Showing posts with label हिंदुराष्ट्र. Show all posts
Showing posts with label हिंदुराष्ट्र. Show all posts

Wednesday, May 6, 2020

रा.स्व.संघ २२/ " ब्राह्मण म्हणून मुलाहिजा केला जाणार नाही" : शिवाजी महाराज








शिवाजी महाराज म्हणतात, " ब्राह्मण म्हणून मुलाहिजा केला जाणार नाही" : प्रा.हरी नरके
"जो कोणी धर्मवेडेपणा आणि धर्मद्वेश बाळगतो तो ईश्वरी आज्ञेच्या विरूद्ध वागतो." छ. शिवराय

संघवाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना रेशीमबागेच्या रंगात पुरते बुडवून टाकलेले आहे. त्यांचे पार ब्राह्मणीकरण करून टाकलेले आहे. ही महाराजांची बदनमी आहे. महाराज जर गोब्राह्मण प्रतिपालक होते तर त्यांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या अफजलखानाच्या ब्राह्मण वकीलाची हत्त्या कशी केली? महाराज जर गोब्राह्मण प्रतिपालक होते तर जिवाजी विनायक सुभेदार या ब्राह्मण कारकुनाला गद्दारीबद्दल महाराजांनी शिक्षा कशी केली? ब्राहमण म्हणून कोणतीही गय केली जाणार नाही, सवलत मिळणार नाही असे त्याला ठणकावणारे महाराजांचे हे अस्सल पत्र संघवाले का दडवून ठेवतात?

ब्राह्मणाची गय केली जाणार नाही-

पत्र १८ जानेवारी १६७५ चे आहे. अतिशय जळजळीत आणि कठोर आहे. महाराज या ब्राह्मण कारकुनाला नादान म्हणतात. "गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी राजे" या ब्राह्मणाला "हरामखोर" अशी चक्क शिवी देतात. लाचखोरही म्हणतात. तुमच्यासारख्या लाच खाणारांना "ठिकेठाक" केले जाईल असा सज्जड दम भरतात. महाराज या पत्रात म्हणतात, " ऎशा चाकरास ठीकेठाक केले पाहिजेत. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो?.. याउपरी बोभाटा आलिया तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनीम जालेस, ऎसे जाणून बरा नतिजा तुम्हास पावेल. ताकीद असे." महाराज जर गोब्राहमण प्रतिपालक असते तर म्हणाले असते, " ब्राहमणदेवता, आपण शत्रूचे पैसे खाल्लेत, आमच्याशी गद्दारी केलीत, हरकत नाही, आम्ही आपले धर्माचे चाकर आहोत. आपण आमचे मालक. तेव्हा आपले उत्तम चालूय. असेच पुढे चालू द्या."

ब्राह्मण असलात तरी गर्दन मारली जाईल- 

पण महाराज तर या ब्राह्मणाला चक्क धमकी देतात. बघून घेऊ म्हणतात. ब्राह्मणाला आपला चाकरही म्हणतात, हे कसे काय? बरे इथे ठीकेठाक केले जाईल म्हणजे गर्दन मारली जाईल असे महाराज सांगताहेत! धर्मशास्त्रानुसार ब्रह्महत्त्या वर्ज्य असतानाही महाराज चक्क ब्रह्महत्त्येची धमकी कशी काय देतात? त्याकाळातले काही ब्राह्मण लाचखोर होते, स्वराज्याशी गद्दारी करणारे होते याचे हे पत्र हा खणखणीत पुरावाच आहे. म्हणून तर दडवादडवी चाललेली नाही ना?

एक श्लेष काढायचा तर असे म्हणता येईल की समाजात तोवर ब्राह्मणांना विशेषाधिकार असल्याने ब्राह्मणांच्या लाचखोरीकडे, गद्दारीकडे कानाडोळा केला जात असेल. तसा मुलाहिजा [तशी सवलत ] यापुढे बंद करण्यात आलेली आहे असे महाराज या पत्रांद्वारे सुनावताहेत. मग महाराज जर गोब्राह्मण प्रतिपालक होते तर त्यांनी ब्राह्मणांची ही पुर्वापार चालत आलेली ही सवलत तडकाफडकी बंद कशी काय केली बुवा? दया, कुछ तो गडबड है!

" धर्मवेडेपणा आणि धर्मद्वेश बाळगणे म्हणजे ईश्वरी आज्ञेचा भंग करणे होय." - छ. शिवराय 

कुठलाच उपलब्ध दस्तऎवज अशा निष्कर्षास येत नाही की शिवाजी राजांचा संघर्ष धर्मासाठी होता असे ते मानत होते. 




"हिंदवी स्वराज्य"वाली पत्रे बनावट-

महान इतिहासकार द. वि. आपटे, त्र्यं. शं. शेजवलकर आणि ग. ह. खरे यांच्या मते, ज्या पत्रांमध्ये "हिंदवी स्वराज्य" हे शिवाजीराजांचे ध्येय होते असे म्हटलेले आहे ती पत्रे विश्वासार्ह नाहीत. [ पगडी, २६] याचाच अर्थ ती पत्रे बनावट आहेत.

राज्य आणि स्वराज्य या शब्दांचे जे अर्थ आज घेतले जातात, त्याकाळात ते शब्द खूप संकुचित अर्थाने वापरले जात असत. १७ जुलै १६५७ ला चाकणच्या पुजार्‍याला दिलेल्या इनामपत्रात शिवाजीराजे आपल्या जहागिरीला राज्य म्हणतात. १६६० पर्यंत त्यांच्या ताब्यातील प्रदेश म्हणजे " मोकासा " म्हणजे देणगी मिळालेली जहागिर असाच होता.[ पगडी, २७]


जहाल धर्मांध आणि वंशवादी औरंगजेब- तो हिंदुमुस्लीम अशा सर्व भारतीयांचा द्वेश करी-

याचा अर्थ आजच्या अर्थाने राजे धर्मनिरपेक्ष होते असेही नाही. ते धर्माने हिंदू होते. हिंदू जीवनपद्धतीत वाढलेले होते. धर्मांध औरंगजेबाची वर्तणूक त्यांना अमान्य होती. औरंगजेब वंशवादी होता.

त्याला त्याच्या तुरेनियन वंशाचा गर्व होता. त्याच्या नजरेत सर्वच हिंदुस्थानी म्हणजे हिंदू आ्णि मुस्लमान दोघेही तिरस्करणीय होते. तो त्यांचा द्वेश करीत असे. याच्या उलट शिवराय धर्मवेडे नव्हते. ते धर्माचे पालन करणारे, धर्माने सांगितलेले पुजाविधी करणारे राजे होते. त्यांचा संघर्ष राजकीय होता. त्यामुळे धार्मिक अवडंबरापासून राजे दूर राहिले.

दुर्दैवाने त्यांच्या अनेक चरित्रकारांनी त्यांचा हा संघर्ष धर्मवादी नजरेने पाहिला. पक्षपाती पद्धतीने रेखाटला. परमानंदाने तर त्यांना परमेश्वराचा अवतारच बनवून टाकले. अर्थातच राजांच्या विरोधकांचे चित्रण त्याने राक्षस असे केले. या परमानंदाचे आजचे सगळे संघीय वारसदार महाराजांचा संघर्ष हा हिंदुमुस्लीम धर्माचा संघर्ष म्हणून रंगवतात. त्यात सगळ्या मुस्लीमांच्या वागण्याला ते अतिरंजित स्वरूपात अत्याचार म्हणून पेश करतात.

बाबा याकुत यांच्या आशिर्वादासाठी राजांची धडपड -

पण ते विसरतात की, राजे सहिष्णू होते. विविध धर्म आणि पंथांबद्दल त्यांना मनापासून आदर होता. इस्लामी धर्मग्रंथ आणि मशिदी, पिरांची ठाणी यांच्याशी ते सन्मानाने वागत. बाबा याकुत यांचे आशिर्वाद मिळवण्यासाठी राजे सदैव धडपड करीत. [पगडी, ३२]

छ. शिवराय औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात म्हणतात, "जो कोणी धर्मवेडेपणा आणि धर्मद्वेश बाळगतो तो ईश्वरी आज्ञेच्या विरूद्ध वागतो." [ पगडी, १२ ]

कुठलाच उपलब्ध दस्तऎवज अशा निष्कर्षास येत नाही की शिवाजी राजांचा संघर्ष धर्मासाठी होता असे ते मानत होते. [ पगडी, ११ ]

असहिष्णुतेमुळे विनाश -

कितीही मोठी असली तरी माणसं आणि संस्था यांचा असहिष्णुतेमुळे विनाश होतो असेही शिवाजीराजे औरंगजेबाला लिहितात. विभिन्न जाती आणि धर्म यांच्याबद्दल सहिष्णुता अवलंबिली तरच मनुष्य जातीला शांतता आणि सुबत्ता लाभेल अशीही ताकीद शिवराय औरंगजेबाला देतात. [ पगडी, १२ ] अशा शिवरायांना स्वार्थासाठी संघाने कडवे हिंदुत्ववादी बनवून टाकलेय.

कवी परमानंद संघाला सोयीचे-

शिवरायांच्या समकालीन लेखकांमध्ये संस्कृत कवी परमानंद, जयराम, हिंदी कवी भूषण, मराठी बखरकार सभासद यांनी शिवाजी राजे हिंदुंचे कैवारी असल्याचे चित्र रंगवले त्याचे कारण त्यांच्यावर [ या चरित्रकारांवर ] असलेला पौराणिक कथांचा पगडा होय.

समकालीन पर्शियन बखरकार मुहम्मद कासीम आणि मुस्तेखान तसेच दखनी लेखक नुसरती यांनी महाराजांचे वर्णन नेमके उलटे केलेय.

युरोपियन लेखक आधी महाराजांना बंडखोर ठरवतात, मात्र त्यांची सरशी होऊ लागताच त्यांचे वर्णन उमदा युवराज असे करतात.

शिवराय हिंदूंचे कैवारी होते नी ते मुस्लीमवर्चस्वाविरूद्ध लढत होते ही मांडणी टोकाची, अतिरेकी असल्याचे सेतुमाधवराव पगडी आपल्या ग्रंथात पुराव्यानिशी दाखवून देतात. [ पगडी, १३] पगडी जरी संघाचे नाव घेत नसले तरी त्यांना संघच अभिप्रेत आहे हे स्पष्ट दिसते.

संघपरिवाराचा सततचा आंधळा आणि रक्ताळलेल्या असहिष्णुतेचा त्वेष त्यांनी मुत्सद्दी राजकारणी असलेल्या शिवरायांवर शेंदरासारखा लेपून टाकलाय. हा शेंदूर खरवडायला हवा. तेव्हाच महाराजांचे खरे रूप दिसू शकेल. हे काम धर्माचे चष्मे नसलेल्या सत्यशोधकांनाच करावे लागेल.
क्रमश:....

प्रा. हरी नरके, ७/५/२०२०

संदर्भासाठी पाहा: १. सेतुमाधवराव पगडी, छत्रपती शिवाजी, काँन्टीनेंटल प्रकाशन, पुणे, २०१९, पृ. ११, १२, १३, २६, २७,
२. दि. वि. काळे, छत्रपति शिवाजी महाराज, पुणे विद्यापीठ, पुणे, १९७१, पृ. २६४/६५

संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.  https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR3iGVCMJEhRtiAUu2-k_xFSJAUkHd_IcieJC_nmxlHjCCU3KBdfHUl67dU

Sunday, May 3, 2020

रा.स्व.संघ 20/ व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे : मनू










रा.स्व.संघ 20/ व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे : मनू : मनू संतांच्या एक पाऊल पुढे, मनोहर भिड्यांनी संतांचा केला अपमान-प्रा.हरी नरके


महाराष्ट्राची जडणघडण करण्यामध्ये संतविचारांचा फार मोठा वाटा. न्या.रानडे ते प्रा.गंबा.सरदार यांनी संतसाहित्याची सामाजिक आणि राजकीय फलश्रुती समाजाऊन सांगितलेली आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य उभारणीची पुर्वतयारी संतांच्या प्रबोधनपर विचारांनी केली होती हे न्या.म. गो.रानडे यांनी " मराठा सत्तेचा उदय" या ग्रंथात सप्रमाण मांडलेले आहे. संघाचे चेले मनोहर भिडे उठताबसता शिवछत्रपतींचे नाव घेत असतात आणि तरीही ते संतांचा धडधडीत अपमान करतात. दोन वर्षांपुर्वी भिड्यांनी जेव्हा संतांचा अवमान करणारी मुक्ताफळं उधळली तेव्हाच मी भिड्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यांनी देहू-आळंदीहून पंढरपूरला जाणार्‍या वारीत पुण्यात तलवारधारी झुंडी घुसवल्या होत्या. वारकरी चळवळ ताब्यात घेण्याचा त्यांच हा डाव वारकर्‍यांनी उधळून लावला.

