गो म्हणा, की गेला कोरोना, असली अडाणचोट वृत्ती आहे ही.


मनुस्मृती वाचलीय की नाही हा मुद्दाच नाहीये. भारतात वाचनसंस्कृती फारशी नव्हती. नाही. कथनसंस्कृती, वाणीसंस्कृती होती. आहे. म्हणून तर आजही साहित्य यापेक्षा वाड्मय हा शब्द अधिक प्रचलित आहे. वाणीद्वारे जे सांगितले गेले ते वाड्मय. ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा ह्या सांगितल्या गेल्या. त्या कुणीतरी लिहून घेतल्या. आजही लाखो बुवा, बापू, महाराज, ह.भ.प., साधू, संन्याशी, गोसावी, गुरू, किर्तन, प्रवचन, सत्संग याद्वारे लक्षावधींच्या जमावांना मनुमहात्म्य सांगत असतात. आंबाभुर्जीवाले बहुजन तरूणांना सांगत असतात, " मनु हा संताच्या चार पावले पुढे होता. " तेव्हा वाचायची काय गरज आहे. हे कथन इथे रुजलेले आहे. रुतलेले आहे. मनामनावर कोरलेले आहे.


दुसरा एक मुद्दा, मनुस्मृती हा धार्मिक आणि कायद्याचा ग्रंथ होता. कायद्याचे मुख्य तत्व हे आहे की, कायदा सर्वांना माहितच असतो हे गृहित धरावे लागते. नाहीतर प्रत्येक आरोपी असा बचाव करील की मला हा कायदा माहितच नव्हता, म्हणुन मला शिक्षा करू नका. हे चालत नाही. वेद, गीता, उपनिषदे, पुराणे, महाभारत, रामायण, कुणी वाचलेय? पण म्हणून त्यांचे महात्म्य भारतीयांना माहित नाही काय? तेव्हा मनुस्मृती न वाचल्याचा ब्राह्मणी युक्तीवाद भाकड आहे. भुक्कडपणाचा आहे. ह्या पुराणकथा इथल्या प्रत्येकाच्या हाडीमाशी भिनलेल्या आहेत. मठ, मंदिर, धर्माचार्य त्यांना जोपासत आहेत.


जातीव्यवस्था निर्मुलनाची जादूची कांडी कुणालाही सापडलेली नाही. अगदी फुले-शाहू-आगरकर-आंबेडकरांनासुद्धा नाही. जातीनिर्मुलनाला शॉंर्टकट नाही. जाती घालवण्याची पंचसुत्री फुले-शाहू-आंबेडकरांनी जरूर दिलेली आहे. मुळात भारतात शोषण, पक्षपात, भेदभावाची ३ केंद्रे आहेत. (१) जात, (२) आर्थिक वर्ग, (३)लिंगभाव, स्त्री-पुरूष विषमता.


या तिन्हींवर एकत्रित मारा करण्यासाठीच हे पंचशील आहे. ही विषयपत्रिका अतिशय प्रभावी आहे. (१) सर्वांना शिक्षण, ज्ञाननिर्मिती, कौशल्यांचे संवर्धन (२) स्त्री-पुरूष समता, (३) आंतरजातीय विवाह, (४) संसाधनांचे फेरवाटप, (५) वादविवाद, विचारकलह, संवाद, टिकाटिप्पणी, धर्म चिकित्सा, सामाजिक प्रबोधन याच रस्त्याने आपल्याला जावे लागेल. जातीनिर्मुलनाला दुसरा रस्ता नाही.


त्यावर फोकस करायला हवा. झोकून देऊन काम करायला हवे. ही मानसिकता घालवण्याचे अभियान संघटन, प्रशिक्षण, डावपेच (स्ट्रॅटेजी) आणि परिवर्तनवादी तत्वज्ञान यांच्याद्वारेच उभे करता येईल. प्रतिक्रियावाद, अत्त्याचारविरोध, आरक्षण आणि अनुदानात अडकलेली आपली सामाजिक चळवळ आज गोल्गोल फिरतेय. आपण एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढत बसलो आहोत. बहुजनातील मानसिक दुरावा दूर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत की नाही? की फक्त स्पर्धाभावना, एकमेकांबद्दलचा संशय, आकस, परस्परद्वेश आणि सर्वज्ञभावना, मीच एकमेव क्रांतिकारक असल्याचा दावा याने समग्र परिवर्तन साधणार आहे?


