Showing posts with label सावित्रीबाई फुले. Show all posts
Showing posts with label सावित्रीबाई फुले. Show all posts

Tuesday, March 10, 2020

पुण्यात प्लेगच्या साथीत सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा जीवाचं रान केलं






पुण्यात प्लेगच्या साथीत सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा जीवाचं रान केलं...हरी नरके, बीबीसी मराठीसाठी

ज्येष्ठ समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 10 मार्च हा स्मृतिदिन. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या कार्यरत होत्या. पुण्यात प्लेगच्या साथीचं तांडव सुरु असताना तळागाळातल्या लोकांना साथीतून वाचवणाऱ्या सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा अंत झाला.

मुंबई, पुण्यात 1896 आणि 1897 साली प्लेगच्या साथीने थैमान घातलं होतं. त्याच साथीत 9 फेब्रुवारी 1897ला कामगारांना मदत करताना नारायण मेघाजी लोखंडे यांचं निधन झालं. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे ते खंदे नेते होते.

जोतिबांच्या विचाराने प्रेरित होऊन 'दीनबंधू' नावाचं समाज प्रबोधन नियतकालिक चालवित. लोखंडे यांनां भारतातल्या कामगार चळवळीचे जनक म्हटलं जातं.

जोतिबांचे विचार आणि कार्य ही त्यांच्या कामाची प्रेरणा होती. मुंबईत फुल्यांना महात्मा उपाधी देणाऱ्या सोहळ्याच्या आयोजनात लोखंड्यांचा पुढाकार होता. महात्मा फुलेंचं निधन झाल्यानंतर सत्यशोधक चळवळीचा ते मोठा आधारस्तंभ राहिले होते. चळवळीतला जवळचा सहकारी गेल्याने सावित्रीबाईंना मोठा धक्का बसला.

मुंबई पाठोपाठ पुण्यात साथ पसरू लागली, तशा जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. एकतर लोकांना प्लेगविषयी फारशी माहिती नव्हती, त्यामुळे प्रचंड घबराटीचं वातावरण पसरलं. प्लेगवर औषधंही परिणामकारक नव्हती. त्यामुळे उपाययोजना काय करायच्या याविषयीही माहिती नव्हती. त्यात समाजामध्ये देवीचा कोप यासारख्या अंधश्रद्धा होत्या. साहजिकच प्लेगच्या आजाराने माणसं मरत होती तेव्हा ते देवीच्या कोपाने मरतायत अशी अनेकांची भावना झाली.

पुण्यात जसजसं मृत्यूचं थैमान सुरु झालं तसं लोकच नाही तर बडे राजकीय नेतेही पुणे सोडून दुसरीकडे राहायला निघून जात होते. उंदरांमार्फत प्लेगचा प्रसार होत होता, उंदीर मरून पडलेले लोकांना दिसायचे. लोक बिथरून जायचे. ताप येऊन काखेत गाठ यायची आणि माणसं कोलमडून पडायची, हे सावित्रीबाई आजूबाजूला पाहात होत्या.

यशवंतच्या मदतीनं रुग्णांवर उपचार

सावित्रीबाईंनी स्वतः आपल्या मुलाला दक्षिण आफ्रिकेतून तार करून बोलावून घेतलं. डॉक्टर यशवंत फुले ब्रिटीश मिलिटरीमध्ये नोकरी करत होते. रजा घेऊन आलेल्या यशवंतकडून परिस्थिती समजून घेऊन सावित्रीबाईंनी कामाला सुरूवात केली.

हा संसर्गजन्य रोग जीवघेणा असल्याने आईने धोका पत्करू नये, असं डॉ. यशवंत यांचं म्हणणं होतं. पण त्यावर सावित्रीबाईंना वाटायचं आज महात्मा फुले असते तर ते परिस्थिती पाहून शांत बसले नसते. खेरीज नारायण मेघाजी लोखंडेंचा प्लेगने मृत्यू झालेला असताना आजाराच्या भीतीने त्या दूर राहू शकल्या असत्या. पण लोकांच्या दुःखापुढे त्यांना आपल्या जीवाची पर्वा नव्हती.


महात्मा फुलेंचं नाव घेतो तर लोकांसाठी काम केलं पाहिजे या विचारावर त्या ठाम होत्या. असं म्हणून त्या कामाला लागल्या. पुण्यात हडपसरजवळ आताच्या मोहम्मदवाडी, ससाणेनगर परिसरात यशवंत यांच्या सासऱ्यांची शेती होती.

हा भाग तेव्हा पुणे शहराच्या वेशीवर होता. इथल्या माळावर काही झोपड्या बांधल्या आणि त्यांनी दवाखाना सुरू केला. विशेषतः मुली आणि महिला घरोघरी जाऊन कोणाला ताप आला असेल किंवा प्लेगची लक्षण दिसत असतील तर त्या पेशंट्सना दवाखान्यात घेऊन येत. आणि यशवंतच्या मदतीने उपचार करत.
तेव्हा पुण्यात प्लेगची इतकी दहशत पसरली की सरकारी दफ्तरं ओस पडली होती आणि लोक उपचारासाठी आपणहून घराबाहेर कमी संख्येने बाहेर पडत होते. देवीचा कोप असेल या भीतीने घरात आजारी माणसांना दडवून ठेवलं जात होतं.

ब्रिटीश सरकारसमोर साथ आटोक्यात आणण्यासाठी स्वच्छता ठेवण्याचं मोठं आव्हान होतं. सरकारी अधिकाऱ्यांनी लोकांच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा बडगा उगारला. त्यात रँड या ब्रिटीश पोलीस अधिकाऱ्याच्या बडग्याने लोकांमध्ये असंतोष पसरू लागला होता.

पुणे शहरात घराघरात आरोग्यसेवा पोहचवणं जिकिरीचं होतं. भीतीमुळे लोक मदत करायलाही पुढे सरसावत नसत. गाडी-घोडे, रुग्णवाहिका, स्ट्रेचर समाजातल्या विशिष्ठ वर्णाच्या आणि प्रस्थापित वर्गासाठी प्राधान्याने मिळत. गावात आणि गावकुसाबाहेर असणाऱ्या दलित वस्तीत कशी पोहचणार हा प्रश्न होता.
तत्कालीन परिस्थितीत जातींमध्ये भेदाभेद, अस्पृश्यता असताना वाडी वस्तीत उपचार पोहचणं दुरापस्त होतं. अशा परिस्थितीत सावित्रीबाईंनी प्लेगच्या साथीमध्ये स्वतंत्रपणे तळागाळातल्या लोकांसाठी काम करायला सुरूवात केली.

रुग्णसेवा करतानाच प्लेगची लागण

सावित्रीबाईंनी पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाच्या महार समाजातल्या प्लेगच्या पेशंटला वाचवल्याची नोंद कागदोपत्री आहे. मुंढव्याच्या दलित वस्तीत पांडुरंग प्लेगने आजारी असल्याची माहिती सावित्रीबाईंना मिळाली. अकरा वर्षांच्या पांडुरंगाला त्यांनी चादरीत गुंडाळून पाठीवर घेतलं.

मुंढव्यापासून आठ किलोमीटर चालत त्यांनी ससाणेनगर गाठलं. माळावरच्या दवाखान्यात येऊन त्याच्यावर उपचार केले. पांडुरंग वाचला खरा पण दरम्यानच्या काळात सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली होती. काम करताना तापाने सावित्रीबाई फणफणल्या. अखेर 10 मार्चला त्या अविरतपणे काम करत असताना गेल्या.
सावित्रीबाईंना 1 जानेवारी 1848 साली शाळेचं पहिलं काम सुरू केलं होतं, आणि त्या गेल्या 1897 साली. जवळपास पन्नास वर्षं त्यांनी शिक्षणक्षेत्रात, सामाजिक सुधारणेसाठी आणि सेवेसाठी धडाडीने काम केलं.
शिक्षणाखेरीज समाजसेवेचं आणि लोकांना मदत करण्याचं सावित्रीबाईंचं काम पाहाताना नेहमी वाटतं, की आपल्याकडे झाशीच्या राणीने केलेल्या पराक्रमाची गोष्ट सांगितली जाते. जितकी ती शौर्यगाथा राजकीयदृष्ट्या रोमांचक आहे तितकंच तोलामोलाचं सावित्रीबाईंचं हे शौर्य आहे.