महाराष्ट्राला पहिल्यांदा शिवराय सांगितले फुल्यांनी .त्यांना तर भिडे देशद्रोही म्हणतात. १९०६ कुणबी मराठा कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी ६०० पृष्ठाचे मौलिक शिवचरित्र लिहिले त्याचा उल्लेखसुद्ध भिडे करीत नाहीत. भिड्यांना शिवरायांच्या नावाचा गैरवापर करून मराठा-बहुजन मुलांची टाळकी संमोहित करून पेशवाईच्या सावलीत न्यायची आहेत.

भिड्यांचे शिवराय रयतेचे राजे नाहीत, ते शेतकरी, कुणबी, मावळ्यांचे उद्धारकर्ते नाहीत तर ते गोब्राह्मण प्रतिपालक, रात्रंदिन परधर्मद्वेश शिकवणारे, युवकांची माथी भडकावणारे, आधुनिक काळातून पुन्हा विषमतावादी ब्राह्मणी, वैदीक राज्यात नेऊ पाहणारे भिडेवादी शिवराय आहेत. त्यावर सविस्तर लिहिणारच आहे. आज भिड्यांना पुजनीय असणार्‍या मनूची काही मतं बघूयात.

मनू म्हणतो,
" व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे." [ अध्याय ९ वा श्लोक १९]
" लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [५/१५२]
" पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी." [५/१५४]
" स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्या चा भोग घेतात." [९/१४]
" पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [9९/१५]
" नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते."[९/४६]
................................

"मनुस्मृती" हा संस्कृत भाषेतील प्राचीन ग्रंथ बारा अध्यायांचा असून त्यात २६८४ श्लोक आहेत. हा ग्रंथ कधी लिहिला गेला यावर विद्वानांमध्ये मतभेद आहेत. मनू एक की अनेक यावरही वाद आहेत. मनू ही व्यक्ती होती की संस्था [मठ/परंपरा] याबद्दलही भिन्न मतं आहेत. इ.स.पुर्व १७५ ते इ.स.१७५ या साडेतीनशे वर्षात हा ग्रंथ विकसीत झाला असावा असे तज्ञ सांगतात. तशा हिंदूंना प्रमाण असलेल्या एकुण स्मृती १३७ असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदु कोड बिलाच्या चर्चेत संसदेत सांगतात. त्यात सर्वाधिक महत्वाच्या म्हणून मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, पाराशर स्मृती या मानल्या जातात. मनुस्मृती ही शेकडो वर्षे भारतीय समाजाची जणू राज्यघटनाच होती. अगदी ब्रिटीश भारतातसुद्धा इंग्रज न्यायालये कौटुंबिक कलहांमध्ये   मनुस्मृतीच्या आधारेच निकाल देत असत. मनुस्मृती हा फक्त धर्मग्रंथ नव्हता तर तो कायद्याचा ग्रंथ होता. त्याला धर्मशास्त्र असेही म्हटले जाई. बाबासाहेब त्याचा धर्मिक व राजकीय प्रभाव सांगताना ते लिगल आणि पिनल कोड होते असे नेमके शब्द वापरतात. 

" सार्थ श्रीमनुस्मृती" हा मूळ संस्कृत श्लोकांसह त्यांचा मराठी अनुवाद देणारा ग्रंथ वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट यांचा आहे. हा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचायला हवा. विशेषत: सर्व समाजातील स्त्रिया आणि माळी, मराठा, साळी, तेली, कुणबी, वंजारी, आगरी, भंडारी, शिंपी, सोनार, सुतार, नाव्ही आदींनी आवर्जून वाचायलाच हवा.

संस्कृत पाठशाळा चालवणारे बापटशास्त्री या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लिहितात, " मनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे व त्याची योग्यता इतर कोणत्याही स्मृतीपेक्षा अधिक आहे. सनातन धर्माचा जीव असे जे चार आश्रम व चार वर्ण त्यांची व्यवस्था या स्मृतीमध्ये जशी स्पष्ट दिसते तशी ती वेदांमध्ये आढळत नाही...स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांचा या स्मृतीमध्ये पूर्णपणे विचार केलेला आहे. "

मनुस्मृतीवर मेधातिथी, सर्वज्ञनारायण, कुल्लकभट्ट, राघवानंदसरस्वती, नंदन,रामचंद्र, गोविंदराज, श्रीमाधवाचार्य, धरणीधर, श्रीधरस्वामी, रूचीदत्त, विश्वरूप, भोजदेव व भारूचि अशा एकंदर चौदा महापंडितांनी निरनिराळ्याकाळी केलेल्या चौदा टिका सर्वमान्य आहेत.

या सर्व टिकांचे आठ खंड भारतीय विद्या भवनने प्रकाशित केलेले आहेत. ते मी वाचलेले आहेत. पॅट्रीक वोलिव्हेल [ Patrick Olivelle] यांनी वर्षानुवर्षे संशोधन करून मनुस्मृतीची प्रमाण [चिकित्सक] आवृ्त्ती तयार केलेली आहे. तिचे नावच "Manu's Code of Law: A Critical Edition and Translation of the Manava-Dharmasastra," असे असून हे पुस्तक  Oxford University Press ने प्रकाशित केलेले आहे. भारतरत्न पां.वा.काणे, यांचा पाच खंडांतील, आठ भागांचा, हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, पुणे 

डॉ. आ. ह. साळुंखे, आचार्य नरहर कुरूंदकर, डॉ. प्रदीप गोखले व भदन्त आनंद कौशल्यायन यांचे मनुस्मृतीवरचे ग्रंथ अतिशय मौलिक आहेत. ते कार्यकर्त्यांनी वाचलेच पाहिजेत.


महामहोपाध्याय बापटशात्रींचा मराठी अनुवाद पुढे देत आहे. [कंसात अध्याय व श्लोक क्रमांक दिलेला आहे.]

" सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरूषांस दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे.यास्तव ज्ञानी पुरूष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहात नाहीत." [२/१३]
" माता, बहीण व कन्या यांच्या बरोबरही पुरूषाने एकांतात बसू नये." [२/१५]
" ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्नं करू नयेत." [३/८]
" जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्याने विवाह करू नये." [ ३/११]
" ज्या कुळामध्ये पिता, पती द्वारा स्त्रियांची पूजा होत असते तेथील देवता प्रसन्न होतात." [३/५६]

" नवर्‍याने बायकोसोबत एका ताटात जेवन करू नये. तसेच पत्नीला जेवताना, शिंकताना, जांभई देताना पाहू नये." [४/४३]
" आता स्त्रियांचे धर्म सांगतो, ते ऎका- बाल्यावस्थेत मुलीने, तरूण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये." [५/४७]
" स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये." [५/४८]
" पिता, पती,पुत्र यांच्यावेगळी राहणारी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्हीं कुळांस निंद्य करते." [५/४९]
" पति जरी विरूद्ध असला तरी स्त्रिने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत." [५/१५०]

" लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [५/१५२]
" पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी." [५/१५४]
" पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय. तिचा यज्ञ होय. त्याच्या आज्ञेत राहाणे हाच तिचा स्वर्ग होय." [५/१५५]
" स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये." [५/१६२]
" स्त्रीधर्माप्रमाणे मन, वाणी, देह, यांच्याद्वारे जी आपली पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो." [५/१६६]

" पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे." [५/१६८]

" पिता,पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या आधीन ठेवावे. सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे." [६/२]
" विवाहाच्या पुर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे. सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही.योग्य नाही." [ ६/३]
" स्त्रीसाठी मद्यपान, दुर्जनसमागम, पतीपासून दूर राहणे, इकडे तिकडे भटकणे, अयोग्य वेळी निजणे, दुसर्‍याच्या घरी राहणे हे सहा व्याभिचारदोष होत." [९/१३]
"स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्या चा भोग घेतात." [९/१४]
"पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [९/१५]

" स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. स्मृतींचा नाही. धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतत." [९/१८]
" व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे." [९/१९]

" नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते."[९/४६]

तर संघाच्या मनोहर भिड्यांना मनुस्मृतीचे असे राज्य पुन्हा हवेय. लक्षात ठेवा या राज्यात सर्व स्त्रिया आणि मराठा, माळी, साळी, कुणबी, आग्री, भंडारी, वंजारी, तेली हे सर्व बलुतेदार, शूद्र तसेच अनुसुचित जातींचे लोक यांना गुलामाचे जीवन जगावे लागेल. अंधारीगुहा आणि वेठबिगारी करावी लागेल.हवेय असे राज्य तुम्हाला? या पोस्टवर प्रतिक्रिया लिहिताना मनु वा मनोहर भिडे यांच्याबद्दल संसदीय भाषाच वापरावी. शिवीगाळ करण्यामुळे मुद्दे मागे पडतात,त्यातनं आपलंच नुकसान होतं हे लक्षात ठेवा.
विशेषत: माझ्या फेसबुक मित्रयादीतील मैत्रिणी, भगिनी, मुली, माता यांची यावर काय मतं आहेत ते जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. 
संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.  https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR0sHk873-gdTIHynAQXFnSMvawoIdspxcQeYgXosgHDQ8gAkqOlEiycF7w


-प्रा.हरी नरके, ४/५/२०२०
[लेखक भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. लेखात व्यक्त झालेली मतं लेखकाची व्यक्तीगत मतं आहेत.]


संदर्भ-
१. सार्थ श्रीमनुस्मृती," मराठी अनुवाद, वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट, गजानन बुक डॆपो, कबुतर खाना,दादर,मुंबई, भरत नाट्य मंदीर,पुणे
२. Olivelle, Patrick (translator) (2004), The Law Code of Manu, Oxford World's Classics, Oxford University Press, ISBN 978-0-19-280271-2
३. Olivelle, Patrick (translator) (2005), Manu's Code of Law: A Critical Edition and Translation of the Manava-Dharmasastra, Oxford University Press, ISBN 978-0-19-517146-4
४. Olivelle, Patrick (translator) (1999), The Dharmasutras: The Law Codes of Ancient India, Oxford World's Classics, OUP Oxford, ISBN 978-0-19-283882-7
५. भारतरत्न पां.वा.काणे, हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, पुणे
*** डॉ. आ. ह. साळुंखे, आचार्य नरहर कुरूंदकर, डॉ. प्रदीप गोखले व भदन्त आनंद कौशल्यायन यांचे            मनुस्मृतीवरचे ग्रंथ
*** मनुस्मृतीवरील मेधातिथी, सर्वज्ञनारायण, कुल्लकभट्ट, राघवानंदसरस्वती, नंदन,रामचंद्र, गोविंदराज, श्रीमाधवाचार्य, धरणीधर, श्रीधरस्वामी, रूचीदत्त, विश्वरूप, भोजदेव व भारूचि अशा चौदा महापंडितांनी केलेल्या चौदा टिका, आठ खंड, भारतीय विद्या भवन, मुंबई

Saturday, April 25, 2020

संघकृत बुद्धीभेद आणि फुले-आंबेडकरांची बदनामी - रा.स्व.संघ 8







संघकृत बुद्धीभेद आणि फुले-आंबेडकरांची बदनामी - प्रा. हरी नरके , द वायर, मराठी 

सारे जग कोरोनाच्या दु:खात असताना काही चतुर मंडळींनी हीच वेळ साधायचे ठरवले. लोक जेव्हा चिंतेत असतात, दु:खात आणि तणावाखाली असतात, तेव्हा त्यांच्या त्या बेसावधपणाचा वापर करून आपला अजेंडा चतुरपणे पुढे रेटणे ही हिटलरची खासीयत होती. आपल्या देशातल्या गावठी हिटलरची चाल पण तशीच !