कोणीही शेंबडं पोरगं उठतं आणि सुरू होतं, " आता आ. ह. साळुंखे का बोलत नाहीत? आता अमुकने का लिहिले नाही? तमुकने लिहिले तर एव्हढेच का लिहिले? ह्याला एव्हढ्या उशीरा का जाग आली? आम्ही यांना मोठे केले, आमच्या मदतीला कोणीच येत नाही? आम्ही समर्थ आहोत, आम्हाला कोणाचीच गरज नाही. कोणावर अन्याय झाल्यावर आम्हीच लढायला जातो, आता इतरांवर अन्याय झाल्यावर आम्ही का म्हणून जावे? हरी नरके, आम्हाला आंबेडकर सांगू नका, तो आमच्या रक्तात आहे, तुम्ही तिकडे बहुजन समाजात जाऊन प्रबोधन करा, आम्हाला अक्कल शिकवू नका, आम्ही प्रबुद्धच आहोत,"  हा सगळा युक्तीवाद पोकळ आहे. बोलबच्चन, बाष्कळ आणि तकलादू आहे. अरे बाबांनो, सगळं आयुष्य ज्यांनी चळवळीला वाहिलं त्यांना प्रश्न करण्यापुर्वी जरा स्वत:च्या लायकीचाही विचार करा. कोण आपण, काय आपली कुवत? साळुंखेसरांची जेव्हढी पुस्तकं आहेत ना तेव्हढं तर तुझं वयही नाही. तुझा अभ्यास किती? तू बोलतोस किती?


" तुम्ही माळ्यांना, मराठ्यांना, ब्राह्मणांना त्यांच्या वस्तीत जाऊन का सांगत नाही? आम्हाला बाबासाहेब माहितच आहेत, ते तुम्ही सांगायची गरजच नाही, आम्हालाच कशाला परत सांगताय?" हा प्रश्न, हा दावाही, जातीय दर्प आणि अर्धवट शिक्षणाच्या अहंकारातून आलेला आहे. एव्हढा अहंकार बरा नाही. जन्माच्या अपघाताने जे आंबेडकरवादी आहेत त्यांच्यापेक्षा बाय चॉईस ज्यांनी बुद्ध-आंबेडकर स्विकारलेत ते साळुंखेसर फार मोठे आहेत. त्यांच्याबद्दल शंका घेता आणि हा माझा समाजबांधव, तो माझा रक्तबांधव असली भाषा जी फुले-आंबेडकरवादाला काळीमा फासणरी जातीय किड आहे तिला जोपासता?


प्रबोधनाची गरज सगळ्यांनाच आहे. आपल्या सर्वांनाच एकमेकांची गरज आहे. आपण सगळ्यांनीच गोळ्यामेळ्यांनी राहायला हवेय. आम्ही सगळ्यांनाच शिवराय, फुले, शाहू, आगरकर, आंबेडकर, साने, शिंदे, गांधी सांगतो आहोत. सांगत राहणार आहोत. प्रस्थापित व्यवस्था अतिशय धुर्त, लबाड, दुटप्पी, नीच आणि चलाख आहे. तिच्याशी लढायचे काम एकट्यादुकट्याचे नाहीच. आपल्यात फूट पडावी, आपण एकमेकांचे गळे पकडावेत हेच तर त्यांना हवेय. परजातींबद्दल संशयी वृत्ती हीच तर जातीयता आहे. आम्ही जर रक्ताचे नाते मानत असू तर तो बुद्ध-बाबासाहेबांचा पराभव आहे. शुद्ध रक्ताचा दावा हा प्रचंड मोठा फ्रॉड आहे. जातीचे रक्त ही संकल्पनाच भंकस आहे. रक्ताला जात नसते. रक्ताला गट असतो. ए, बी, ओ, एबी, +, - असा.