सावित्रीबाईंच्या कार्याकडे दुर्लक्ष

आपल्याला इतिहास नेहमी लढाया, पराक्रम यामुळे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा वाटतो. आपण सामाजिक सेवेत हौतात्म्य पत्करणाऱ्यांच्या इतिहासाकडे कमी आकर्षित होतो. जेव्हा सावित्रीबाई पांडुरंगाला पाठीवर घेऊन चालत होत्या तेव्हा एकप्रकारे त्या प्लेगशी झगडत होत्या. मृत्यूशी झुंज देणाऱ्या पाठीवरच्या पांडुरंगाला त्यांनी अखेर वाचवलं.

पुणे नगरपालिकेचा त्यावेळचा रेकॉर्ड पाहिला तर भयावह चित्र डोळ्यासमोर येतं. मृत्यूचा दाखला मिळण्यासाठीही कर्मचारी नसायचे. त्यामुळे पालिकेत फक्त आकड्यांच्या नोंदी आहेत. 10 मार्च 1897 या दिवशी किती माणसं मरण पावली याचाच आकडा मिळतो.

एकेका दिवसाला 775, 685 असे भयंकर आकडे आहेत. त्यावेळच्या पुण्यात एका दिवसात नऊशे माणसं मरण पावली असतील तर किती हाहाकार माजला असेल, याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. नगरपालिकेच्या रेकॉर्ड्समध्ये दिड-दोन महिन्यांच्या काळात अशाच आकड्यांच्या नोंदी सापडतात.
त्या काळात माध्यमांची अस्पृश्यताही ठळकपणे दिसते. लोकमान्य टिळकांच्या केसरीने तर सावित्रीबाई फुले यांच्या निधनाची साधी बातमीही छापली नाही. खरंतर टिळक आणि आगरकरांना पहिल्यांदा तुरुंगवास झाला होता तेव्हा महात्मा फुल्यांनी दहा हजार रुपयांचा जामीन दिला होता, याची नोंद आहे. पण स्वातंत्र्यलढ्याच्या पुढील काळात टिळकांनी महात्मा फुले यांना अनुल्लेखाने इतकं टाळलं, की केसरीमध्ये महात्मा फुल्यांच्या निधनाची बातमीही सापडत नाही.

साहजिकच सावित्रीबाईंचा अनुल्लेख ओघानेच आला. पण केसरीने बातमी दिली नसली तरी दीनबंधू वर्तमानपत्राने दिली होती. बहुजन समाजात जनजागृतीच्या उद्देशाने दीनबंधू हे मराठी वर्तमानपत्र निघत असे. मराठी वर्तमानपत्रांमध्ये काय छापून येतंय याचा सारांश ब्रिटीश गव्हर्नरला पाठवला जाई. त्यात दीनबंधूच्या बातमीचा उल्लेख सापडतो.

माध्यमांनीच नव्हे तर त्यावेळच्या प्रस्थापित समाजाने आणि नेत्यांनीही सावित्रीबाईंच्या योगदानाची उपेक्षा केलेली दिसते.

पुढे 1905 मध्ये पुन्हा प्लेगच्या साथीने पसरायला सुरुवात केली. त्यावेळीही फुल्यांचा मुलगा डॉक्टर यशवंत आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा करायला उतरले. या जीवघेण्या आजारात त्यांना प्लेगची बाधा झाली आणि त्यातच 13 ऑक्टोबर 1905 या दिवशी त्यांच्यावर मृत्यू ओढवला.

१८९६—१९१७ या काळात एकट्या भारतात ९८,४१,३९६ लोक या साथीच्या रोगाला बळी पडले. १९०७ मध्ये एकूण मृत्युसंख्या १३,१५,८९२ होती, ती १९५२ मध्ये १,००७ वर आली. (मराठी विश्वकोश)

(डॉ. हरी नरके हे लेखक आणि फुले यांचे विचार, साहित्य तसंच चळवळीचे अभ्यासक आहेत. वरील लेखाचे शब्दांकन आणि संपादन बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता धुळप यांनी केले आहे)

https://www.bbc.com/marathi/india-51815816?fbclid=IwAR0el49CLu8FmZNO38WoRq1sX9g2PxoMWuuWl1-VjB8t5aV6iW0xji1EkqY

Wednesday, January 1, 2020

शहीद सावित्रीबाई : नेतृत्व, सेवाभाव आणि शौर्यगाथा













शहीद सावित्रीबाई : नेतृत्व, सेवाभाव आणि शौर्यगाथा  - प्रा. हरी नरके

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा उद्या १९० वा जन्मदिवस. अस्पृश्य मुलाला पाठीवर घेऊन पायी ८ किलोमीटर धावतपळत सावित्रीबाई दवाखान्यात पोचल्या. त्यातच त्यांना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. आपल्या दत्तक पुत्राला पाठीवर घेऊन स्वत:च्या गादीसाठी-संस्थानासाठी लढणार्‍या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ गौरवाने सांगितल्या जातात. तथापि आजारी अपृश्य मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या आणि स्वत: शहीद होणार्‍या या शौर्यांगणेची कहाणी मात्र पाठ्यपुस्तकांत येत नाही. समाजधुरीणांकडून त्यावर मौनाचा कट केला जातो.

ज्ञानज्योती सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला. बालहत्त्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह, दुष्काळात १००० गरिब मुलांचे संगोपन करणे आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपनाविरुद्ध नाव्ह्यांचा संप घडवणे या ४ कामांत सावित्रीने आपले नेतृत्व केले अशी कबुली दस्तुरखुद्द जोतीराव देतात, यातनं सावित्रीबाईंचं ऎतिहासिक योगदान अधोरेखित होतं.

राजकीय ऋषी नारायण महादेव उर्फ मामा परमानंद यांनी सयाजीराव गायकवाडांना लिहिलेल्या पत्रात सावित्रीबाईंबद्दल म्हटले आहे की, ‘जोतिरावांपेक्षा त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच होईल. तिची योग्यता काय सांगावी? आपल्या पतीबरोबर तिने संपूर्ण सहकार्य केले आणि त्यांच्याबरोबर राहून वाट्यास येतील त्या हालअपेष्टा भोगल्या. उच्चवर्णीयांतील उच्चशिक्षण घेतलेल्या स्त्रियांतही अशा प्रकारची त्यागी स्त्री आढळून येणे कठीण आहे. त्या उभयतांनी लोककार्यार्थ आपले सारे जीवन खर्च केले.’ (३१ जुलै १८९०)

जोतीराव सावित्रीबाईंची ‘विषयपत्रिका’
शिक्षण, स्त्रीपुरूष समता, सामाजिक न्याय या विषयांची "सावित्री- जोती" यांनी लिहिलेली ‘विषयपत्रिका’ आजही मार्गदर्शक आहे. त्यांचं समग्र क्रांतिकारी चिंतन आजही प्रस्तुत असल्याचं दिसून येतं. त्यामुळेच त्यांच्या जीवनकार्य आणि विचारांबद्दल समाजाच्या सर्व स्थरात विशेष रस वाटू लागला. आज जो त्यांचा अभ्यास चालू आहे, त्यामागे हे समाजशास्त्रीय वास्तव दडलेलंय.

राज्य शासनाने प्रकाशित केलेले सावित्रीबाई फुले :समग्र वाड्मय आणि सावित्रीबाई फुले : गौरवग्रंथ यांना प्रचंड मागणी आहे. प्रस्तुत लेखकाने लिहिलेले सावित्रीबाईंचे इंग्रजी चरित्र दिल्लीच्या एन.सी.ई.आर.टी. ने प्रकाशित केलेले असून त्याचा मराठी अनुवाद इस्लामपूरच्या नाग नालंदा प्रकाशनाने छापलेला आहे. या पुस्तकाचे अनुवाद अनेक भारतीय भाषांमध्ये झालेले आहेत.

मुंबईच्या कु. शांताबाई रघुनाथ बनकर यांची १९३९ मधे प्रकाशित झालेली ‘सावित्रीबाई जोतीराव फुले यांचे अल्पचरित्र’ ही पुस्तिका आणि त्यानंतर १९६६ साली सौ. फुलवंताबाई झोडगे यांनी लिहिलेलं ‘क्रांतिदेवता साध्वी सावित्रीबाई फुले’ हे चरित्र महत्त्वाचं आहे. त्यांनाच वाट पुसत डॉ. मा. गो. माळी यांनी ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ हा चरित्रग्रंथ १९८० साली लिहिला. डॉ. कृ. पं. देशपांडे यांनी सावित्रीबाईंच्या जीवन आणि साहित्यावर ‘अग्निाफुले’ हा ग्रंथ १९८२ साली प्रकाशित केला. नंतरचे सगळे ग्रंथ याच माहितीवर आधारित आहे.

सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला झाला. पुण्यापासून जवळपास ५० किलोमीटरवर नायगाव हे त्यांचं जन्मगाव आहे. पुणे-सातारा रस्त्यावर शिरवळपासून ५ किलोमीटरवर हे गाव वसलेलं आहे. सावित्रीबाई या खंडोजी नेवशे यांच्या ज्येष्ठ कन्या होत. १८४० साली वयाच्या १० व्या वर्षी त्यांचं जोतीरावांशी लग्न झालं. ११ एप्रिल १८२७ ला पुण्यात जन्मलेले जोतीराव त्यावेळी १३ वर्षांचे होते.

सावित्रीबाईंच्या जन्मस्थळाची अतिशय दुरावस्था होती. त्याची मुळाबरहुकुम पुनरउभारणी करणे, या गावाचा संपुर्ण कायापालट घडवणे, गावात शिल्पसृष्टी उभारणे, महाराष्ट्रातल्या कोणत्याही खेड्यात नसलेल्या असंख्य सुविधा या गावात उपलब्ध करून देणे यासाठी माझी २० वर्षे सत्कर्मी लागली याचा मला अभिमान आहे.

पुण्यातल्या महात्मा फुलेवाड्याचा समग्र विकास, दिल्लीच्या संसद भवनात महात्मा फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणे आणि पुणे विद्यापीठाचा नामविस्तार अशा असंख्य कामांमध्ये पुढाकार आणि यशप्राप्ती यांचा आनंद मला आयुष्यभरासाठी पुरणारा आहे. फुलेवाडा व नायगावला श्री. छगन भुजबळ यांना २८ वर्षांपुर्वी सर्वप्रथम घेऊन जाणे, त्यांच्याकडे व शासनाकडे या व इतर असंख्य कामांसाठी आग्रही राहणे, पाठपुरावा करून स्वत: राबून ही कामे करवून घेणे यातच माझ्या आयुष्याचे सार्थक आहे असे मी मानतो.


लग्नानंतर जोतीरावांनी सावित्रीबाईंना घरीच शिक्षण दिल्याचं शासकीय कागदपत्रांवरून दिसून येतं. १ मे १८५१ ते ३० एप्रिल १८५२ च्या शैक्षणिक अहवालात म्हटल्याप्रमाणे, ‘जोतीरावांनी स्वत:च्या पत्नीला घरी शिक्षण देऊन शिक्षिका बनवले.’ २२ नोव्हेंबर, १९५१ च्या ‘बॉम्बे गार्डियन’ वृत्तपत्रातल्या बातमीवरून सावित्रीबाईंच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी जोतीरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर (जोशी) यांनी घेतल्याचं दिसतं. सावित्रीबाईंनी अहमदनगर इथे फॅरारबाईंच्या आणि पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमधे अध्यापनाचं प्रशिक्षणही घेतलं. त्यामुळे सावित्रीबाई याच आद्य भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत, हे तत्कालीन दस्तऐवजांवरून स्पष्ट होतं. हीच देशाची खरी ज्ञानज्योती होय.

शेण नाही, ही तर फुलं आहेत
सावित्रीबाईंनी शिकवण्यासाठी घराच्या उंबरठ्याबाहेर टाकलेलं पहिलं पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरवात होय. समाजाकडून होणारा कडवा विरोध सहन करीत आणि शिव्याशाप शांतपणे ऐकत सावित्रीबाई काम करत होत्या. त्या शाळेत जाता  येताना सनातनी गुंड, टोळभैरव मुद्दाम रस्त्यावर थांबत. अचकट-विचकट बोलत. कधीकधी दगड मारीत. अंगावर चिखल किंवा शेण टाकीत असत.

शाळेत जाताना सावित्रीबाईंना सोबत २ साड्या न्याव्या लागत. रस्त्याने जाताना खराब झालेली साडी शाळेत गेल्याबरोबर बदलावी लागे. दुसरी परतताना खराब होई आणि तरीही सावित्रीबाई आपल्या कामात खंड पडू देत नव्हत्या. हा छळ असाच चालू राहिल्याने त्यांच्या आणि लहान मुलींच्या संरक्षणासाठी संस्थेने एका शिपायाची नियुक्ती केली.

त्याने लिहून ठेवलेल्या आठवणीनुसार सावित्रीबाई आपल्या अंगावर दगड किंवा चिखल फेकणार्‍यांना म्हणत, ‘मी माझ्या भगिनींना शिकविण्याचे पवित्र कार्य करीत असताना तुम्ही माझ्यावर शेण अगर खडे फेकीत आहात, ही मला फुलेच वाटतात. ईश्वपर तुम्हाला सुखी ठेवो!’ बळवंत सखाराम कोल्हे यांच्या या आठवणी सावित्रीबाईंच्या धैर्यावर प्रकाश टाकणार्‍या आहेत.

ब्राम्हण विधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह
१८६३ मधे जोतीराव सावित्रीबाईंनी विधवांसाठी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू केलं. याबाबतची अस्सल माहिती अलीकडेच उपलब्ध झालीय. एक तर हे गृह फक्तर ‘ब्राह्मण विधवांसाठीच’ सुरू करण्यात आलेलं होतं आणि त्यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता. ४ डिसेंबर १८८४ ला जोतीरावांनी मुंबई सरकारच्या अवर सचिवाला लिहिलेल्या पत्रात याबाबतची सगळी माहिती नोंदवलेली आहे.

जोतीराव सावित्रीबाईंनी स्वत:च्या घरात एक वसतिगृह चालवलं. दूरदूरहून मुलं शिक्षणासाठी तिथे येत असत. लक्ष्मण कराडी जाया या मुंबईच्या विद्यार्थ्याने या वसतिगृहात राहून सावित्रीबाईंच्या मायेची पाखरण अनुभवली होती. त्याने आठवणीत म्हटलंय, ‘सावित्रीबाईंसारखी दयाळू व प्रेमळ अंत:करणाची स्त्री मी अजूनसुद्धा कोठे पाहिली नाही. त्या आम्हा मुलांवर आईपेक्षासुद्धा जास्त प्रेम करीत असत.’

दुसर्‍या एका मुलाने आपल्या आठवणींमधे सावित्रीबाईंचा स्वभाव, त्यांची साधी राहणी आणि जोतीराव सावित्रीबाईंचे परस्परांवरील अपार प्रेम यांची विलक्षण हृदय नोंद केलीय.

बरोबर काय न्यायचं आहे?
हा महादू सहादू वाघोले लिहितो, ‘सावित्रीबाई फारच उदार होती. तिचे अंत:करण दयेने भरलेले होते. गोरगरिबांवर ती फार दया करी. ती अन्नदान पण फार करी. ती कोणासही जेऊ घाली. गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील लुगडी देई. त्यामुळे तात्यांचा खर्च फार होत असे. एखादेवेळी तात्या तिला म्हणत, ‘इतका खर्च करू नये.’ त्यावर ती शांतपणे बारीक हसत असे आणि ‘बरोबर काय न्यायचे आहे?’ असे तात्यांना विचारीत असे. त्यावर तात्या शांतमुद्रेने थोडावेळ गप्प बसत असत. ते दोघे एकमेकांवर अतिशय प्रेम करीत असत.’ जोतीराव तापट तर सावित्रीबाई स्मितभाषी. जोतीराव आयुष्यात एकदाही सावित्रीबाईवर रागावल्याचे उदाहरण नाही.

सावित्रीबाईंना स्त्रीजातीच्या उन्नतीची फार कळकळ असे. त्या सुस्वरूप आणि मध्यम बांध्याच्या होत्या. त्यांची मुद्रा नेहमी शांत असे. राग म्हणून काय चीज आहे, ती या बाईच्या गावीच नव्हती. ती नेहमीच हसतमुख असे. मात्र तिचं हसू गालांवर तेवढे दिसून येईल इतकेच ते मर्यादित असे. सावित्रीबाईंना सर्व लोक काकू म्हणत असत. पाहुणे मंडळी घरी आली म्हणजे तिला कोण आनंद होत असे. त्यांच्याकरिता मोठ्या आवडीने ती गोडधोड जेवण करीत असे.

जोतीराव सावित्रीबाईंना मोठा मान देत असत. तिला ते बोलताना ‘अहो जाहो’ या बहुमानदर्श शब्दांनी हाका मारीत असत. सावित्रीबाई उत्तर आयुष्यात तात्यांना ‘शेटजी’ म्हणत. या दोघांत पतीपत्नीत्वाचं खरे प्रेम भरलेलं होतं. सावित्रीबाईंनी नको म्हटलेले काम तात्या कधीही करत नसत. सावित्रीबाई सुविचारी आणि दूरदृष्टीची होती. तिच्याविषयी आप्तयजनांत मोठा आदर होता.