अरूण आनंद नावाचं एक उच्चभ्रू प्रस्थ आहे. ते ‘इंद्रप्रस्थ’ नावाची एनजीओ चालवतात. तिचे ते सीईओ आहेत. ते पत्रकारही आहेत. इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये त्यांचा वरच्या वर्तुळात वावर असतो. १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२९ वी जयंती होती. देशभरातील लॉकडाऊनमुळे ती लोकांनी घरातच साजरी केली. तर आनंद यांनी त्यानिमित्त एक व्हीडीओ प्रसारित केला व एक लेखही प्रकाशित केला. विषय – डा.आंबेडकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रशंसक होते, त्यांचे इतके प्रेम होते, की ते म्हणाले, संघ वाढवा, तुमच्याबरोबर मी निवडणुक युती करतो. संघाचे कार्यकर्ते म्हणजे बाबासाहेबांचे जीव की प्राण. त्यातल्या एकाला तर त्यांनी आपल्या ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’, या पक्षाचे सचिव, निवडणूक प्रमुख आणि प्रवक्ता नेमले. संघाचे सुप्रिमो गोळवलकरगुरूजी आणि डॉ. बाबासाहेब यांच्या भेटीगाठींमध्ये खलबते होत असत. रणनिती ठरे. बाबासाहेब पुन्हापुन्हा संघाच्या शिबिरांना भेटी देत असत. संघाचे कौतुक करीत असत. त्यामुळे संघाचे लाडके बाबासाहेब आणि बाबासाहेबांचा लाडका संघ असे घट्ट नाते होते. हे चित्र असे काही रंगवले गेले की आता बाबासाहेब हे संघाचे स्वयंसेवक होते, एव्हढेच सांगायचे बाकी राहिले.

संघाची एक कार्यपद्धती आहे. एकाचवेळी संघ अनेक आघाड्यांवर कार्यरत असतो. म्हणजे संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक बाळ गांगल, भिडेगुरूजी, अरूण शौरी हे महात्मा फुले व बाबासाहेबांची बदनामी करीत असतात. त्याचवेळेला दत्तोपंत ठेंगडी, भिकुजी इदाते, रमेश पतंगे संघ समरसतेच्या मनाचे श्लोक लिहित असताना बाबासाहेब आणि फुले यांच्या आरत्याही करीत असतात. त्याद्वारे त्यांना फुले-आंबेडकरांचे अपहरण करायचे असते. तिसरीकडे अफवा पसरवून घराघरात त्यांच्याबद्दल विद्वेशही पेरला जात असतो. अंगलट आलेच तर आम्ही तर त्यांची नावे प्रात:स्मरणीय म्हणून घेत असतो, असे सांगून सारवासारवही केली जाते.

३२ वर्षांपुर्वी बाळ गांगलांनी महात्मा फुल्यांवर गरळ ओकली. महाराष्ट्र संतापला. संघाने गांगलांचा आपला संबंध नाही, असे घोषित करून टाकले. माझ्या पहिल्या पुस्तकात मी गांगलांची मुलाखत छापलीय. तुम्ही फुल्यावर एव्हढे का संतापलात असे मी त्यांना विचारले असता ते म्हणाले, वयाच्या ५ व्या वर्षापासून मी स्वयंसेवक आहे. फुले हा हिंदूराष्ट्राच्या स्थापनेतला मुख्य अडथळा आहे, त्यांच्यामुळे ब्राह्मणांचे पावित्र्य, महात्म्य, गारूड धोक्यात आले, हे संघाने मला पटवले, तेव्हापासून मी फुल्यांना शत्रू क्रमांक एक मानतो. भिडेगुरूजी म्हणतात फुले देशद्रोही होते. म्हणजे ज्याने ब्राह्मण्यावर टिका केली, तो देशद्रोही. एका वाहिनीवर बोलताना जाहीरपणे ते म्हणाले, ‘बाबासाहेब मनूला मानणारे होते. मनूच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला बाबासाहेब जयपूरला स्वत: हजर होते.’ हा पुतळा जयपूरच्या उच्च न्यायालयात बसला १९८९ ला. डॉ. बाबासाहेब त्यापुर्वी ३३ वर्षे आधीच निधन पावलेले. इतके तर बुद्धीमान हे आंबापुत्र भिडेगुरूजी!

अरुण आनंद म्हणाले, ‘बाबासाहेब संघाचे प्रशंसक होते.’ बाबासाहेब संसदेत बोलताना १४ मे १९५१ रोजी आर.एस.एस. बद्दल बोलताना काय म्हणाले, ते संसदेच्या दप्तरात उपलब्ध आहे. [ पाहा. संसदेतील चर्चेचे खंड, ११ वा, भाग, २, लोकसभा सचिवालय प्रकाशन, भारत सरकार, नवी दिल्ली, पृष्ठ ८६८७-९० आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड, १५, महाराष्ट्र सरकार, मुंबई, १९९७, पृ. ५६०]
” May I mention the R.S.S. and Akali Dal? Some of them are very Dangerous Associations. “[ Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.15, Edited by Vasant Moon, Govt of Maharashtra, Mumbai, 1997, pp.560] [Parliament Debates, Vol.11, Part Two, 14 th May 1951,pp.8687-90]
“मी आता आर.एस.एस आणि अकाली दलाचा उल्लेख करतो. ह्या अत्यंत धोकादायक संघटना आहेत.”  हे संसदेतल्या अधिकृत भाषणातले बाबासाहेबांचे उद्गार आहेत. हे आर.एस.एस.चे कौतुक आहे का?

आनंद म्हणाले, ‘बाबासाहेबांनी त्यांच्या पक्षाची १९५२ च्या निवडणुकीत मध्यप्रदेशात संघाचे पिल्लू असलेल्या जनसंघाबरोबर युती केली होती.’ १९५२ सालच्या निवडणुक जाहीरनाम्यात बाबासाहेब काय म्हणतात ते बघा-
“As regards other Political Parties, the Scheduled Caste Federation’s attitude can be easily defined. The Scheduled Caste Federation will not have any alliance with any reactionary Party such as the Hindu Mahasabha or the R.S.S.” [ Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.17, Part ONE, Edited by Prof Hari Narke and others, Govt of Maharashtra, Mumbai, 2003, pp.402]

“इतर राजकीय पक्षांच्या संदर्भात शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा निर्णय स्पष्टपणे अधोरेखित करता येईल. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन प्रतिक्रियावादी [विघटनवादी] असलेल्या हिंदु महासभा किंवा आर.एस.एस. बरोबर कदापिही युती करणार नाही.” तेंव्हा जनसंघाबरोबर युतीचा प्रश्नच उद्भवत नाही.

आता ही सगळी अस्सल आणि छापील साधने आहेत म्हणून तरी बरे, नाहीतर या लोकांनी काय हैदोस घातला असता माहित नाही.

आनंद यांनी दावा केला, की संघाचे दत्तोपंत ठेंगडी बाबासाहेबांचे लाडके होते. त्यांना बाबासाहेबांनी स्वत:च्या पक्षाचे सचिव नेमले. प्रचारप्रमुख नेमले. प्रवक्ता नेमले. आता आनंद यांनी एव्हढेच सांगायचे बाकी ठेवले की बाबासाहेबांनी ठेंगडींना आपला सर्वोच नेताच [बॉस] मानले.

शेड्युल्ड कास्ट फेडरेशन (शेकाफे) या पक्षाची घटना छापील आहे. ती आम्ही "डॉबाआंलेभा" मालिकेच्या १७ व्या खंडाच्या दुसऱ्या भागात प्रकाशित केलेली आहे. या घटनेनुसार तीच व्यक्ती पक्षाचा सदस्य वा पदधिकारी होऊ शकते, जी अनुसुचित जातीची आहे. ठेंगडी काही अनुसुचित जातीचे नव्हते. शिवाय दुसर्‍या संघटनेचे सभासद असलेल्या व्यक्तीला ‘शेकाफे’चे दरवाजे बंद होते. ठेंगडी या काळात संघाचे, इंटक व रेल्वे व पोस्टल युनियन [कम्युनिस्ट] यांचे पदाधिकारी होते. आता अशा माणसाला नियमाप्रमाणे मुदलात ‘शेकाफे’चा सदस्यच होता येत नव्हते. पदाधिकारी तर फार दूरची बात.

आनंद म्हणतात, ‘बाबासाहेबांनी संघाच्या पुण्यातील शिबिरांना दोनदा भेटी दिल्या, तिकडे बाबासाहेब जेवले, त्यांनी संघाचे कौतुकही केले. इ. इ.’ बाबासाहेबांच्या या भेटीची छायाचित्रे, पत्र्यव्यवहार, त्याच्या बातम्या यांची कात्रणे यातले काहीही संघातर्फे पुरावा म्हणून दिले गेलेले नाही. १९२७ पासून बाबासाहेब जिथे जिथे जात तिथल्या बातम्या त्यांच्या ‘बहिष्कृत भारत’ व ‘जनता’मध्ये छापल्या जात. संघाच्या शिबिरांना बाबासाहेबांनी जर खर्‍याच भेटी दिल्या असत्या, तर त्याच्या बातम्या निदान ‘बहिष्कृत भारत’ व ‘जनता’मध्ये तरी आल्याच असत्या ना? अशी कोणतीही बातमी आलेली नाही. संघाचे आणि केसरीचे गुळपीठ होते. बाबासाहेब याच काळात लोकमान्य टिळकांच्या मुलाला श्रीधरला भेटत असत. त्यांचा पत्र्यव्यवहार आहे, बातम्या आहेत, मग संघाच्या भेटीच्या बातम्या निदान केसरीत तरी यायला हव्या होत्या. संघाला मानणारी या काळात निदान डझनभरतरी पुणेरी वर्तमानपत्रे होती. त्यातही खबरबात नाही, असे का? संघाने या भेटींचे पुरावे द्यावेत, ते तपासून ठरवू.

आनंद म्हणतात, ‘संघसुप्रिमो गोळवलकरगुरूजी बाबासाहेबांना भेटले आणि त्यांना बाबासाहेब म्हणाले संघ वाढवा.’ प्रत्यक्षात काय घडले होते?

मराठ्यांना रोखण्यासाठी मदत मागायला आर. एस. एस. सुप्रिमो गोळवलकरगुरूजी बाबासाहेबांना भेटले होते हे खरे आहे. बाबासाहेब तेंव्हा देशाचे कायदा मंत्री होते. मंत्र्यांना कोणीही भेटू शकतो. गुरूजी भेटले. त्यांनी मदत मागितली, सहकार्य मागितले, पण रा.स्व. संघ हा " विषवृक्ष" आहे असे, सांगत बाबासाहेबांनी सहकार्य नाकारले.

मराठा समाजाचा सामना करण्यासाठी, त्यांना रोखण्यासाठी आम्हा ब्राह्मणांना मदत करा, नाहीतर मराठे आपल्या सर्वांनाच संपवतील, आपण सारे मराठेतर एकत्र येऊन मराठ्यांचा बंदोबस्त करू असा प्रस्ताव घेऊन ते बाबासाहेबांना ७ सप्टेंबर १९४९ ला दिल्लीत जाऊन भेटले होते.