बाबासाहेब म्हणाले, "मला जातीचे नको, विचारांचे बहुमत हवेय." ज्ञानसूर्य बाबासाहेबसुद्धा असे कधी म्हणाले नाहीत, की मला कोणाचीच गरज नाही. माझा मी समर्थ आहे. त्यांनीसुद्धा, बुद्ध, कबीर, फुले यांना गुरू मानले. त्यांनी जातीतला गुरू नाही केला. करता आला असता. त्यांनी "महार महासंघ किंवा सेवा संघ" नाही काढला. "महारनायक" नाही चालवला. बहिष्कृत भारत, हितकारीणी सभा, मूकनायक, जनता, प्रबुद्ध भारत, स्वतंत्र मजूर पक्ष, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, रिपब्लिकन पार्टी, सिद्धार्थ महाविद्यालय, मिलिंद कॅंपस यातनं काही संदेश घ्यायचा की नाही?  तुम्हाला केवळ जातीचं काम करायचं असेल तर जरूर करा. पण मग बुद्ध, बाबासाहेबांची नावं घेऊ नका. फुल्यांनीही "माळी समाज महासंघ" नाही चालवला. ओठात फुले-आंबेडकर आणि पोटात जातीयता, जातसंघ, जातीचं रक्त हे शोभत नाही.


मी गेली ४० वर्षे शिवराय,फुले-शाहू, शिंदे, आगरकर, गांधी, साने, आंबेडकर अत्र, तत्र, सर्वत्र मांडतोय. माफ करा स्वत:ला ज्ञानी समजणार्‍या थोर्थोर विद्वानांनाही ५, १० टक्क्यांच्या पलिकडचे फुले, शाहू, बाबासाहेब माहित नाहीत. जे माहिती आहेत तेही वरवरचे आणि तकलादू स्वरूपात. पोपटपंची करण्यापुरते. जातीच्या टोळ्याटोळ्यांनी रहायचे तर जरूर राहा. पण हाच तर मनुवाद आहे, हीच तर जातगुलामी आहे.


" जातीसाठी खावी माती" हा फुले-आंबेडकरवाद नाही. " जी जात नाही ती जात" हा विचार परिवर्तनवादी विचार नाही. तो प्रस्थापितांचे हात बळकट करणारा विचार आहे. असा विचार करा आणि मरा. अशामुळे मनुवादी हिंदुत्ववादाला, जातीव्यवस्थेला अजून बळकटी मिळेल हे लक्षात ठेवा. सत्तेसाठी धार्मिक व जातीय तेढ वाढवण्यासाठी संघपरिवार कोणत्याही थराला जायला तयार आहे. बहुजनात वाढणारी तेढ, आपसातला संशयवाद हाच हिंदुत्ववादी शक्तींना बळ देत असतो. त्यांना विविधता, समावेशकता नकोय. त्यांना सगळीच कळसुत्री बाहुली हवीयत. आदेशावर चालणारी. ब्राह्मणी व्यवस्था मजबूत करणारी. तिच्याशी आयुष्यभर लढणारे फार कमी आहेत. त्या मोजक्यांना गमावू नका. मन मोठं करा. चार बुकं वाचली म्हणजे अक्कल आली हा अहंकार सोडा.


इथली कुठलीही एक जात "एकसंघ" नाही. तेव्हा सब घोडे बारा टक्के करू नका. अत्याचार करणारा भले माळी, मराठा, वंजारी, आग्री, भंडारी, ब्राह्मण, राजपूत, ठाकूर, बनिया, कुणबी कुणीही असेल पण म्हणून बुद्ध, फुले, शाहू, सयाजीराव, विठ्ठल रामजी, साने गुरूजी यांनाही त्यांच्या गोटात ढकलणार आहात काय? गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. मात्र अख्ख्या समाजाला टार्गेट करू नका. जातीपातीचा विखार कोण वाढवतंय? भटके, विमुक्त, अनुसुचित जाती, जमाती, अल्पसंख्याक समाजाविरूद्ध सवर्णांना कोण पेटवतंय? कोण द्वेशाग्नी भडकवतंय? हा हिंसावादी मेंदू कोण पोसतंय?  जरा शोध तर घ्याल.


जागतिकीकरणामुळे प्रत्येक जातीत नवे वर्ग तयार झालेले आहेत. हे वर्गीय हितसंबंधाचे ताणेबाणे, राजकीय सत्तेचे आकर्षण आणि अप्पलपोटेपणा यातली गुंतागुंत विसरून सुलभीकरण करणारी मांडणी करण्याच्या नादात आजवरची सामाजिक पुण्याई मातीत घालवू नका. आम्हीच बोलावतो,  आम्हीच मानधन देऊन पोसतो, मोठे करतो, ह्या गमजा सोडा. असं उगीच कुणीही कुणालाही बोलवित नसतं. आम्हाला बोलवा असा कुणी अर्ज केला होता का? नका बोलवू ना मग. हिनवणं सोडा. बोलावण्याची भिक नको पण उपकाराचे कुत्रे आवरा.