पुण्यातल्या शिकलेल्या बायकांचा घरी राबता
मुलींच्या शाळांतून तिने शिक्षिकेचे काम केलेलं असल्यामुळे स्त्रीशिक्षणाचा विस्तार झाल्यानंतर सुशिक्षित बायांत तिच्याविषयी पूज्यभाव वाढलेला दिसत होता. तिच्याकडे आलेल्या मुलींना आणि स्त्रियांना ती नेहमी सदुपदेश करीत असे. पुण्यातील मोठमोठ्या सुशिक्षित बाया, पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी आणि रमाबाई रानडे तिच्या भेटीस येत असत.

सावित्रीबाईंचा पोषाख तात्यांप्रमाणेच अगदी साधा असे. तिच्या अंगावर अलंकार नसत. तिच्या गळ्यात एक पोत आणि मंगळसूत्र असे. कपाळावर भलंमोठं कुंकू लावलेलं असे. रोज सकाळी त्या सूर्योदयापूर्वी आंघोळ करून सडासंमार्जन उरकून घेत. त्यांचं घर नेहमी स्वच्छ असे. काकूंना दिवाणखान्यात थोडाही केर अथवा धूळ पडलेली खपत नसे. त्यांच्या घरातील भांडी आणि इतर सामान स्वच्छ असून टापटीपीने ठेवलेलं असे. त्या स्वयंपाक स्वत: करीत. तात्यांच्या खाण्याची आणि प्रकृतीची त्या फार काळजी घेत.

जोतीरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व केलं. शेवटपर्यंत त्या काम करीत राहिल्या. यशवंत डॉक्टर झाल्यानंतर मिलिट्रीत नोकरीला लागला. त्याला नोकरीनिमित्त अनेक देशात जावं लागलं. त्याची बायको राधा उर्फ लक्ष्मी हिचं ६ मार्च १८९५ ला पुरात वाहून गेल्यानं निधन झालं. सावित्रीबाई घरी एकट्या उरल्या. यशवंत नोकरीनिमित्त त्यावेळी परदेशात होता. पुढे त्याने दुसरा विवाह केला. त्याला एक मुलगी झाली. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या बायकोचे व मुलीचे फार हाल झाले. या मुलीली एका सापत्य बिजवराशी लग्न करावे लागले. त्याच्य पत्नीला बेवारस स्थितीत फूटपाथवर मृत्यू आला. तिच्या मदतीला तिची पोटची पोरही आली नाही. या मुलीचे आजचे वारसदार आपण सावित्री-जोतीचे जैविक वारस असल्याचा डांगोरा पिटीत असतात. अर्थात त्यांनाही आपण जैविक वारस आहोत ही माहिती प्रस्तुत लेखकाच्या पुस्तकातून मिळालेली आहे.

प्लेगच्या साथीत लोकांचे जीव वाचवण्याची धडपड
१८९३ मधे सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षस्थान सावित्रीबाईंनी भूषवलं. १८९६ च्या दुष्काळात सावित्रीबाई खूप राबल्या. १८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं.

सावित्रीबाईंनी डॉ. यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसर-महंमदवाडीला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी डॉ. यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेरच्या महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या.

मुलाला पाठीवर घेऊन पायी ८ किलोमीटर धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. आपल्या दत्तक पुत्राला पाठीवर घेऊन स्वत:च्या गादीसाठी-संस्थानासाठी लढणार्‍या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ गौरवाने सांगितल्या जातात. तथापि आजारी अपृश्य मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या आणि स्वत: शहीद होणार्‍या या शौर्यांगणेची कहाणी मात्र पाठ्यपुस्तकांत येत नाही. समाजधुरीणांकडून त्यावर मौनाचा कट केला जातो.

ज्ञानज्योती सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला. बालहत्त्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह, दुष्काळात १००० गरिब मुलांचे संगोपन करणे आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपनाविरुद्ध नाव्ह्यांचा संप घडवणे या ४ कामांत सावित्रीने आपले नेतृत्व केले अशी कबुली दस्तुरखुद्द जोतीराव देतात, यातनं सावित्रीबाईंचं ऎतिहासिक योगदान अधोरेखित होतं.

- प्रा. हरी नरके, २ जानेवारी २०२०

Thursday, May 10, 2018

जोतिराव फुलेंच्या 'महात्मा' पदवीला १३० वर्षे पूर्ण



दिव्य मराठी, नाशिक सिटी, शुक्रवार, दि. 11 मे 2018, पृ. 5
जोतिराव फुलेंच्या 'महात्मा' पदवीला १३० वर्षे पूर्ण

स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मूलन, संसाधनांचे फेरवाटप, ज्ञाननिर्मिती, धर्मचिकित्सा, आंतरजातीय विवाह आणि सामाजिक न्याय या कार्यक्रमपत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचे काम करणारे जोतिराव फुले यांना ११ मे १८८८ रोजी मुंबईकरांनी 'महात्मा' ही पदवी बहाल केली. सामान्य माणसांनी आपल्या उद्धारकर्त्याला अशी पदवी देऊन सन्मानित करण्याची ही देशातील पहिलीच घटना होती. आज (दि. ११ ) या घटनेला १३० वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्ताने महात्मा या पदवीची पार्श्वभूमी, जोतिरावांचे अंगभूत गुण यांचा 'दिव्य मराठी'ने घेतलेला विशेष आढावा...

महात्मा फुले समग्र वाङमयाचे संपादक तथा महात्मा फुलेंविषयक अनेक पुस्तकांचे लेखन करणारे प्रसिद्ध साहित्यिक - प्रा. हरी नरके यांनी खास 'दिव्य मराठी'साठी संकलित केलेली ही माहिती.

१९५१ ला नाशकात पहिला पुतळा बाबासाहेब आंबेडकर त्यांना आपला गुरू मानत असत. १९५१ साली त्यांनी फुल्यांचा पहिला पुतळा नाशिकमधील पंचवटीत उभारला.
महान व्यक्ती काय म्हणतात -
महात्मा गांधी : 'जोतिराव फुले देशके पहले महात्मा थे. असली महात्मा थे'.
स्वातंत्र्यवीर सावरकर : फुले हे 'समाज क्रांतिकारक' होते.
ख्यातनाम इतिहासकार डॉ. रामचंद्र गुहा : जोतिराव हे आधुनिक भारताचे शिल्पकार
१८७३ साली त्यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रो चळवळीला अर्पण केला होता. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या भारतभेटीत ही अर्पणपत्रिका बघून या महात्म्याला 'सलाम' केला. जागतिक सामाजिक चळवळींना असा पाठिंबा देण्याचे त्या काळातले असे दुसरे उदाहरण सापडणार नाही.

अशी दिली पदवी -
जोतिरावांच्या वयाला ६१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ११ मे १८८८ रोजी मुंबईतील भायखळ्याजवळच्या मांडवी-कोळीवाडा येथे आग्री, भंडारी, कोळी कामगार बांधव हजारोंनी एकत्र जमले. मांडवी-कोळीवाड्यातील रघुनाथ महाराज सभागृहात हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. भायखळ्याच्या परिसरात या दिवशी सणासुदीचा उत्साह होता. नारायण मेघाजी लोखंडे, दामोदर सावळाराम यंदे, स्वामी रामय्या व्यंकय्या आय्यावारू, रावबहादूर वंडेकर, मोरो विठ्ठल वाळवेकर, भाऊ डुंबरे पाटील आदींनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी उपस्थित आग्री, कोळी, भंडारी समाजातील बांधवांनी जोतिरावांना 'महात्मा' ही पदवी बहाल केली.

या संचितामुळे जोतिराव झाले महात्मा -

जोतिरावांनी त्या काळी मांडलेले विचार-

१८८२ मध्ये प्राथमिक शिक्षण मोफत, सक्तीचे आणि सार्वत्रिक झाले पाहिजे अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली होती. अशी मागणी करणारे ते संपूर्ण आशिया खंडातले पहिले शिक्षणतज्ज्ञ होते.
१८८३ मध्ये त्यांनी शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळाल्याशिवाय शेती आणि शेतकरी यांचे दैन्य संपणार नाही असे 'शेतकऱ्याचा आसूड'मध्ये सांगून या समस्येकडे देशाचे लक्ष वेधले होते.

आधुनिक पद्धतीची शेती करणे, बांध बांधून पाणी अडवावे, म्हणजे जमीन सुपीक होईल. धरणे बांधून नद्या आडवाव्यात. शेतीला नळाद्वारे पाण्याचा पुरवठा करणे, शेतीला जोडधंदे, पूरक उद्योग यातून शेती किफायतशीर बनविण्याचा नकाशा त्यांनी मांडून दाखवला होता.