बाबासाहेबांनी त्यांना कठोरपणे खडे बोल सुनावले. “पेशवाईत तुम्ही लोकांनी आमच्यावर कितीतरी अत्याचार केले, हे मी कसे विसरू? तुम्ही पुन्हा पेशवाईची स्वप्नं बघता आहात. त्यासाठी तुम्ही रा.स्व.संघाच्या रूपात ब्राह्मण महासंघ सुरू केलेला आहे. तुमच्या संघात सारे ब्राह्मणच तर आहेत. तिथे ना मराठे आहेत, ना महार. तुमचा संघ हा विषवृक्ष आहे. त्याचे परिणाम फार वाईट होणार आहेत. तुम्हाला संघटनाच बनवायची असेल तर ती जातीनिर्मुलनासाठी आणि चातुर्वण्यव्यवस्थेचा नाश करण्यासाठी सुरू करा. पेशवाईतील पापांपासून तरच तुम्हाला मुक्ती मिळेल. जुन्या चुका सुधारा. ब्राह्मण राज्याची स्वप्नं विसरा. मी तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही,” अशा कठोर शब्दात बाबासाहेबांनी गोळवलकरगुरूजींना फटकारले. बाबासाहेबांच्या एकाही प्रश्नाला ते उत्तर देऊ शकले नाहीत. चडफडत ते तिथून निघून गेले.

बाबासाहेब – गोळवलकर यांच्या भेटीचा हा तपशीलवार वृत्तांत लिहिणारे सोहनलाल शास्त्री, हे दिल्लीतले मोठे विद्वान होते. ते या भेटीच्या वेळी तिथे प्रत्यक्ष हजर होते. ते बाबासाहेबांकडे नेहमी जात-येत असत. गोळवलकरांबद्दल सोहनलाल शास्त्रींना माहिती देताना बाबासाहेब म्हणाले, “हे ब्राहमण गृहस्थ, हिंदूंचे पोप आहेत. असे सनातनी विचारांचे धर्मगुरू जिथे आहेत तिथल्या लोकांचे कधीही भले होणार नाही!” { पाहा: बाबासाहेब डा. अम्बेडकर के सम्पर्क में २५ वर्ष, सोहनलाल शास्त्री, भारतीय बौद्ध महासभा, दिल्ली प्रदेश, नई दिल्ली, १९७५, पृ. ५४/५५} या भेटीची जनतामध्ये बातमीही प्रकाशित झाली होती.

चातुर्वर्ण्याची प्रस्थापना आणि संवर्धन करणार्‍या संघटनेच्या कामावर बाबासाहेब कसे खूश होऊ शकतील? दोघांची विचारधारा, कार्यप्रणाली, विषय पत्रिका सगळेच विरोधी असताना बाबासाहेब त्यांचे कौतुक कसे आणि का करतील?

बरं याच काळात संघाचे काय उद्योग चालले होते, तर संघ कार्यकर्ते ३ जानेवारी १९४९ ला राज्यघटना सभेचे कामकाज उधळायला संसदेत घुसले होते.

शिस्तीत घटनासभा बंद पाडून भारताचे संविधान लिहिण्याच्या कामात मोडता घालून, हे लोक संविधानाला पाठींबा देत होते का? यालाच हे संविधानाचा आणि संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब यांचा ते सन्मान करीत होते असे म्हणतात का?

(वाचा-) “संविधान सभेचे उपाध्यक्ष डॉ. एच. सी. मुखर्जी यांनी सदस्यांना सांगितले, की आपले कामकाज उधळण्यासाठी, गोंधळ घालण्यासाठी काल आर.एस.एस.चे कार्यकर्ते सभागृहाच्या लॉबीत घुसले होते. सिक्युरिटीने त्यांचा वेळीच बंदोबस्त केल्याने अनावस्था प्रसंग टळला. तरी यापुढे सदस्यांनी फक्त ओळखीच्याच कार्यकर्त्यांना प्रवेश पत्रिका द्याव्यात.” (संविधान सभेचे इतिवृत्त, भारत सरकार प्रकाशन, नवी दिल्ली, खंड, ७वा, पृ. १२३३, दि. ४ जाने. १९४९ CAD7/1233, ४ जाने.१९४९)

सुर्यवंशी नावाच्या एका संघ स्वयंसेवकाने लिहिले आहे, की बाबासाहेब घटना सभेत निवडून यावेत यासाठी जनसंघाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपल्या एका सदस्याला राजीनामा द्यायला लावला आणि तिथून बाबासाहेबांना निवडून आणले. किती सराईतपणे खोटे बोलतात हे संघीय. मुदलात श्यामाप्रसाद यांनाच काँग्रेसने निवडून आणले होते. त्यांचा अन्य कुणीही सदस्य नव्हता. बाबासाहेब प्रथम निवडून आले, ते बंगालमधून. जोगेंद्रप्रसाद मंडल हे बाबासाहेबांचे तिथले आमदार होते. त्यांनी बाबासाहेबांना घटना परिषदेवर निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली. पुढे बाबासाहेबांचा हा मतदार संघ पाकीस्तानात गेल्याने बाबासाहेबांचे सदस्यत्व गेले. पण पुण्याचे बॅ. जयकर हे काँग्रेसचे सदस्य होते. त्यांनी राजीनामा दिल्याने, रिक्त झालेल्या जागेवर बाबासाहेबांनी उभे राहावे अशी विनंती राजेंद्र प्रसाद व वल्लभभाईंनी त्यांना केली. याकाळातील सगळा पत्र्यव्यवहार उपलब्ध आहे. ही गोष्ट आहे, जुलै १९४७ ची. तेंव्हा जनसंघ नव्हताच, आणि त्यामुळे त्यांचा कोणी सदस्यही नव्हता.

खुद्द माझ्याबद्दलसुद्धा या सूर्यवंशींनी काही भन्नाट शोध लावलेत, म्हणे मी संघाच्या कार्यक्रमांना गेलो आणि तिथे संघाचा गौरव केला. साफ खोटे. मी आजवर संघाच्या एकाही कार्यक्रमाला गेलेलो नाही. गौरवाचा तर प्रश्नच उपस्थित होत नाही.

माझे महात्मा फुल्यांवरील [ संघाच्या बाळ गांगलचा प्रतिवाद करणारे ] पहिले पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मला माझ्या पिंपरीच्या घरी नवले नावाचे एक गृहस्थ भेटायला आले. ते म्हणाले, महात्मा फुले शताब्दी निमित्त आम्ही मुंबईत एक वैचारिक चर्चासत्र घेतोय, तुम्ही फुल्यांवर पेपर वाचा. मी गेलो. पेपर वाचला. आयोजक संस्थेचे नावही तोवर मी ऎकलेले नव्हते. त्यांनी त्याची पुस्तिकाही छापली आहे. माझा पेपरही त्यात आहे. पुढे त्यांनी असेच दुसरे चर्चासत्र नाशिकला घेतले. तिथेही मला बोलावले. मी म. फुल्यांवर बोललो. मात्र तेंव्हा मला संशय आला. मी खोदून खोदून माहिती काढल्यावर कळले, की ‘समरसता मंच’, या नावाने वावरणारी ही मंडळी संघाशी संबंधित आहेत. माझ्यापासून खरी माहिती दडवून ठेऊन माझी फसवणूक केल्याबद्दल मी त्यांना फटकारले आणि त्याउप्पर त्यांना माझ्या दारातही उभे केले नाही, या गोष्टी फुले शताब्दी वर्षातल्या म्हणजे ३० वर्षांपुर्वीच्या आहेत.

आता तर हे लोक माझ्याच तोंडात संघाचे मी कौतुक केल्याचे शब्द घुसवू लागलेत! या खोटारडॆपणाचा, बुद्धीभेद अभियानाचा आणि फुले-आंबेडकरांचे अपहरण करण्याच्या प्रवृत्तीचा मी तीव्र निषेध करतो. मी संघाशी संबंधित असतो, तर संघाचे सरकार महाराष्ट्रात असताना राज्य शासनाच्या मागासवर्ग आयोग, महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समिती, भाषा सल्लागार समिती, बालभारती, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे महात्मा फुले अध्यासन, या सर्व संस्थामधून देवेंद्र फडणवीस सरकारने मला काढून टाकले असते काय?

प्रा. हरी नरके, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे’, या मालिकेतील खंड १७ ते २२ चे संपादक आहेत.

रविवार विशेष  April 26, 2020 12:43 am

https://marathi.thewire.in/rss-fake-story-and-dr-babasaheb-ambedkar

No ‘ideological synergy’ between Ambedkar and RSS, rss7




No ‘ideological synergy’ between Ambedkar and RSS, Rajiv Tuli can read my book for facts
There is no evidence to support the claims that Ambedkar visited an RSS workshop or that Thengadi was Ambedkar’s election agent in 1954 Bhandara bypoll.


HARI NARKE 25 April, 2020 11:42 am IST


Rajiv Tuli has made imaginary, baseless and fabricated claims.


Tuli, in his article, echoes Arun Anand by reiterating that Dr Ambedkar appointed Dattopant Thengadi as the secretary of the Scheduled Castes Federartion. He also claims that Thengadi, allegedly Ambedkar’s most trusted person, was also appointed as an election agent in the1954 Bhandara Lok Sabha bypoll in Maharashtra. But Tuli has not provided any authentic evidence to support this claim. He must know that a polling representative is not appointed orally; a letter is submitted to the election officials in this regard.


Tuli should submit any written document in connection with the appointment of Thengadi by Ambedkar, instead of building castles in the air.


Far from Tuli’s claim, Ambedkar had appointed P. N. Rajbhoj, General Secretary of All India Scheduled Castes Federation, and Babu Haridas Avle, Secretary of Scheduled Castes Federation of Madhya Pradesh as the chief election agents The evidence of this can be found in my book, Dr. Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, DBAWS, Vol.18, Part 3.

As per the constitution of Scheduled Castes Federation, appointment of non-SC person as a member or office bearer was illegal and unconstitutional. In the same fashion, induction of a person in Scheduled Castes Federation who happens to be a member of any other party or organisation was “unconstitutional”. (DBAWS, Vol. 17, Part Two, pp. 459).


Thengadi was a non-SC and a Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) man and a Bharatiya Jana Sangh office bearer of Madhya Pradesh. Therefore, his appointment as the secretary of SCF was highly impossible.


Moreover, election was at Bhandara and Thengadi did not belong to that constituency. He was from Arvi district, Wardha. Logically speaking, there was no point in appointing an incongruous person like Thengadi as the election agent at Bhandara.


Claims without evidence


Bhandara by-election happened between 2 to 5 May 1954 (Dr. Dhananjay Keer, Dr. Babasaheb Ambedkar, Biography, first edition 1966, 9th Edi. 2014, Mumbai, pp.630).


The Scheduled Castes Federation activities during this election — campaign, meetings, rallies, speeches etc. —were comprehensively and frequently reported in Janata by Ambedkar in April and May 1954. All the leaders who participated and addressed the rallies have been listed in the Janata reports.


If Thengadi was a trusted associate of Ambedkar, then how come he was absent from all the meetings and rallies of the Scheduled Castes Federation? Thengadi finds no mention, either as the speaker or as the guest of honour, in the election coverage done in Janata by Ambedkar.


Communist Party of India (CPI) and many others had supported Ambedkar in Bhandara by-election. A. B. Bardhan of the CPI participated in the campaign rallies of SCF (DBAWS, Vol. 18, Part Three,pp.374). Does Tuli want to suggest that the CPI and the Jana Sangh were in coalition in this election?


Tuli indicates a one-year interval between Ambedkar’s statement about the RSS and the 1952 elections and states that anything was possible in politics during the span of one year.


But, the fact was that the manifesto of Scheduled Castes Federation pertaining to the rejection of the possibility of an alliance with the Hindu Mahasabha and the RSS was for the Lok Sabha elections, which took place on 4 January 1952.