लक्षात ठेवा, वक्त्यांचा व्यासंग, परिणामकारकता, उपयुक्ततता, त्याग आणि कळवळा यांनाही काही मार्क द्यावे लागतात. वक्त्याचा ब्रॅंड एका दिवसात तयार होत नसतो. त्यासाठीची साधना अणि पायपीट यांना कवडीमोल ठरवू नका. प्रा. रावसाहेब कसबे, उत्तमराव कांबळे, प्रा. भालचंद्र मुणगेकर यांना सगळेच समाज बोलावतात, ते का? शोध घ्या. याच्या उलट काहींना आपला म्हणवणारा समाजही वार्‍याला उभं का करीत नाही? शोधा म्हणजे सापडेल.....हा लेख व इतर ८००+ पोस्ट तुम्ही माझ्या ब्लॉग/ फेसबुक पेजवर पाहू शकता. संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.....https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR38LDRzVM_XdR2JvWeIhR7r1RUWHpp5dZAnCISJaRzDVpLLBM8pw-NIfKQ
क्रमश:

- प्रा. हरी नरके, ११/६/२०२०

Wednesday, June 10, 2020

बौद्ध युवकाची पुण्यात हत्त्या, पुरोगामी विचारांना मूठमाती : प्रा. हरी नरके

विराज विलास जगताप या बौद्ध युवकाची पुण्यात हत्त्या, शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना मूठमाती : प्रा. हरी नरके

विराज विलास जगताप, वय २० वर्षे, रा. जगतापनगर, बुद्धविहाराजवळ, पिंपळे सौदागर, पुणे यांची तथाकथित उच्च जातीय मुलीवर प्रेम केले म्हणून ७ जून २०२० रोजी रा. १० वा. काटे कुटुंबियांकडून अमाणूष हत्त्या,
आरोपी : हेमंत कैलास काटे, सागर जगदीश काटे, रोहित जगदीश काटे, कैलास मुरलीधर काटे, जगदीश मुरलीधर काटे, हर्षद कैलास काटे यांनी एकत्रितपणे मिळून आधी टेम्पोने विराजच्या टू व्हीलरला धडक दिली, खाली पडलेल्या विराजला लोखंडी रॉडने व दगडांनी ठेचून अमाणूषपणे मारहाण करीत हत्त्या केली. मारताना आमच्या मुलीवर प्रेम करतो काय अशी जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण करून हत्त्या केली.


सांगवी पोलीस स्टेशनला गुन्हयाची नोंद झालेली आहे.
एफ. आय. आर. ३०६/२०२०, भा. दं. वि. कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, अनुसुचित जातीजमाती कायदा २०१५ चे कलम, १८८९, ३ (१) ( आर) ( एस) ३ (२ ) (व्हीए) ३ (२) (व्ही) ६ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) सह १३५


कोणतीही हत्त्या हा गंभीर गुन्हाच. तथाकथित वरच्या जातीच्या मुलीवर प्रेम करतो म्हणून जातीभेदापोटी सहाजणांनी रानटीपणाने कोवळ्या युवकाला ठार मारणे हा तर पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा गुन्हा.

जग कुठे चाललेय आणि ही तथाकथित उच्चजातीय मानसिकतेतली माथेफिरू माणसं प्रेम केलं म्हणुन हत्त्या करतात? महाराष्ट्रात सर्वाधिक आंतरजातीय विवाह झालेले आहेत. महात्मा फुल्यांचा दत्तक पुत्र यशवंतचे लग्न आंतरजातीय होते. राजर्षी शाहू छत्रपतींनी आपल्या बहीणीचा विवाह आंतरजातीय केलेला होता. स्वत: बाबासाहेबांचा शारदा कबीर यांच्याशी झालेला विवाह आंतरजातीय होता.