बांधकाम व्यावसायिक अन् उद्योगपती -
स्वत: फुले एक बांधकाम व्यावसायिक होते. पुण्यातील कात्रजचा बोगदा, बंडगार्डनचा पूल, डावा कालवा, रस्ते, इमारतींची अनेक कामे त्यांच्या पुणे व्यावसायिक आणि कंत्राटदार कंपनीद्वारे करून पुण्यातील एक यशस्वी उद्योगपती म्हणून त्यांनी नावलौकिक कमावलेला होता. ते नेशन बिल्डर होते याबाबत दुमत होऊ शकत नाही.

कृषी अर्थशास्त्रज्ञ : ज्या काळात ९० टक्के भारतीय शेतीवर उपजीविका करीत होते त्या काळात शेतकऱ्यांच्या समस्या देशाच्या ओपिनियन मेकर्ससमोर ऎरणीवर आणणारे पहिले कृषी-अर्थशास्त्रज्ञ फुलेच होत.

मुला-मुलींना वयाच्या सहाव्या वर्षापासून शेती, उद्योगाचे शिक्षण सक्तीचे केले होते. त्यांनीच प्रथम त्रिभाषा सूत्र सुचवले. शैक्षणिक गळती रोखण्यासाठी गरीब मुलांना विद्यावेतन देण्याचा उपाय अमलात आणलेला होता.

पुण्याचे आयुक्त म्हणून केले सात वर्षे काम -

१८७६ ते १८८३ याकाळात ते पुण्याचे आयुक्त होते. घरोघरी नळाद्वारे पाणी पुरविण्याची योजना यशस्वी करण्यासाठी ते झटले. उत्तम रस्ते, शाळा, आरोग्य यावर त्यांचा भर होता. गव्हर्नरच्या स्वागतावर पैसा उधळण्याला तसेच मंडईच्या बांधकामाला त्यांनी विरोध केला. या पैशाचा वापर शिक्षणासाठी करावा असा आग्रह होता. आज सर्वच शहरांतील बेकायदा बांधकामांच्या प्रश्नाने अक्राळविक्राळ रूप धारण केलेले आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त फुले यांनी आपल्या घरातील स्नानगृहाच्या अंतर्गत बांधकामात सुधारणा करण्यासाठीसुद्धा नगरपालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केलेला बघून चकित व्हायला होते.

मांडवी-कोळीवाडा परिसरातील याच सभागृहात १३० वर्षांपूर्वी जोतिरावांना महात्मा ही पदवी देण्यात आली.

सर्वच बाबतीत अव्वल -

भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतिरावांचेच प्रोत्साहन होते. टिळक-आगरकरांना पहिल्या तुरुंगवासात त्या काळात (१८८२) जामीन द्यायला आणि सुटकेनंतर त्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यातही तेच पुढे होते.

१८६९ साली जोतिरावांनी मराठीतले पहिले शिवचरित्र लिहिले.

१८८o साली त्यांनी देशात पहिल्यांदा शिवजयंती उत्सव सुरू केला. रायगडावरील शिवसमाधीची डागडुजी केली आणि शिवरायांना महानायक म्हणून लोकमानसात प्रस्थापित केले. पुण्यात हिराबागेत आणि मुंबईला लालबाग-परळ भागात करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमांच्या नोंदी उपलब्ध आहेत. फुले चरित्रकार पंढरीनाथ सीताराम पाटील, माधवराव बागल, धनंजय कीर यांनी त्याबाबतचे पुरावे दिलेले आहेत.

आजच्या काळातील महत्त्व-
शिक्षणहक्क कायद्याद्वारे २०१० साली ही मागणी पूर्ण झाली.
शेती उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव देण्याचाच पर्याय विविध पातळ्यांवर आणि व्यासपीठावर दिला जातो. सरकारही या मताशी आता अनुकूल होत आहे.
जलयुक्त शिवार, पाणी अडवा - पाणी जिरवा, ठिबक सिंचन यांसारख्या सिंचन योजनांचे बीजच जोतिरावांच्या विचारातून आले.
त्यांनी दाखवलेल्या गळतीबाबतच्या इतर १५ कारणांचा आणि उपायांचा अभ्यास आजही मार्गदर्शक ठरावा.

शेअर बाजाराच्या टिप्स दिल्या कवितेतून -

शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी कोणती दक्षता घ्यावी यावर त्यांनी कविता लिहिल्या.

ते ग्रंथप्रकाशनाच्या व्यवसायात होते. सोन्याच्या दागिन्यांचे साचे विकण्याची त्यांच्याकडे एजन्सी होती.

सामाजिक न्यायाचे सूत्र -
सामाजिक न्यायासाठी त्यांनी शुद्र-अतिशुद्रांना आरक्षण देण्याची मागणी केली.

आजचे सगळे राजकारण विकास आणि सामाजिक न्याय याच सूत्रांच्या भोवती फिरत आहे.
जोतिरावांचे राजकारण समजून घेण्यासाठी "सत्तेवाचून सकळ कळा झाल्या अवकळा" हे जोतिसूत्र समजून घेतले पाहिजे.

-प्रा.हरी नरके
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/nashik-city/248/11052018/0/5/
दिव्य मराठी, नाशिक सिटी, शुक्रवार, दि. 11 मे 2018, पृ. 5
..........................
जोतिराव फुलेंच्या 'महात्मा' पदवीला १३० वर्षे पूर्ण
.........................
http://digitalimages.bhaskar.com/divyamarathi/epaperpdf/11052018/10NASIK%20PULLOUT-PG5-0.PDF
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/nashik-city/248/11052018/0/5/

Published on 11 May-2018

Saturday, March 11, 2017

सावित्रीबाई फुले यांचे अस्सल तैलचित्र -


[ सावित्रीबाई फुले यांची दिलेली ही दोन्ही चित्रे अस्सल आहेत.]




सावित्रीबाई फुले यांची खाली दिलेली ही दोन्ही चित्रे काल्पनिक/चुकीची आहेत.

सावित्रीबाई फुले यांची  ही दोन्ही चित्रे काल्पनिक/चुकीची आहेत.

सावित्रीबाई फुले यांचा काचेच्या भल्यामोठ्या अस्सल कृष्णधवल निगेटिव्हवरील ग्रुपफोटो जुना आणि अस्पष्ट झालेला असल्याने आमच्या समितीतर्फे त्यावरून जसेच्या तसे रंगित तैलचित्र तयार करून घ्यायचे ठरवले. चित्रकारांबरोबर अनेक बैठका झाल्या. त्यांनीही जीव ओतून सुरेख तैलचित्र [ हुबेहुब कृष्णधवल निगेटिव्हनुसार ] तयार केले.
3 जानेवारीला नायगावच्या [ सावित्रीबाईंचे माहेर ] जयंती कार्यक्रमात ते प्रकाशित करायचे ठरवले. नानाविध अडचणींमधून वाट काढावी लागली. त्यावेळच्या एका उपसचिवाने खूप खोडे घातले. त्यासाठी त्याने कागदोपत्री चक्क लबाड्याही केल्या. मुख्यसचिव अरूण बोंगिरवारही आपल्या प्रशासनाच्या चुकीच्या बाजूनेच उभे राहिले.
खुप झटापट झाली. बड्यांशी झुंजावे लागले.
तीनच दिवस शिल्लक असताना योग्य तो निर्णय झाला. त्यातले दोन दिवस शासकीय मुद्रणालयाला सुट्टी होती.
मात्र संचालक मित्रांनी अपार मेहनत केली आणि तिसर्‍या दिवशी अस्सल तैलचित्र प्रकाशित झाले.
त्या आधी सावित्रीबाईंची दोन काल्पनिक चित्रे प्रसिद्ध झाली होती. एकामागे सदभावना होती तर एकामागे पत्नीप्रेम!
एकाने सावित्रीबाईंचे चरित्र लिहून त्यावर पहिले चित्र छापले.
एकदा एका कार्यक्रमाला त्यांच्या गावात गेलो असताना त्यांनी दुसर्‍या दिवशी घरी चहाला बोलावले.
चहा पोहे द्यायला त्यांच्या पत्नी समोर आल्या. मी त्यांना प्रथमच भेटत होतो.
तरिही त्यांचा चेहरा कुठेतरी पाहिल्याचा भास होत राहिला. तो ओळखीचा वाटत राहिला.
घरी आल्यावर हे पुस्तक परत पाहिले आणि सगळा उलगडा झाला!
दुसरे तैलचित्र बनवणारे चित्रकार माझ्या ओळखीचे होते, पण त्यांनी एखाद्या सरदारपत्नीचे काढावे असे "वजनदार तैलचित्र" रंगवलेले होते.
17 वर्षे झाली आम्ही सावित्रीबाईंचे मुळाबरहुकुम अस्सल तैलचित्र प्रकाशित करून, तरिही लोक अजुनही ती जुनीच आणि चुकीची तैलचित्रे वापरतात तेव्हा खंत वाटते.
अस्सल गोष्टी रुजायला किती वेळ लागतो आपल्या देशात!
माझं असे मत आहे की संशोधनाची कोणतीही शिस्त न पाळता, केवळ आंधळी भक्ती आणि जातीप्रेम यातून त्या विद्वानांकडून ही चूक झाली असणार. आता तरी पुरे करा -- "एक फुले : दो माली."
...........................