It was not decided one year earlier as Tuli puts, but in October 1951 only. It is quite natural that the manifesto for the election to be held on 4 January 1952 would be drafted at least three months before, i.e. in October 1951.


But, Tuli counts this three-month duration as one whole year. Perhaps, he does not know the facts or doesn’t want to accept them. Either way, he should refer to my book on Ambedkar’s writings and speeches. (DBAWS, Vol. 17, Part One, dated 3 Oct. 1951, pp. 402).


Ambedkar called RSS ‘poisonous’

Tuli further says, “His views on Partition and radicalism in Islam also reflect clear ideological synergy between the two.” He, very enthusiastically refers, for this cunning inference, Dr. Ambedkar’s Pakistan or Partition of India. But he conveniently forgets Ambedkar’s scathing remarks on the RSS in the same book. As a matter of fact, there was not an iota of ideological resemblance between Ambedkar and the RSS.


In fact, Golwalkar Guruji’s Bunch of Thoughts is the Bible for the RSS. Guruji believes in Chaturvarna syatem. He prefers protection and promotion of Sanatan Sanskriti and construction of a Hindu Rashtra. Dr. Ambedkar says, “If Hindu Raj does become a fact, it will, no doubt, be the greatest calamity for this country. No matter what the Hindus say, Hinduism is a menace to liberty, equality, and fraternity. On that account it is incompatible with democracy. Hindu Raj must be prevented at any cost.” (Pakistan or The Partition of India, 1946, pp. 358. DBAWS, Vol. 8, 1990, 358)


On 07 September 1949, Golwalkar Guruji met Law Minister Ambedkar in Delhi. He sought Ambedkar’s help to curb Marathas. Ambedkar said at that time, “RSS is a poisonous tree. RSS is dreaming of Peshwa rule. It is not possible to be with you. I can’t support you.”


A detailed report of this visit has been published in Ambedkar’s Janata on 10 September 1949. Moreover, Sohanlal Shastri, chief of Delhi Bauddh Mahasabha — founded by Ambedkar — and a well-known scholar, was present at the moment. He has elaborated this meeting in his book- Babasahab Dr. Ambedkar ke Sampark mein 25 warsha, Bhartiya Bauddha Mahasabha, Delhi Pradesh, (New Delhi, pp. 54-55).


During the same period, RSS was obstructing the constitution being written by Ambedkar. RSS was against the Hindu Code Bill. and its members had broken into the auditorium gallery to drive away the constitution assembly; the incident is reported in the parliamentary records. (Contitutional Assembly Debates, Govt. of India Publication, New Delhi, Vol. 7 p. 1233, Dated, 4 January 1949).


Documentary sources are counted as more authentic than the oral narratives. And moreover, Thengadi and Observer belong to RSS, hence there is no authenticity and validity of their claims.


Thengadi wrote the book several years after Ambedkar’s demise. Thengadi, Arun Anand or Tuli have not given any evidence from Ambedkar’s time.


Even Ambedkar’s visit to the RSS workshop is imaginary. No evidences, such as photos, correspondence or the news published in contemporary papers have been provided by the RSS.


Has RSS abandoned ‘Ramrajya’?

Ambedkar burned Manusmriti, renounced Hindu religion, refuted Hinduism and embraced Buddhism. While embracing Buddhism he took 22 pledges, of which, eight are:-

1. I shall have no faith in Brahma, Vishnu, Mahesh nor shall I worship them.
2. I shall have no faith in Ram and Krishna nor shall I worship them.
3. I shall have no faith in Gauri, Ganapati and other Gods and Goddesses of Hindu religion nor shall I worship them.
4. I do not believe in the theory of incarnation of Gods.
5. I do not and shall not believe that the Lord Buddha was the incarnation of Vishnu. I believe this to be, mischievous and false propaganda.
6. I shall not perform “shraaddha” nor shall I give “pind dan”.
7. I shall not perform any ceremony through Brahmins.
8. I hereby embrace Buddhism by renouncing my old Hindu religion, which is detrimental to the prosperity of the humankind and discriminate human beings and treat them low. (DBAWS, vol.17, part Three, pp.531).


If so, then, whether RSS has abandoned the idea of Ramrajya is an interesting question. Does RSS advocate Ambedkar’s books — Riddles in Hinduism, Riddles of Ram and Krishna and Revolution and Counter Revolution? RSS wants merging (samarasata), while Ambedkar wants Annihilation of Caste, which is his basic ideological position.


In a nutshell, even if viewed microscopically, there is no resemblance between Ambedkar and the ideologies of the RSS. They are shrewdly attempting to hijack Ambedkar who has been globally accepted and recognised as the most crucial philosopher leader of the oppressed, while the image of RSS is that of a fascist.


The author is the Editor of Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol. 17 to 22, published by the Government of Maharashtra.

Views are personal.

https://theprint.in/opinion/no-ideological-synergy-between-ambedkar-and-rss-rajiv-tuli-can-read-my-book-for-facts/408612/


TAGS alliance Ambedkar Bhandara Evidence ideology RSS Scheduled Castes Federation

Friday, April 24, 2020

डॉ. आंबेडकर म्हणतात,"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे तर विषारी झाड!"-@प्रा.हरी नरके, रा.स्व.संघ 6



संघाचे सगळे दावे कपोलकल्पित, निराधार आणि बनावट-

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिल्लीचे पदाधिकारी श्री. राजीव तुली यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संघाच्या जवळकीचे दि प्रिंटमध्ये २३ एप्रिल २०२० रोजी केलेले सर्व दावे कपोलकल्पित, निराधार आणि बनावट आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आर.एस.एस. हा तर विषवृक्ष आहे! ते पुढे असेही म्हणतात की, हिंदू राष्ट्र हे तर देशावरचे महाभयंकर संकट आहे! काहीही करून हे संकट आपण रोखले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघाला जवळ करणेच शक्य नाही.

ठेंगडींची नियुक्ती ह्या निव्वळ हवेतल्या बाता-

१. तुलींनी दावा केला आहे की संघाच्या दत्तोपंत ठेंगडी यांची शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे सेक्रेटरी म्हणून डॉ. आंबेडकरांनी नियुक्ती केली होती. तुली यांचा असाही दावा आहे की ठेंगडी डॉ. आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू असल्याने त्यांनी १९५४ मध्ये भंडारा पोटनिवडणुकीत त्यांना आपला निवडणूक प्रतिनिधी नेमले होते. असेच दावे याआधी अरूण आनंद यांनी केले होते. ते मी पुराव्यानिशी फेटाळले होते. पण संघाचा खोटारडेपणा असा की खोटे दावे पुन्हापुन्हा करीत राहायचे. पण ठेंगडींच्या ह्या नियुक्तीचा लेखी पुरावा तुलींनी सादर केलेला नाही. निवडणूक प्रतिनिधी तोंडी नेमला जात नाही. निवडणूक अधिकार्‍यांना तसे लेखी कळवावे लागते. तुली यांनी ठेंगडींच्या नियुक्तीच्या कपोलकल्पित कहाण्या सांगणे, तोंडी दावे करणे आणि हवेत महाल बांधणे सोडून ठेंगडींच्या नियुक्तीचे लेखीपत्र सादर करावे. विषय संपला.

शेकाफेचे महासचिव राजभोज तर म.प्र.सचिव आवळे- ठेंगडी नव्हेत-

२. या निवडणुकीचे प्रमुख म्हणून शेकाफेचे अ.भा. जनरल सेक्रेटरी पां. ना. राजभोज व मध्यप्रदेश शेकाफेचे सेक्रेटरी बाबू हरिदास आवळे यांची नियुक्ती डॉ. आंबेडकरांनी केलेली होती. [ पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर: रायटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेस, खंड,१८ वा, भाग ३ रा ]

३. शेकाफेच्या घटनेनुसार नॉन श्येड्युल्ड कास्ट व्यक्तीची सदस्य वा पदाधिकारी म्हणून जशी नियुक्ती शक्य नव्हती तशीच जी व्यक्ती इतर संघटनेची वा पक्षाची सदस्य असेल तर तिचीही नियुक्ती करता येत नव्हती. ठेंगडी हे नॉन शेड्युल्ड कास्ट असल्याने व ते आर.एस.एस. RSS तसेच भारतीय जनसंघाचे मध्यप्रदेशचे पदाधिकारी असल्याने त्यांची नियुक्ती शेकाफेचे सचिव म्हणून होऊ शकत नव्हती. शेकाफेच्या घटनेत स्पष्टपणे म्हटले आहे की, Any person belonging to the scheduld castes and Who is not a member of any other political or any social or religious organisatoin can be become a member of SCF. { डॉ. बा.आं.ले.भा. खंड 17 वा, भाग दुसरा, पृ. 459}

 निवडणूक भंडार्‍याला ठेंगडी वर्ध्याचे- आणि नवखे-

४. शिवाय निवडणूक भंडार्‍याला होती आणि ठेंगडी त्या मतदार संघातले मतदार नव्हते. ते वर्ध्याचे आर्वीचे होते. अशा अपरिचित व्यक्तीच्या इलेक्शन एजंट म्हणून केलेल्या नियुक्तीचा निवडणुकीत काय फायदा? ठेंगडी तेव्हा अगदी नवखे होते.

५. तुली एकुण दोन वेगवेगळ्या निवडणुकांबद्दल एकत्र बोलत आहेत. पहिली १९५२ सालची लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि दुसरी भंडार्‍याची १९५४ सालची ची पोटनिवडणूक. भंडारा येथील लोकसभा पोटनिवडणूक २ ते ५ मे १९५४ रोजी पार पडली. या निवडणुकीसाठी डॉ. आंबेडकरांनी केलेले प्रचार दौरे, भाषणे आणि निवडणुकीची वार्तापत्रे एप्रिल आणि मे १९५४ च्या जनता या डॉ. आंबेडकरांच्या स्वत:च्या वर्तमानपत्रात सविस्तरपणे अनेकदा प्रकाशित झालेली आहेत. जनताचे अंक पुराव्यासाठी आजही उपलब्ध आहेत. या सर्व सभांना उपस्थित असलेले नेते, सभेत भाषणे केलेले नेते यांच्या नावांची मोठी यादी जनतामध्ये आलेली आहे. भंडार्‍याच्या एकाही प्रचार सभेला ठेंगडी हजर नव्हते. ते जर डॉ. आंबेडकरांचे विश्वासू असे निवडणुक प्रतिनिधी होते तर मग ते सर्वच प्रचारसभांना गैरहजर का होते? याचे उत्तर संघ देत नाही. ठेंगडींचा प्रचार सभांमध्ये वक्ता वा मंचावर उपस्थित सदस्य असा साधा उल्लेखसुद्धा जनता या डॉ. आंबेडकारांच्या वर्तमानपत्रामध्ये नाही.
यावरूनच सिद्ध होते ठेंगडी बाबासाहेब आंबेडकरांचे निवडणूक प्रतिनिधी नव्हते.

काय जनसंघ- कम्युनिस्टांची युती होती?

६. या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षासह इतर अनेक पक्ष,संघटनांनी स्वत:हून डॉ. आंबेडकरांना पाठींबा दिलेला होता. कम्युनिस्ट पक्षाचे नेते श्री ए. बी. वर्धन हे भंडार्‍याच्या प्रचारसभांना हजर असत. या निवडणुकीत कम्युनिस्ट आणि जनसंघ यांची युती होती व ते एकत्र काम करीत होते असे तुलींना म्हणायचे आहे काय?