या पुरोगामी राज्यात आंतरजातीय विवाह करण्यात सर्वाधिक पुढे असलेल्या समाजापैंकी पहिले तीन समाज आहेत, मराठा, बौद्ध आणि ब्राह्मण. असे असताना पुण्यासारख्या शहरात हे घडावे याची शरम वाटते. शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना मूठमाती देणार्‍या या कृतीचा मी तीव्र धिक्कार करतो. आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी अशी मागणी करतो.

राज्यातला सामाजिक सलोखा आणि एकोपा टिकवण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा.

-प्रा. हरी नरके, १०/६/२०२०

Friday, April 3, 2020

मौनाचा धुर्तपणा थोरच-आकस फारच सकस

समाजमाध्यमांवर व्यक्त होणारे जे काही ओपिनियन मेकर्स आहेत त्यात बहुसंख्यांक पुरोगामी हे उच्चवर्णीय समाजवादी वा मार्क्सवादी छावणीतले आहेत. ते हिंदुत्ववाद्यांवर तोंडसुख घेतात ते ठिकच आहे. मात्र मुस्लीम समाजातील सनातनी, जात्यंध, धर्मांध शक्तींबद्दल बोलायचे झाले की यातले ९९% हे मौनात जातात. हा हिंदु पुरोगाम्यांचा सनातन बोटचेपेपणा आहे. नरहर कुरूंदकर आणि हमीद दलवाई हे याला अपवाद होते.

त्यामुळे ते हिंदुत्ववादाविरोधी असण्यापेक्षा हिंदुविरोधी असल्याचा प्रभावी प्रचार करणे हिंदु सनातनी शक्तीला सोयीचे जाते.

सामान्य हिंदू माणसाला ते पटतेही. त्यामुळेच हिंदु समाजामध्ये यांना काडीमात्र प्रतिष्ठा नाही.


ह्या बोटचेपेपणाची सुरूवात फार जुनी आहे. देशाच्या तत्कालीन श्रेष्ठ नेत्यांना हिंदुमुस्लीम प्रश्न जितका जिव्हाळ्याचा वाटला तितका एस.सी.एस.टी. ओबीसींचा प्रश्न कधीही महत्वाचा वाटला नाही.

मुस्लीम समाजातला ९९ टक्के वर्ग हा हिंदुंमधून धर्मांतरीत झालेला आहे. त्यातले जे उच्चवर्णांमधून तिकडे गेले ते तिकडे अश्रफ म्हणून ओळखले जातात. ह्यांची संख्या मूठभर असली तरी संपुर्ण सनातनी मुस्लीम छावणीचे नेतृत्व या अश्रफांकडे आहे.

जे घटक हिंदु ओबीसी आणि एस.सी.एस.टी.मधून धर्मांतरित झाले ते तिकडे अजलफ आणि अर्जल मानले जातात. त्यांच्या हातात नेतृत्व नाही. हा वर्ग गरिब, अल्पशिक्षित, कष्टकरी आणि कारागिर आहे. अश्रफ यांच्याशी बेटीव्यवहार करीत नाहीत.

हिंदु सनातनी छावणीचे नेतृत्व आणि मुस्लीम सनातनी छावणीचे नेतृत्व दोन्हीही उच्चवर्णियांच्याच हाती असल्याने यांचे नेतृत्वाचे हितसंबंध आहेत. त्यांची मूस एकच असल्याने विरोधीभक्ती, मिलीभगत आणि वर्ग वर्ण जाणीव यांच्यात सामंजस्य आहे. कमालीचा आप्पलपोटेपणा, दांभिकपणा, सामान्य माणसाविषयीची तुच्छता आणि अहंभाव ही यांची खास वैशिष्ट्ये. यांचा सामान्य वर्गातून आलेल्या बुद्धीमंतांबद्दलचा आकस फारच सकस असतो. त्यांना कॉर्नर करणे, त्यांची मुस्कटदाबी करणे, त्यांच्याविषयी बदनामीकारक, तुच्छतावादी अफवा पसरवणे यासाठी ते एकवटतात. अशांना बहिष्कृत करण्यासाठी ते जीवाचे रान करतात. बहुजन राज्यकर्तेही यांच्याच ओंजळीने पाणी पिणारे. मांडलिक. त्यामुळे प्रशासन, न्यायव्यवस्था, माध्यमं हे लोकशाहीचे चारही खांब यांच्याच हातात.