Tuesday, January 6, 2015

दिल्ली, तेलंगणा आणि महाराष्ट्र : शालेय मुलांसाठी अभिनव उपक्रम

चारही माध्यमांच्या  एक हजार मुलामुलींचा सहभाग









दिल्ली, तेलंगणा आणि महाराष्ट्र यांनी एकत्र येऊन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची १८४ वी जयंती एका अभिनव उपक्रमाद्वारे साजरी केली. एक हजार शालेय मुलामुलींनी त्यात सहभाग दिला. तेलंगणा राज्यातील अदिलाबाद जिल्ह्यातील सतरा शाळांमधील  मराठी, तेलुगू, हिन्दी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा यात सहभागी झाल्या होत्या. प्रा. हरी नरके लिखित पुस्तक  "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले" या मराठी चरित्रग्रंथाचे भाषांतर आजवर इंग्रजी, { एन. सी. इ. आर. टी प्रकाशन, नवी दिल्ली } हिन्दी व तेलुगू आदी  भाषांमध्ये झालेले आहे. त्या पुस्तकावर आधारित परिक्षेचे आयोजन दिल्लीच्या "महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्थान" तर्फे करण्यात आले. श्री. सुकुमार पेटकुले आणि सहकार्‍यांनी त्यासाठी परिश्रम घेतले.

"कौन बनेगा विजेता" या उपक्रमाचे आयोजन " कौन बनेगा करोडपती " च्या धर्तीवर करण्यात आले. एक हजार मुलांनी चार भाषांमधील हे पुस्तक वाचून त्यावर लेखी परिक्षा दिली.

त्यात गुणानुक्रमे पहिले आलेल्या ५१ स्पर्धकांना उपान्त्य फेरीत प्रवेश देण्यात आला. त्यांना काही प्रश्न विचारून त्यातले निवडक दहाजण अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. त्यांना प्रत्येकी दहा प्रश्न विचारून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले.

रुपये दहा हजार ते रुपये पाच हजारचे हे विविध पुरस्कार होते. पहिले तिन्ही पुरस्कार मुलींनी जिंकले.या स्पर्धेसाठी मुलामुलींनी केलेला सखोल अभ्यास, दिलेली सळसळती उत्तरे आणि केलेली तळमळीची भाषणे चकीत करणारी होती.

सावित्रीबाईंचे विचार आणि कार्य ह्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या एक हजार मुलांनी आत्मसात केलेले बघणे हा अनुभव विलक्षण भारावून टाकणारा होता.

चारही माध्यमांच्या मुलांचा यातला सहभाग प्रभावित करणारा होता.
............................................................

Thursday, November 28, 2013

पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय योग्यच





http://ncp.org.in/stories/initiative/262....

'पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय योग्यच - प्रा. हरि नरके'
पुणे विद्यापिठाच्या अधिसभेने {सिनेटने} सर्वानुमते विद्यापिठाच्या नामविस्ताराचा निर्णय घेतला आहे. व्यवस्थापन परिषदेकडे हा निर्णय पाठवून त्याला मान्यता मिळाली की, सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाईल. विधिमंडळाच्या अधिवेशनात याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी विद्यापीठाकडून प्रस्ताव आल्यास सरकार त्याबाबत जरूर विचार करेल, असे आश्वासन दिले होते. यावरून नामविस्ताराची प्रक्रिया सुरळीत पार पडत असल्याचे दिसते. ही आनंदाची बाब आहे.

दोन विरोधी सूर निघाले, हे खरे आहे, मात्र हे दोघेही विद्यापीठाबाहेरचे असल्याने आणि ती त्यांची व्यक्तिगत मते असल्याने त्याला लोकांचा पाठिंबा नाही. एकाचे म्हणणे असे होते की, विद्यापीठाची गुणवत्ता नामविस्ताराने वाढणार नाही किंवा भ्रष्टाचारही संपणार नाही, त्यामुळे नामांतराची गरज नाही. हा युक्तीवाद मुख्य विषयाकडून लोकांचे लक्ष दुसरी कडे वेधणारा आहे. त्यात फारसे तथ्य नाही. नामविस्ताराशी गुणवत्तेची सांगड घालून विरोध करणे, योग्य नाही.

नामविस्तार करताना विद्यापीठाच्या नावामध्ये पुणे शब्द नको, कारण पुण्याला पेशव्यांचा जातीयवादी इतिहास आहे. असा आक्षेप घेतला गेला आहे. तो अतिशय बालिश आणि तथ्यहीन आहे. पुणे शहर हे जिजाऊ माँ साहेब, छत्रपती शिवराय, थोरले बाजीराव, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, टिळक, आगरकर, रानडे, कर्वे, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे यांच्यापासून जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, अनिल अवचट, बाबा आढाव अशा गुणवंतांचे आहे. पुणे हे शिक्षण, संस्कृती, कला, विज्ञान, उद्योग आणि व्यापार यांचे माहेरघर आहे. महात्मा गांधी यांनी पुण्याला ‘कार्यकर्त्यांचे मोहोळ’ म्हटले होते. हा वारसा पाहता पुणे या नावाला विरोध करणे आयोग्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि लोकसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अशी नामविस्ताराची गेल्या २० वर्षांची परंपरा आहे. तिला अनुसरूनच पुणे हा शब्द ठेवणे उचित होईल.

सावित्रीबाई फुले या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांनी १५० वर्षांपूर्वी शाळा सुरू केली, तेव्हा त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण ते दाम्पत्य डगमगले नाही. सावित्रीबाई जोतिरावांकडे आधुनिक शिक्षणतज्ज्ञ म्हणून बघणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाची आमुलाग्र फेररचना करणे, तंत्रशिक्षण आणि शेतीशिक्षणाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणे, शैक्षणिक गळतीची कारणे शोधून ती दूर करण्यासाठी उपाययोजना करणे, प्रौढ साक्षरता अभियान सुरू करणे, महिला व दलितांच्या शिक्षणासोबतच अल्पसंख्याकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देणे, याबाबतचे सावित्रीबाई-जोतिरावांचे कार्य अतुलनीय आहे.

महिला आज शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी भरारी घेत आहेत. सावित्रीबाईंच्या नावामुळे महिलांच्या मानवी अधिकारांच्या चळवळीला फार मोठी ऊर्जा मिळेल, असा मला विश्वास वाटतो. हा नामविस्तार अतिशय सलोख्याच्या वातावरणात पार पडत असल्याचा आनंद आहे. मी पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळांचे अभिनंदन करतो.