एक वर्ष नाही अवघे तीन महिने-

७. राजकारणात एका वर्षात काहीही होऊ शकते असे विधान करून डॉ. आंबेडकरांचे आर.एस.एस. ही प्रतिगामी व विघटनवादी असल्याबाबतचे विधान व लोकसभा निवडणूक यात वर्षाचे अंतर होते असे तुली सांगतात. वस्तुस्थिती अशी आहे इथे तुली १९५२ च्या लोकसभा निवडणुकीबाबत बोलत आहेत. " हिंदु महासभा व आर.एस.एस.बरोबर शेकाफेची निवडणुक युती होऊ शकत नाही हा शेकाफेचा बाबासाहेबांनी स्वत: लिहिलेला निवडणूक जाहीरनामा ४ जाने १९५२ रोजी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठीचाच आहे. तुली म्हणतात तसा तो एक वर्षे आधीचा नसून ऑक्टोबर १९५१ चा आहे. जाहीरनामा लेखन, प्रकाशन, प्रदीर्घ, देशव्यापी प्रचारमोहीम आणि अनेक आठवड्यांमध्ये पार पडलेली निवडणूक या तीन महिन्याच्या काळातील सलग गोष्टी आहेत. १९५१ च्या शेवटी जाहीरनामा व निवडणूक प्रचार झाला व ४ जानेवारी १९५२ ला मतदान झाले असा हा एकत्र कार्यक्रम होता. त्यात १९५१ आणि १९५२ असे वर्षाचे वर्षाचे अंतर नव्हते. [ डॉ. बा.आं.ले.भा. खंड 17 वा, भाग पहिला, दि. 3 ऑक्टोबर 1951, पृ. 402]

हिंदूराष्ट्र हे महाभयानक संकट-

८. देशाची फाळणी व इस्लाम याबाबतची डॉ. आंबेडकरांची व संघाची मतं यात खूप साम्य असल्याचा दावा तुली करतात. यासाठी डॉ. आंबेडकरांच्या ज्या "पाकीस्तान किंवा भारताची फाळणी "या पुस्तकाचा हवाला ते देतात, त्याच पुस्तकात आर.एस.एस.बद्दल आंबेडकरांनी संतप्त उद्गार काढलेले आहेत. त्यातून हे निर्विवादपणे सिद्ध होते की आर.एस.एस.आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारधारेत काडीचेही साम्य नव्हते. गोळवलकरगुरूजींचे "बंच ऑफ थॉट" हे आर.एस.एस.चे बायबल आहे. गुरूजी चातुर्वर्ण्य मानतात. सनातन संस्कृती रक्षण, हिंदुराष्ट्राची स्थापना ह्याला प्राधान्य देतात.

संघ म्हणजे मान न मान मैं तेरा मेहमान-

आंबेडकर म्हणतात, " हिंदु राष्ट्राची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरली तर या देशावर कोसळलेली ती महाभयानक आपत्ती असेल. हिंदुत्वाचे समर्थक हिंदू त्याबद्दल काहीही म्हणोत, पण हिंदुत्व हे स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे शत्रू आहे. हिंदुत्व हे लोकशाहीविरोधी आहे. म्हणून कोणतीही किंमत द्यावी लागली तरी आपण हिंदुराष्ट्र घडू देता कामा नये." { पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पाकीस्तान किंवा भारताची फाळणी, १९४६, पृ. ३५८, डॉ. बा.आं.ले.भा. खंड 8 वा, 1990, पृ. 358} या कडक शब्दात हिंदुराष्ट्रवादाला नकार देणारे बाबासाहेब आणि हिंदू राष्ट्रवाला संघ यांच्यात कसलेच साम्य नव्हते. हे म्हणजे " मान न मान मैं तेरा मेहमान" असला लोचट गळेपडूपणा संघाने चालवलेला आहे.

मराठाविरोधी गोळवलकरगुरूजी- संघ हा विषवृक्ष-

९.]  ७ सप्टेंबर १९४९ ला आर.एस.एस.सुप्रिमो गोळवलकरगुरूजी कायदामंत्री डॉ. आंबेडकरांना दिल्लीत जाऊन भेटले होते. त्यांनी मराठ्यांना रोखण्यासाठी आंबेडकरांकडॆ मदत मागितली. तेव्हा डॉ. आंबेडकर म्हणाले, " आर.एस.एस. हा विषवृक्ष आहे. आर.एस.एस.ला पेशवाईची स्वप्नं पडत आहेत. माझे तुमच्याशी जमूच शकत नाही. मी तुम्हाला कसलेही सहकार्य देऊ शकत नाही."  या भेटीची विस्तृत बातमी तिसर्‍या दिवशी डॉ. आंबेडकरांच्या जनताने १० सप्टेंबर १९४९ ला दिलेली आहे. शिवाय या दोघांच्या भेटीच्यावेळी डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या बौद्ध महासभेचे दिल्लीचे प्रमुख व थोर विद्वान सोहनलाल शास्त्री प्रत्यक्ष हजर होते. त्यांच्या ग्रंथात हा तपशील आलेला आहे. { पाहा: बाबासाहेब डॉ. अम्बेडकर के सम्पर्क में २५ वर्ष, सोहनलाल शास्त्री, भारतीय बौद्ध महासभा, दिल्ली प्रदेश, नई दिल्ली,पृ. ५४/५५}


संविधान आणि हिंदु कोड बिलाला संघाचा विरोध-

१०. याच काळात डॉ. आंबेडकर लिहित असलेल्या भारतीय संविधानाला आर.एस.एस. विरोध करीत होती. हिंदु कोड बिलालाही संघाचा विरोध होता. घटना सभेचे कामकाज उधळण्यासाठी आर.एस.एस.चे सदस्य संसदेच्या सभागृहाच्या गॅलरीत घुसले होते अशी नोंद पार्लमेंटच्या दप्तरात आहे. [ पाहा - संविधान सभेचे इतिवृत्त, भारत सरकार प्रकाशन, नवी दिल्ली, खंड, ७ वा, पृ. १२३३, दि. ४ जाने. १९४९, CAD7/1233 ]


हवेतल्या गप्पा मारू नका लेखी  पुरावे द्या-

११. लिखित दस्तावेज आणि तोंडी माहिती यात लिखितला प्रथम दर्जाचा पुरावा मानले जाते तर तोंडीला दुय्यम महत्व असते. संघाकडे त्याकाळातला एकही लेखी पुरावा नाही तर आम्ही आंबेडकरवादी ठोस, सबळ, लेखी आणि त्याकाळातल्या पुराव्यांच्या आधारे बोलत आहोत. शिवाय ठेंगडी आणि ऑर्गनायझर हे आर.एस.एस.चे असल्याने त्यांना फारशी विश्वासार्हता नाही. ते या घटनेचे लाभार्थी असल्याने त्यांचा नंतरच्या काळातला आणि तोही तोंडी पुरावा ग्राह्य धरता येत नाही.

ठेंगडींचे पुस्तक म्हणजे निव्वळ थापा-

१२. ठेंगडीचे पुस्तक डॉ. आंबेडकर हयात असताना  लिहिलेले नसून बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर कितीतरी वर्षांनी लिहिलेले आहे. समकालीन एकही लेखी दस्तावेज ठेंगडी, आनंद वा तुलींनी सादर केलेला नाही. त्यामुळे ही तोंडी माहिती कल्पित आणि नंतर रचलेली आहे. बनावट आणि सांगोवांगी असल्याने ती टिकू शकत नाही.

बाबासाहेबांची संघशिबिराला भेट? नाही, हीही थापच-

१३. डॉ. आंबेडकरांच्या संघ शिबिराच्या भेटीची १९३९ ची कहाणीही अशीच कपोलकल्पित आहे. बनावट आहे. तिचे त्याकाळातले लिखित पुरावे, फोटो, संघ व बाबासाहेब यांच्यातील भेटीबाबतचा पत्र्यव्यवहार किंवा तेव्हाच्या वर्तमानपत्रातील बातम्यांचे पुरावे संघ देऊ शकलेला नाही. ते दिल्याशिवाय त्यांच्या म्हणण्यावर चर्चासुद्ध शक्य नाही. विश्वास ठेवण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.

बाबासाहेब आणि संघ, तत्वज्ञानात १८० डिग्रीचा फरक-

१४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघाला परमप्रिय असलेली मनुस्मृती जाळतात, संघ ज्या डोलार्‍यावर उभा आहे तो हिंदू धर्म ते सोडतात, हिंदुत्व सपशेल नाकारतात, बौद्ध धर्म स्विकारताना आयुष्याच्या अगदी शेवटी म्हणजे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी ते लाखोंच्या जनसमुदायाला २२ प्रतिज्ञा देतात, त्यात हिंदूंच्या देवता राम, कृष्ण यांना मी मानणार नाही अशा प्रतिज्ञा आहेत.

आर.एस.एस.ने रामराज्याची कल्पना सोडून दिलेली आहे काय? "रिडल्स ऑफ हिंदुइझम,"  "रिडल्स ऑफ राम अ‍ॅण्ड कृष्ण" "रेव्होल्युशन अ‍ॅण्ड काऊंटर रेव्होल्युशन" हे डॉ. बाबासाहेब आंबेडकारांचे ग्रंथ आर.एस.एस.ला मान्य आणि प्रिय आहेत काय?

"अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट" हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुलभूत तत्वज्ञान आहे. तर आर.एस.एस.ला समरसता हवीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जाती नष्ट करा म्हणतात, तर जाती टिकवा आणि त्यांचातले भेद कमी करून समरसता निर्माण करा असे संघीय म्हणतात.

या संपुर्ण विरूद्ध दिशा आहेत.

फॅसिस्ट संघाचा बाबासाहेबांच्या अपहरणाचा डाव-

थोडक्यात आर.एस.एस. आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारसरणीत काडीचेही साम्य नाही. डॉ. आंबेडकराना हायजॅक करण्यासाठी संघ हे प्रयत्न करीत आहे. डॉ. आंबेडकरांना आज सारे जग महान विद्वान, घटनाकार, जगभरच्या उपेक्षित वंचितांचा मसिहा म्हणून वंदन करते तर संघ हा फॅसिस्ट म्हणून कुविख्यात आहे. म्हणून संघाला आपली प्रतिमा उजळवण्यासाठी तसेच आंबेडकरांना मानणार्‍या व्होटबॅंकेला भुलवण्यासाठी ही पळवापळवी करायची आहे. आम्ही जागृत आंबेडकरवादी संघाला त्यात कदापिही यशस्वी होऊ देणार नाही!

- प्रा. हरी नरके,
२३/४/२०२०
[लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या मालिकेतील खंड १७ ते २२ चे संपादक आहेत]

Wednesday, April 22, 2020

धर्मशास्त्रावर आधारलेले हिंदूराष्ट्र ब्राह्मणांना तरी परवडेल काय?-प्रा. हरी नरके, रा.स्व.संघ 5







स्मृतीच्या आधारे पतित ठरणार्‍या या तमाम ब्राह्मणांना शूद्र-अतिशूद्रांच्या पंक्तीला बसवणे भाग आहे.

परधर्मियांविषयी सतत द्वेशपुर्ण अफवा पसरवून हिंदुराष्ट्राची सोनेरी स्वप्नं बहुजनांच्या मनावर कोरली जातात. हे मनाचे श्लोक वाचून आणि ऎकून मूळ धर्मग्रंथ न वाचलेली बहुजन खिल्लारं चेकाळतात. बहुजानांना धर्मशास्त्रात काडीचाही अधिकार नाही. ते फक्त गुलाम आहेत. तरिही सर्व जातीतील हिंदू स्त्रिया, अनु. जाती, जमाती, भटके, विमुक्त आणि ओबीसी यांना हिंदूराष्ट्राचा अतोनात गर्व असतो. या हिंदूराष्ट्रात त्यांच्या वाट्याला फक्त आणि फक्त वेठबिगारीच येईल. बहुजनांचे अज्ञान हेच आंबाभुर्जीतील रेशीमकिड्यांचे भांडवल असते. माता भगिनी आणि बहुजनहो, तुम्ही मूळ ग्रंथ वाचू लागाल त्याक्षणी परधर्मद्वेशावर म्हणजे शेणाच्या पोहावर उभारलेला हा हिंदूराष्ट्राच्या पत्त्यांचा बंगला ढासळेल. पण तुर्तास ते राहू द्या.