बाजूचे आणि विरोधी असे सगळेच चर्चाविश्व व्यापून टाकण्याचा हा गेम फार मजेदार असतो. हे हिंदु पुरोगामी ज्ञानी लोक जगातील प्रत्येक गोष्टींवर व्यक्त होतात मात्र ते ओबीसी, एस.सी. एस.टी. यांच्या प्रश्नांवर कायम मिठाची गुळणी धरून बसतात. हा मौनाचा धुर्तपणा थोरच असतो.

-प्रा.हरी नरके,
०३/०४/२०२०

Tuesday, March 10, 2020

जातजाणिवेचा ब्लाईंड स्पाॅट







सुमारे ४० वर्षांपुर्वीची गोष्ट. माझ्या मित्राची आई महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापिका होती. अतिशय बुद्धीमान आणि कर्तबगार महिला. उत्तम वाचन आणि सामाजिक जाणीवेतून वंचितांसाठी सतत कार्यरत असलेल्या. एकदा आमच्यात बोलता बोलता सावित्रीबाई फुलेंचा विषय निघाला. सावित्रीबाई झाल्या नसत्या तर आज तुम्ही प्राध्यापिका होऊ शकला नसतात, असं मी बोलून गेलो. त्यांना खूप राग आला. त्या म्हणाल्या, असंच काही नाही. त्यांनी जे काही महिलांच्या शिक्षणासाठी केलं, ते त्या झाल्या नसत्या तरी अन्य कुणीतरी केलंच असतं. काळ कुणासाठी थांबत नसतो. कामं कुणासाठी अडून राहात नसतात."
" जी गोष्ट गरजेची असते ते काम होतेच. कोणी होवो अगर ना होवो. सावित्रीबाईंचे उगीच देव्हारे माजवण्याची गरज नाही."
मी खूप हिरमुसलो. दुखावला गेलो.
मित्राची आई माझ्याबद्दल जिव्हाळा आणि आत्मियता असलेली व्यक्ती असल्याने त्यांचं म्हणणं पटलं नाही तरी मी गप्प बसलो.
पण मुद्दा मनात ठसठसत राहिला.
त्यांच्या महाविद्यालयाला स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगवास भोगलेल्या, एका महान राष्ट्रीय नेत्याचे नाव देण्यात आलेले होते. त्या नेत्यांच्या जयंतीनिमित्त एकदा आमच्या गप्पा चाललेल्या होत्या. राजकीय स्वातंत्र्यासाठी मोठं योगदान दिलेले हे नेते सामाजिक बाबतीत सनातनी असल्याचा माझा आक्षेप ऎकून त्या खवळल्या. "हरी, अरे तू काय बोलतोयस ते तुला कळतंय तरी का? ते झाले नसते तर आपला देश स्वतंत्र झालाच नसता. एव्हढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल बोलताना माणसांनं आपलं वय, पात्रता आणि अक्कल यांचा विचार करावा" असंही त्या मला म्हणाल्या.
मीही हट्टाला पेटलो आणि म्हणलो, " त्यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी काम केलं ते मोठंच होतं. पण समजा त्यांनी ते केलं नसतं तरी स्वातंत्र्य मिळालंच असतं. कामं कुणासाठी अडून राहात नसतात, असं तुम्हीच म्हणता ना?"
त्या अतिशय संतापल्या आणि मला " मुर्ख आहेस. चालता हो," म्हणाल्या.
मी म्हटलं, " मी काय वावगं बोललो? जो न्याय सावित्रीबाईंना तोच लोकमान्यांना का नाही?"
त्यांना ते पटलं नाही. त्या म्हणाल्या, " ते वेगळं, हे वेगळं."
माणसं असा दुटप्पीपणा का करतात? जात माणसाच्या अबोध मनात [नेणीवेत] दडलेली असते नी ती नकळत काम करत असते हेच खरं काय?
एरवी अतिशय समतोल वागणारी ही माझ्या मित्राची आईसुद्धा नकळत असं वागून गेली असावी काय? मी त्यांना जातीयवादी म्हणणार नाही.
एरवी उत्तम युक्तीवाद करणार्‍या बुद्धीजिवी माणसांचाही जातजाणिवेचा ब्लाईंड स्पाॅट असतो काय?
-प्रा.हरी नरके, १० मार्च, २०२०