Monday, November 18, 2013

कोहम महोक यांचा कुत्सितपणा



कोहम महोक यांच्या फेसबुकवर त्यांनी जातीवर्चस्व-जात्याभिमान आणि वर्णश्रेष्ठत्वाचा उग्र पुरस्कार करणारी एक पोस्ट टाकलेली आहे. त्यात सावित्रीबाईंचे कार्य शालेय शिक्षणात होते म्हणून  त्यांचे नाव एखाद्या शाळेला द्यावे असे अत्यंत कुत्सितपणे सुचवले आहे. ही सावित्रीबाईंची प्रच्छन्न टवाळी आहे. त्यांचा मी तीव्र निषेध करतो. त्यांच्या चर्चेतील काही अंश माहितीस्तव खाली देत आहे. श्री.राजन दांडेकर, श्री.मयुरेश कुलकर्णी आदींनी कोहमना सडेतोड उत्तरे दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद.
Koham Mahok
November 12
सध्या एक जातीयवादी वाद जोर धरू पाहतो आहे, पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे की जिजाबाई भोसले यांचे नाव द्यावे. सर्वसाधारणपणे मराठा आणि माळी/ इतरेजन असे ह्या वादाचे स्वरूप आहे. ह्या वादात माझ्या माहितीतील सर्व ब्राम्हणांनी सावित्रीबाई फुल्यांच्या बाजूने मत दिलेले आहे. उस्फुर्त चर्चेत सुद्धा ब्राम्हण युवक आणि इतर, सावित्रिबाइंच्या नावाला पाठींबा देत आहेत. ही घटना ब्राम्हण समाजाच्या विद्यादानाच्या क्षेत्रातील आणि पुणे विद्यापीठातील कमी होत चाललेल्या इंफ्ल्यूयन्सचे द्योतक आहे.
ह्यामागे लक्ष्यात घेण्याच्या काही गोष्टी आहेत:
१. जिजाबाई आणि सवित्रिबाई ह्यांची नावे चर्चेत असताना, बायबाई कर्वे, आनंदीबाई जोशी, अथवा झाशीची राणी लक्ष्मिबाइ यांची आठवण पण झालेली नाही. मला वाटते सवित्रिबाइंचे कार्य हे प्राथमिक शिक्षणात होते तेव्हा एखाद्या शाळेला (अजून दिलेले नसेल तर) त्यांचे नाव द्यावे हे जास्ती सयुक्तिक नाही का?
२. सावित्रीबाई ह्या म. फुल्यांचा ब्राम्हणद्वेषाच्या बाजूने होत्या की विरुद्ध ह्याचा खुलासा/ संशोधन होणे जरुरीचे आहे. म. फुले हे ब्राम्हणद्वेषाच्या बाबतीत तत्कालीन संभाजी बिग्रेड स्टायल (अहिंसक जहाल विरोधी) होते हे लक्ष्यात घेतले पाहिजे.
३. जिजाबाई ह्या नक्कीच ब्राम्हणद्वेषी नव्हत्या, मग ब्राम्हण समाजाने जिजाबाईच्या नावामागे का बरे उभे राहू नये?
सारांश, हा वाद निरर्थक आहे, आणि कोहमला स्वतःला शिक्षणाच्या घसरत चाललेल्या दर्जाच्या (ब्राम्हणांची कमी होत चाललेली संख्या हे घसरणाऱ्या दर्जाचे कारण आहे का?) संस्थेमागे कोणाचे नाव लागते ह्याची आणि आपल्या प्रिय व्यक्तीचे नाव लागत नाही ह्याचे बिलकुल वैषम्य नाही. किंबहुना झाशीच्या राणीचे नाव असल्या दर्जाहीन विद्यापीठाला नकोच, हे मात्र खरे.
पण सामाजिक वादात ही एक नवी "संधी" ब्राम्हण समाजाच्या बाजूला भविष्यात असणार आहे. ह्या असल्या आपापसात होणार्या वादात ब्राम्हण समाजाने एकजुटीने किंगमेकर होण्याची गरज आहे. तटस्थपणे नाना फडणवीसाला स्मरून किंगमेकर व्हा हा ह्या आधुनिक नामांतराचा धडा आहे.

बाकी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ किंवा जिजाबाई भोसले पुणे विद्यापीठ ह्या वादात आपले मत कुणाला?
- कोहम
Rajan Dandekar स्त्री आणि अन्याय विधवा आणि अन्याय ह्यात अग्रेसर हा शतकानुशतके ब्राह्मण समाज होता...... आणि नाना फडनविस चा वारसा चालवणे म्हणजे व्यभिचाराचा वारसा चालवणे.....!!!!!! फुले आणि मराठा सेवा संघ यांत मुलभूत फरक आहे. फुले यांनी भटशाहीचा विरोध केला.... प्रतीकांवर हल्ला चढवून बळी सारख्या नायकाचे पुनर्र्जीवन केले.... फुल्यान्सोबत अनेक जन्माने ब्राह्मणही होते.... मसेस मात्र व्यक्ती म्हणूनही ब्राह्मणाचा द्वेष करतात. अर्थात याला विरोध करायलाच हवा.... सावित्रीबाई अश्या काळात प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम केले जेव्हा स्त्रिया आणि शुद्र यांना न्यानबंदी होती.... भटाळलेले पुणे विद्यापीठ कितीही घाणेरडे आणि बामणी जात्यांधांचा अड्डा असले तरी या निर्णयाचे स्वागत करायला हवे. जुलमी पेशवाई आणि सदाशिव पेठी मक्तेदारीला मिळालेली ही चपराक आहे....!!!!!!
November 13 at 2:41pm · Like · 2

Koham Mahok Rajan - राजन - मी आपल्या मताचे किंबहुना मतभेदाचे स्वागतच करतो. आपल्याकडे महापुरुषांना देवत्व बहाल केले जाते आणि तसे झाले की त्या महापुरुषाची कोणतीच गोष्ट चुकीची असूच शकत नाही. बहुजनांना ज्ञानबंदी होती ह्या विधानाला माझा आक्षेप आहे. अगदी शिवकालापासून बहुजन हे शिकत होतेच फक्त सामाजिक रचनेमुळे त्यांना शिक्षणात फारसा रस नव्हता. अगदी आज २० १३ साली सुद्धा बहुजन समाज शिक्षणाबाबत उदासीनच दिसतो. स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनी सुद्धा हीच स्थिती आहे आणि ह्याला जबाबदार कोण? ब्राम्हण?
[फुले यांनी भटशाहीचा विरोध केला.... प्रतीकांवर हल्ला चढवून बळी सारख्या नायकाचे पुनर्र्जीवन केले.... फुल्यान्सोबत अनेक जन्माने ब्राह्मणही होते.... मसेस मात्र व्यक्ती म्हणूनही ब्राह्मणाचा द्वेष करतात. अर्थात याला विरोध करायलाच हवा]
जसे बहुजन पिढीजात चालत आलेल्या जातीय समाजरचनेचे बळी होते तसेच ब्राम्हण पण बळी होते. सर्व समाजरचनेला ब्राम्हण समाजाला दोष देणे हेच मुली मला मान्य नाही. हजारो वर्षांपूर्वी जी सिस्टीम प्रथा ज्या कोणी पडली होती त्याला सध्याच्या ब्राम्हण समाजाला जबाबदार धरणे हेच मुळी चुकीचे आहे. म. फुलेंच्या कार्यात अनेक चांगल्या गोष्टी असतील पण ते ज्या रीतीने ब्राम्हण समाजाला जबाबदार धरून ठोकायचा प्रयत्न करायचे ते मात्र चुकीचेच आहे. अर्थात म. फुलेंना देवत्व बहाल करणाऱ्यांना त्यांचे माणूस असणे आणि त्या न्यायाने एखादी भूमिका चुकीचे असणेच जर मान्य नसेल तर बोलणेच खुंटले.
खुलासा: आपण म्हणता की मसेस व्यक्ती म्हणून द्वेष करतात आणि फुले भटशाहीचा विरोध करतात. दोन्हीही विरोध माझ्या दृष्टीने चुकीचेच. आणि मी आधी म्हणाल्याप्रमाणे म. फुले हे आद्य ब्राम्हणद्वेषी होते. त्यांचा ब्राम्हणद्वेष हा सध्याच्या लिंगपिसाट खेडेकर, मेश्राम आदी लोकांपेक्षा भले मवाळ असेल, पण ह्या खोडकर द्वेषाची सुरुवात म. फुल्यांनी केली होती ही गोष्ट मी आपल्यासमोर नमूद करू इच्छितो.
म. फुले आणि त्यांचे जातीनिर्मुलन/ शिक्षणामधले कार्य ह्या विषयी किंचितही दुरादार न दाखवता मी हे आपल्या समोर आणु इच्छितो, कारण मी म. फुल्यांना माणूस मानतो, देव नव्हे. - कोहम
Rajan Dandekar बुद्धासकट सर्वांना देवत्व बहाल करून संपवण्याचा वैदिक धंधा हा ब्राह्मणांच्या पिढीजात वारसाहक्काचे द्योतक.... त्यामुळे आम्ही नास्तिक देवत्व बहाल करण्याच्या भानगडीत कशाला पडू....????? (सवित्रिबाइंचे कार्य हे प्राथमिक शिक्षणात होते तेव्हा एखाद्या शाळेला (अजून दिलेले नसेल तर) त्यांचे नाव द्यावे हे जास्ती सयुक्तिक नाही का?) कुत्सित पणा आणि (जिजाबाई आणि सवित्रिबाई ह्यांची नावे चर्चेत असताना, बायबाई कर्वे, आनंदीबाई जोशी, अथवा झाशीची राणी लक्ष्मिबाइ यांची आठवण पण झालेली नाही.) जात्याभिमान व वर्णश्रेष्ठत्व दिसून आले.....!!!!!!
Koham Mahok Rajan -
राजन - वर्णाभिमान? जसे आपण मान्य कराल की ब्राम्हण इतर कोणत्याही जतिपेक्षा श्रेष्ठ नाहीत, तसेच मी मानतो की ब्राम्हण हे इतर कोणत्याही जतिपेक्षा कनिष्ठपण नाहीत. आपण ही भूमिका मान्य कराल का?
वर्णव्यवस्थेला मी ब्राम्हण म्हणून एकटाच जबाबदार नाहीये, आणि ही सत्य भूमिका आपल्याला अवघड आहे. मुद्दा आहे ब्राम्हणद्वेषाचा, आणि ब्राम्हणद्वेष म. फुल्यांच्या काळात पण चुकीचा होता आणि आज पण आहे.
आपण निरीश्वरवाडी असाल पण आपण म. फुल्यांना ईश्वरासमान मानत असे माझे मत आहे.
November 13 at 3:58pm · Like · 3