सांप्रत काळी आपण हे तथाकथित हिंदुराष्ट्र देवप्रिय ब्राह्मणांना तरी परवडणार आहे काय याचा थोडा धांडोळा घेऊ.

धर्मशास्त्र सांगते, " वेदाध्ययन न करणारे किंवा अग्निहोत्र न ठेवणारे ब्राह्मण शूद्रासमान होत. वेद न जाणणारा, व्यापारावर उपजीविका करणारा, नटाचा धंदा करणारा, दुसर्‍याच्या वित्ताचे चोराप्रमाणे हरण करणारा अथवा वैद्यकीचा [ म्हणजे आजच्या भाषेत डॉक्टर चा ] धंदा करून उदरनिर्वाह करणारा ब्राह्मण हा " ब्राह्मण" ह्या संज्ञेस अपात्र आहे." असे वसिष्ठऋषींचे वचन आहे. वसिष्ठऋषी हे तर श्रीरामांचे गुरू. आधुनिक रामराज्यात त्यांची आज्ञा मानावीच लागणार नाही का? वसिष्ठऋषी पुढे म्हणतात, " व्याजबट्ट्याचा धंदा करणे हा ब्रह्महत्येपेक्षाही मोठा गुन्हा आहे. "


गौतमऋषींच्या मते अशा प्रकारच्या पतितांशी व्यवहार करणारे तेही पतितच होतात. अर्थात वरिल सर्व नियम पाळायचे झाले तर पतित नसलेले किती ब्राह्मण सापडतील?


अहो, सगळे डॉक्टर, अभिनेते, [ नटश्रेष्ठ शरद पोंक्षे, सौरभ गोखले, केतकी चितळे, इ. इ. ] गायक, व्यापार करणारे [ चितळे बंधूंसारखे सगळेच ] व्याज घेणारे म्हणजे बॅंकींग उद्योगातले सगळे, हे "पतित" ठरणार. ते "ब्राह्मण" राहणार नाहीत. पतिताचं वर्तन करणं म्हणजे ब्रह्महत्येचं पातक की हो डोक्यावर! आता मला सांगा हे सगळे पतित वगळले की केवळ वेदाध्ययन करणारे महाराष्ट्रासारख्या टिळक-आगरकर-राजवाडे-केतकरांच्या राज्यात दहावीस तरी उरतील काहो? म्हणजे उरलेल्यांमध्ये [ पतितांमध्ये ] खुद्द आपला जन्मदाता पिता जरी असला तरी खर्‍या धार्मिक माणसाने त्याचाही त्याग केला पाहिजे असे असे गौतम स्मृती सांगते. बौधायनाने आर्यावर्ताबाहेर जाणारांना कठोर प्रायश्चित सांगितले आहे. अगदी बंगाल, ओरिसा या राज्यांमध्ये जाणारांनाही हाच नियम लागू होतो. शूद्रांना शिकवणारे सारे ब्राह्मण दुषित होत. पतित होत असे धर्मशास्त्र सांगते.


ज्या धर्मशास्त्राच्या आधारे चांडाल जातीचे अस्तित्व सिद्ध होते त्याच स्मृतीच्या आधारे पतित ठरणार्‍या या तमाम ब्राह्मणांना शूद्र-अतिशूद्रांच्या पंक्तीला बसवणे भाग आहे.


असे सनातन धर्मशास्त्रावर आधारलेले हिंदूराष्ट्र देवप्रिय ब्राह्मणांना तरी परवडेल काय?

संदर्भ- विविध वृत, २२ जानेवारी, १९३३


प्रा.हरी नरके, २२/०४/२०२०

{लेखक भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. लेखातील मतं वैयक्तिक आहेत.}



तोंड ओळख करून घेण्यासाठी पाहा-

गौतम धर्मसूत्र अब तक उपलब्ध धर्मसूत्रों में प्राचीनतम है। https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%AE_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0
https://en.wikipedia.org/wiki/Gautama_Dharmasutra


https://en.wikipedia.org/wiki/Vasishtha
Vashishtha (Sanskrit: वशिष्ठ, IAST: vaśiṣṭha) is one of the oldest and most revered Vedic rishis
https://en.wikipedia.org/wiki/Baudhayana_sutras
The Baudhāyana sūtras are a group of Vedic Sanskrit texts which cover dharma, daily ritual, mathematics, etc. They belong to the Taittiriya branch


बौधायन के सूत्र वैदिक संस्कृत में हैं तथा धर्म, दैनिक कर्मकाण्ड, गणित आदि से सम्बन्धित हैं। वे कृष्ण यजुर्वेद के तैत्तिरीय शाखा से सम्बन्धित हैं। सूत्र ग्रन्थों में सम्भवतः ये प्राचीनतम ग्रन्थ हैं। इनकी रचना सम्भवतः ८वीं-७वीं शताब्दी ईसापूर्व हुई थी।

https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8


अधिक संदर्भांसाठी वाचा- भारतरत्न म.म. पां.वा काणे लिखित, धर्मशास्त्राचा इतिहास, एकुण ५ खंड, आठ भाग, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, पुणे, १९३०-६२

The History of Dharmaśāstra, with subtitle Ancient and Medieval Religious and Civil Law in India, is a monumental five-volume work consisting of around 6,500 pages. It was written by Bharat Ratna Pandurang Vaman Kane, an Indologist. The first volume of the work was published in 1930 and the last one in 1962.

Monday, April 20, 2020

आरएसएस सुप्रिमो गोळवलकर बाबासाहेबांना का भेटले होते?-प्रा.हरी नरके, रा.स्व.संघ 3




मराठ्यांना रोखण्यासाठी आम्हा ब्राह्मणांना मदत करा या त्यांच्या मागणीवर बाबासाहेब म्हणाले, रा.स्व. संघ हा तर विषवृक्ष आहे!

मराठा समाजाचा सामना करण्यासाठी, त्यांना रोखण्यासाठी आम्हा ब्राह्मणांना मदत करा, नाहीतर मराठे आपल्या सर्वांनाच संपवतील, आपण सारे मराठेतर एकत्र येऊन मराठ्यांचा बंदोबस्त करू असा प्रस्ताव घेऊन आर. एस. एस. सुप्रिमो गोळवलकरगुरूजी बाबासाहेबांना ७ सप्टेंबर १९४९ ला दिल्लीत जाऊन भेटले.

बाबासाहेबांनी त्यांना कठोरपणे खडे बोल सुनावले. " पेशवाईत तुम्ही लोकांनी आमच्यावर कितीतरी अत्याचार केले, हे मी कसे विसरू? तुम्ही पुन्हा पेशवाईची स्वप्नं बघता आहात. त्यासाठी तुम्ही रा.स्व.संघाच्या रूपात ब्राह्मण महासंघ सुरू केलेला आहे. तुमच्या संघात सारे ब्राह्मणच तर आहेत. तिथे ना मराठे आहेत ना महार. तुमचा संघ हा विषवृक्ष आहे. त्याचे परिणाम फार वाईट होणार आहेत. तुम्हाला संघटनाच बनवायची असेल तर ती जातीनिर्मुलनासाठी आणि चातुर्वण्यव्यवस्थेचा नाश करण्यासाठी सुरू करा. पेशवईतील पापांपासून तरच तुम्हाला मुक्ती मिळेल. जुन्या चुका सुधारा. ब्राह्मणराज्याची स्वप्नं विसरा. मी तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही." अशा कठोर शब्दात बाबासाहेबांनी गोळवलकरगुरूजींना फटकारले. बाबासाहेबांच्या एकाही प्रश्नाला ते उत्तर देऊ शकले नाहीत. चडफडत ते तिथून निघून गेले.

बाबासाहेब - गोळवलकर यांच्या भेटीचा हा तपशीलवार वृत्तांत लिहिणारे सोहनलाल शास्त्री हे दिल्लीतले मोठे विद्वान होते. ते या भेटीच्या वेळी तिथे प्रत्यक्ष हजर होते. ते बाबासाहेबांकडे नेहमी जातयेत असत.

गोळवलकरांबद्दल सोहनलाल शास्त्रींना माहिती देताना बाबासाहेब म्हणाले, " हे ब्राहमण गृहस्थ आहेत हिंदूंचे पोप. असे सनातनी विचारांचे धर्मगुरू जिथे आहेत तिथल्या लोकांचे कधीही भले होणार नाही!"

आणि संघवाले या भेटीबद्दल धादांत खोट्या अफवा पसरवतात. बाबासाहेब म्हणाले म्हणे, " संघाचे काम वाढवा, मी तुमच्या कामावर खूश आहे." चातुर्वर्ण्याची प्रस्थापना करणार्‍या संघटनेच्या कामावर बाबासाहेब कसे खूश होऊ शकतील?

दोघांची विचारधारा, कार्यप्रणाली, विषयपत्रिका सगळेच विरोधी असताना बाबासाहेब त्यांचे कौतुक कसे आणि का करतील?

- प्रा. हरी नरके, २० एप्रिल २०२०

{ पाहा: बाबासाहेब डा. अम्बेडकर के सम्पर्क में २५ वर्ष, सोहनलाल शास्त्री, भारतीय बौद्ध महासभा, दिल्ली प्रदेश, नई दिल्ली, १९७५, पृ. ५४/५५}

Friday, April 17, 2020

हिंदुराष्ट्र ही महाभयानक आपत्ती : डॉ. बाबासाहेबांचा इशारा-, भीमजयंती 20/6









भाग ४. हिंदुराष्ट्र ही महाभयानक आपत्ती : डॉ. बाबासाहेबांचा इशारा- @Prof Hari Narke- प्रा. हरी नरके

       केवळ एक व्यक्ती एक मत यापेक्षा एक व्यक्ती एक मुल्य यावर बाबासाहेबांचा भर होता. सामाजिक लोकशाहीची मुल्ये त्यांनी राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट केली.
प्राथमिक शिक्षण सक्तीचे, मोफत आणि सार्वत्रिक असावे ही ४५ व्या कलमातील तरतूद त्यांना मुलभूत अधिकारात आणायची होती. ती त्यांना आणता आली नाही. मात्र त्यासाठी त्यांनी १० वर्षांची त्याला मुदत घातली होती. पुढे १ एप्रिल २०१० ला शिक्षण हक्क कायदा आणून सर्व शिक्षण मोहिमेद्वारे आपण जे केले ते त्यांना तेव्हाच हवे होते, यावरून त्यांचा द्रष्टेपणा दिसून येतो. पर्याप्त प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांनी अनुसुचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गियांना आरक्षण देण्याची तरतूद केली. आरक्षणामागे " समान संधीसाठी विशेष संधी" असे समतेचे तत्वज्ञान असून राजकीय आरक्षण १० वर्षांऎवजी जास्त काळ द्यावे लागेल असे भाकीत त्यांनी केले होते.

Indian first, Indian last and nothing else but Indians-

४ एप्रिल १९३८ रोजी मुंबई प्रांताच्या विधीमंडळात तळमळीने आणि राष्ट्रभावनेने बोलताना डॉ. बाबासाहेब म्हणाले होते, "I do not like what some people say, that we are Indian first and Hindus afterwards or Muslims afterwards. I am not satisfied with that, I frankly say that I am not satisfied with that. I do not want that our loyalty as Indians should be in the slightest way affected by any competitive loyalty whether that loyalty arises out of our religion, out of our culture or out of our language. I want all people to be Indian first, Indian last and nothing else but Indians." सर्व देशवासियांनी आपली ओळख फक्त भारतीय म्हणून सांगण्याचा हा दिवस अजुनही उगवलेला नसल्याने डॉ. बाबासाहेबांचे हे स्वप्न अजूनही अधुरे आहे.

हिंदुराष्ट्र ही देशावरची महाभयानक आपत्ती-

" If Hindu Raj does become a fact,it will, no doubt, be the greatest calamity for this country.No matter what the Hindus say, Hinduism is a menace to Liberty, Equality, and Fraternity. On that account it is incompatible with democracy. Hindu Raj must be prevented at any cost." [ Pakistan or The Partition of India,1946, pp.358, Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.8, 1990, pp.358]

बाबासाहेब हिंदुत्वाचे समर्थक होते असा भ्रम आजकाल पसरवला जात आहे. " हिंदु राज्याची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरली तर या देशावर कोसळलेली ती महाभयानक आपत्ती असेल. समर्थक हिंदू त्याबद्दल काहीही म्हणोत, पण हिंदुत्व हे स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे शत्रू आहे. हिंदुत्व हे लोकशाहीविरोधी आहे. म्हणून कोणतीही किंमत द्यावी लागली तरी आपण हिंदुराज्य घडू देता कामा नये." [ पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पाकीस्तान किंवा भारताची फाळणी, १९४६, पृ. ३५८ ] या कडक शब्दात हिंदुराष्ट्रवादाला नकार देणारे बाबासाहेब आजच्या नासक्या आंब्यातील रेशीमकिड्यांना अजिबात परवडणारे नाहीत. पण तरिही हे विकृत लोक संदर्भापासून तोडलेल्या अर्धवट विधानांच्या आधारे बुद्धीभेद करण्याचे आणि अफवांच्या अभियानाद्वारे बाबासाहेबांची बदनामी करीत असतात. त्यांचा यशस्वीपणे प्रतिकार करायचा असेल तर एकटादुकटा समाज तो करू शकणार नाही. त्यासाठी तमाम बहुजन आणि पुरोगामी छावणीतले सर्वजण एकत्र यायला हवेत.
   
जातीय बहुमत नको तर विचारांचे बहुमत हवे-

     शोषित, वंचित समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी राजकीय सत्ता आवश्यक असते हे ओळखून दलित उपेक्षितांच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक मुक्तीसाठी ते राजकीय सत्ता हस्तगत करण्याच्या हेतूने निवडणुकांच्या राजकारणाकडे बघतात. निवडणुकीतील पराभव हे खेळातील पराभवासारखे असतात, त्याने नाउमेद न होता पुन्हा नव्या जोमाने खेळायचे असते असे ते म्हणतात. दलितांनी व मागासवर्गियांनी आपली करारपात्रता { Bargaining Power } वाढविल्याशिवाय त्यांना समान वाटा मिळणार नाही असे ते स्पष्ट सांगतात. आंबेडकरांची सत्तासंकल्पना संघर्षातून नव्हे तर समन्वयातून साकार होणारी आहे. त्यांच्या राजकारणाचा संपूर्ण रोख समाजबदलावर होता. बळकट विरोधी पक्ष, वृत्तपत्र स्वातंत्र्याचे जतन आणि निवडणुकांद्वारेशांततामय मार्गाने सत्तांतर यावर त्यांचा सारा भर होता.

विरोधी पक्षाचा वचक नसेल तर तो सत्तेचा गैरवापर करील या भुमिकेतून ते द्विपक्षीय पद्धतीचा पुरस्कार करतात. तुल्यबळ दोन पक्ष असतील तेव्हा मागास वर्गियांनी तराजूतील " पासंगा"चे राजकारण करावे असे ते सांगतात. संघटित शक्तीच्या बळावरच सत्ता आणि भौतिक लाभ त्यांना मिळवता येईल असा आशावाद ते व्यक्त करतात. आपल्याला जातीय बहुमत नको तर विचारांचे बहुमत हवे असे ते म्हणतात. वरिष्ठवर्णियांच्या दयाबुद्धीवर विसंबण्यापेक्षा राजकीय बहुमताच्या आधारे वाटचाल करा असा सल्ला ते देतात. धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना त्यांनी स्विकारली होती. धर्मांतरामागे त्यांची प्रेरणा अध्यात्मिक असण्याऎवजी महान लोकशाहीवादी बुद्धाचा स्विकार ही होती.

माणसाकडे पुनर्विचाराचे व विचार बदलण्याचे धाडस हवे-

        आपण जर एकाच विषयावर दोनदा किंवा अधिकवेळा बोललो अथवा लिहिले असेल आणि त्यात विसंगती असेल तर त्यातील कालानुक्रमे शेवटी आलेले मत प्रमाण मानावे असे सांगून ते म्हणतात, "जबाबदार माणसाकडे पुनर्विचार करण्याचे आणि आपले विचार बदलण्याचे धाडस असलेच पाहिजे."  डॉ. बाबासाहेब ‘भाषावार प्रांतरचनेवरील विचार’ या विषयावरील लेखनात इमर्सनला उद्धृत करुन म्हणाले होते, “ द्वेषबुद्धीने माझ्यावर टिका करणार्‍या आणि माझ्या विसंगतीचेच भांडवल करू पाहणार्‍या माझ्या टिकाकाराला मी सरळ उत्तर देत आहे.

विचारातील सातत्य, सुसंगती, तोचतोचपणा  हा गाढवाचा सद्गुण आहे असे इमर्सनने म्हटले आहे. सुसंगती राखून मला गाढव व्हायचे नाही. सुसंगतीच्या नावाखाली एकेकाळी व्यक्त केलेल्या मताला कोणताही विचार करणारा माणूस स्वत:ला जखडून घेणार नाही. सुसंगतीपेक्षाही जबाबदारी जास्त महत्वाची असते. जबाबदार माणसाकडे एकदा शिकलेले विसरून जाण्याचे, पुनर्विचार करण्याचे आणि आपले विचार बदलण्याचे धैर्य असले पाहिजे. अर्थात तसे करण्यासाठी त्याच्याजवळ पुरेशी आणि सबळ कारणे असली पाहिजेत. कारण विचारविश्वात अंतिम असे, शेवटचा शब्द म्हणून काही नसते.” यावरून आंबेडकरवाद हा परिवर्तनशील राजकीय विचार होता हे स्पष्ट होते.

आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार -

डॉ. बाबासाहेबांचा द्रष्टेपणा लक्षात घेऊनच दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला यांनी आणि नेपाळने आपली राज्यघटना बनवताना डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा सखोल अभ्यास केला होता.
आज डॉ. बाबासाहेब हे सामाजिक न्याय, ज्ञाननिर्मिती आणि लोकशाही विचारधारेचे प्रतिक बनले असून डॉ. रामचंद्र गुहा यांच्यासारख्या थोर इतिहासकाराने तसेच नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेबांचा गौरव केला आहे.

परिवर्तनासाठी बौद्धांनी जाणीवपुर्वक बॅकसीट घ्यावी-

अशा सर्वव्यापक राष्ट्रनेत्याचा दलितांचा उद्धारकर्ता असा मर्यादित उल्लेख करणे अन्यायकारक आहे. हे चित्र बदलणे शक्य आहे. भारतीय जनसंघ-भाजपाची प्रतिमा " भटाब्राह्मणांचा" पक्ष अशी होती. तेव्हा ती बदलायचे ठरवून वसंतराव भागवत यांनी "माधव" सुत्रानुसार गोपीनाथ मुंढे, ना.स.फरांदे व अण्णा डांगे यांचे नेतृत्व तयार केले. त्यातून त्यांनी काही वर्षातच पक्षाची प्रतिमा बदलली.

यापुढे बौद्ध, आंबेडकरवादी नेत्यांनी जाणीवपुर्वक बॅकसीट घेऊन बाबासाहेब हे ओबीसी, बलुतेदार- अलुतेदारांचे, महिलांचे, शेतकर्‍यांचे नेते होते ही प्रतिमा रूजवण्यासाठी त्या त्या समुहातील अभ्यासक, नेते, प्रचारक, प्रसारक यांना बळ द्यायला हवे, त्यांना समाजात पुढे करायला हवे.

काही वर्षात " भारतभाग्यविधाता बाबासाहेब" ही प्रतिमा निर्माण करणं शक्य आहे. तर आणि तरच हा जातीयवाद्यांचा बुलढोझर रोखता येईल. नाहीतर अवघड आहे. आज त्यांनी मुस्लीमांना एकटे पाडले आहे. दुसरा नंबर बौद्धांचा, आंबेडकरवाद्यांचा असेल, हे लक्षात घेता जलदी करायला हवी. नाहीतर एका महासुर्याला एका समाजगटापुरते कायमचे सिमित केले जाईल व प्रतिक्रांतीचे राजकारण देशावर लादले जाईल. बहुजनांना भवितव्य लोकशाहीतच आहे, हिंदुराष्ट्रात म्हणजे उत्तर पेशवाईत नाही ह्याचा विसर पडू देता कामा नये.

{ भाग ४ था }
- भीमजयंती २०२० लेखमाला समाप्त -

- @Prof Hari Narke- प्रा. हरी नरके - १७/४/२०२०

[लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या मालिकेतील खंड १७ ते २२ चे संपादक आहेत.]
उरलेला लेख वाचण्यासाठी https://harinarke.blogspot.com/ या लिंकवर क्लीक करा.

Saturday, March 7, 2020

८ मार्च : यासाठीच तर हवेय हिंदुराष्ट्र - प्रा.हरी नरके






उद्या आंतरराष्ट्रीय स्त्रीमुक्ती दिन.

सातआठ वर्षांपुर्वी दिल्लीमध्ये निर्भया अत्याचार प्रकरण घडले. तो अत्याचार इतका भयानक होता की पिडीतेवर बलात्कार करून त्यानंतर तिच्या मायअंगावर लोखंडी सळीने शेकडो वार करून तिच्या ओटीपोटातील सगळी आतडी तोडून बाहेर काढून फेकून देण्यात आली होती. इतका नीचपणा करणारे आरोपी दोषी असल्याचे सिद्ध होऊनही एव्हढे वर्षे जिवंत कसे?

न्यायव्यवस्थेतील त्रुटींचा चतुरपणे वापर करणे आणि पोलीस, तुरूंग व्यवस्थापन, सरकार यांच्या वरिष्ठांचे आशिर्वाद असणे यामुळे गुन्हेगारांची फाशी वारंवार पुढे ढकलली जाते आहे.

या गुन्हेगारातील एक विनय शर्मा हा उच्चजातीय/उच्चवर्णिय असल्याने त्याला फाशी दिल्यास ब्रह्महत्त्येचे पातक लागेल म्हणून त्याला फाशी देऊ नका अशी मागणी जाहीरपणे केली जातेय.
यासाठीच हवेय धर्मावर आधारित राष्ट्र.

मनुस्मृती स्पष्टपणे सांगते ब्रह्महत्त्या वर्ज्य आहे. कितीही भयंकर गुन्हे ब्राह्मणांनी केले तरी त्यांची हत्त्या करायची नाही. असा मनु ज्ञानोबातुकोबापेक्षा दोन पावले पुढे होता असे भिडेगुरूजी सांगतात. रामतिर्थकरबाई, इंदुरीकरबुवा आणि भाटेबाई मनुचे गोडवे गातात.

धर्मावर आधारित राष्ट्र म्हणजे मनुस्मृतीवर आधारित राष्ट्र.

भारतात इतर धर्माचे अल्पसंख्यक लोक राहतात म्हणून भारत सेक्युलर नसून सर्व भारतीय हिंदु स्त्रिया आणि अनुसुचित जाती, जमाती, विजाभज, इमाव, विमाप्र, एसिबीसी यांच्या हितासाठी धार्मिक राष्ट्र नको म्हणून भारत सेक्युलर हवाय. अल्पसंख्यकांचे काय होईल हा नंतरचा मुद्दा आहे. पहिले सर्व स्त्रिया आणि सर्व मागासवर्गीय यांची मनुच्या कायद्यानुसार कत्तल होईल जशी पेशवाईत होत होती. तेव्हा निर्भयाला न्याय मिळावा हीच स्त्रीमुक्तीदिनाची मागणी.

पाहा: मनुस्मृती, अध्याय ८ वा श्लोक क्र.३८०/३८१

प्रा.हरी नरके, ७ मार्च २०२०