Rajan Dandekar ब्राह्मण्य आणि ब्राह्मण व्यक्ती ह्यातील फरक तुमच्या लक्षात येणार नाही तुम्ही जन्माने ब्राह्मण म्हणून द्वेष करणे चुकीचेच आहे. पण ब्राह्मण्यग्रस्त भूमिकांना विरोध हा असणारच.....!!!!!! तुमच्या भूमिका ब्राह्मण्य ग्रस्त नाहीत काय....?????
Rajan Dandekar Ketan Mahajani या बाबत माझी भूमिका तुम्ही कोहमांना विचारा ते सांगती..... मराठा सरंजामी जात्यंधाविरोधात कायमच आक्रमक भूमिका आम्ही घेतलेली आहे,
Rajan Dandekar कोहम पेशवाईचा सामाजिक इतिहास जरा तपासून पहा...... महात्मा फुले यांची प्रतिक्रिया आणि क्रिया ही कालानुरूप होती, यात शंकाच नाही. आणि हजारो वर्ष राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि जुलमी धार्मिक अबाधित सत्ता अगदी मोगलाइतहि ज्या ब्राह्मण वर्गाने इतर समाज घटकांना ओरबाडून उपभोगली त्या समाजाने खर तर इथल्या सामंजस आणि अतिरेकविहीन समाज धारणेचे ऋणी असले पाहिजे..... आणि सरंजामी शक्तींच्या विरोधात दलित श्रमिक आदिवासी महिला आणि प्रगतिशील शक्तीन्सोबत उभे ठाकले पाहिजे..... सामुराई जातीने जपान मध्ये जसे सर्व अधिकार राष्टउनातीसाठी सोडले व आपले अस्तित्व जपानी नागरिक म्हणून ठेवले तसे..... पण हिटलरची पूजा करून हिंदुराष्ट्राच्या नावाखाली चातुर्वर्ण्य पुन्हाः प्रस्थापित करण्याची हुकुमशाही स्वप्ने पाहणे यात नामशेष होण्याचा पुढे धोका आहे......!!!!!! गोडसे ने केलेले राजकीय नुकसान याबाबत विचार करा......
November 14 at 8:57am · Like · 2

Koham Mahok Rajan - राजन - पेशवाई आणि तेव्हा काय झाले, किती चूक होते हा नक्कीच चर्चेचा मुद्दा आहे, आणि तेव्हा फक्त ब्राम्हण समाज सत्तेत, उच्चवर्नियांत नव्हता आणि पण त्यामुळे "फक्त" ब्राम्हण समाजाला ज्या रीतीने म. फुले यांनी टार्गेट केले ते चुकीचे होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जातीनिर्मुलनाची चळवळ, ह्या म. फुल्यांच्या अतिरेकी टीकेमुळे कमी झालेल्या ब्राम्हण आणि मराठा समाजाच्या पाठीम्ब्याशिवाय मागे पडली. आजही जाती समाजात घट्ट स्थान पटकावून आहेत.आणि ह्याचा थोडासा का होईना दोष म. फुल्यांकडे जातो. माझ्यासारख्या जातीवर अजिबात विश्वास नसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा, ब्राम्हण समाजाला टार्गेट करण्याचे वैषम्य वाटते. ब्राम्हण कोनपेक्षा श्रेष्ठ नाहीत पण त्याच न्यायाने ते कनिष्ठ सुद्धा नाहीत. - कोहम
Mayur Kulkarni "जसे बहुजन पिढीजात चालत आलेल्या जातीय समाजरचनेचे बळी होते तसेच ब्राम्हण पण बळी होते"

_/\_
Gabbar Singh bichara daku prathecha bali hota.
November 13 at 3:24pm · Like · 1

Koham Mahok Mayur Kulkarni -
डाकू ही काय जात आहे काय? आपल्याला मला काय म्हणायचे तेच समजलेले नाही.
November 13 at 3:27pm · Like

Mayur Kulkarni Chngalach samajlay.

Oppressors are oppressors, they can't be the victims of that same oppression.
We can make tomorrow better by accepting the shortcomings of the past.
Truth is we (brahmin's) were oppressors, we treated dalit people with lesser status than animals. We were the people who threw faeces at them.. We still do by our words.
November 13 at 3:32pm · Like · 1
Koham Mahok Mayur Kulkarni - that is ridiculous, I koham, has never done that, neither I consider any other caste any lower, nor oppress anyone, much less threw feces at any one. Most of the bramhins are like that, and are being blamed for eternity. How about the second layer of the caste system? If anyone was violent against dalits (even today's day and age), that was this second layer of caste based model? I don't see M. Phule criticizing marathas for any of the atrocities. This selective outrage is what I want to point out and condemn. If you want to worship M. Phule as a God, that is your choice. - koham
November 13 at 3:39pm · Like · 1
Mayur Kulkarni I am atheist & don't worship anyone as god. Someone saving different views than you doesn't he is idolizing people.
Brahmin were the highest echelons & most prominent beneficiaries of the caste system.

I agree, that today we are not the most aggressive of oppressors, maratha have overtook us. But we once hold power even over maratha king Shivaji maharaj. He had to prove that he wasn't a Shudra & had ties with Sisodiya clan to prove his Kshatriya status.
This says a lot.

I am happy most of us don't think same wy today. The reason I support to name change is she was a first woman teacher in first woman's school of India.
Her husband being Brahmin hater or not is other issue, we can't take her work away from her. We are talking about naming a university, her works regarding that field should be consider like a rational mind. Not her husband's communal views, that is just plain stupid or far fetched in order to oppose her name.
Koham Mahok Mayur - I may agree with the last paragraph of what you have said. But you are guessing, do we know or has anyone researched Shrimati Savitribaai's disposition about bramhins? Thanks for agreeing that bramhins are not the aggressors, this is a beginning . Mahatma Phule was the seed of organizations like Sambhaji B-grade and BAMSEF by their own admission. I disagree that bramhins were the only beneficiaries of caste system, kshatriyas were equally benefited by the caste system. - koham
Koham Mahok Rajan - [ब्राह्मण्य आणि ब्राह्मण व्यक्ती ह्यातील फरक तुमच्या लक्षात येणार नाही तुम्ही जन्माने ब्राह्मण म्हणून द्वेष करणे चुकीचेच आहे. पण ब्राह्मण्यग्रस्त भूमिकांना विरोध हा असणारच.....!!!!!! तुमच्या भूमिका ब्राह्मण्य ग्रस्त नाहीत काय....?]
माझा ब्राम्हण म्हणून द्वेष न करण्याबद्दल धन्यावाद.
जर का कोणीही मी ब्राम्हण जातीत जन्मलो म्हणून मी श्रेष्ठ आहे असे म्हणत असेल तर त्याला माझा पण विरोध राहील.
माझी भूमिका एकाच आहे - ब्राम्हण म्हणून कोणीही श्रेष्ठ नाही तसेच ब्राम्हण म्हणून कोणीही कनिष्ठ नाही. हजारोवर्षांपूर्वीपासून चालत आलेल्या गोष्टींना "फक्त" ब्राम्हण समाजाला जबाबदार धरून ठोकू नका. इथे म. फुले चुकले असे मी खेदाने नमूद करतो, कारण खोडसाळ ब्राम्हणद्वेषाची सुरुवात तेव्हापासूनच झाली.
Koham Mahok Rajan - राजन - पेशवाई आणि तेव्हा काय झाले, किती चूक होते हा नक्कीच चर्चेचा मुद्दा आहे, आणि तेव्हा फक्त ब्राम्हण समाज सत्तेत, उच्चवर्नियांत नव्हता आणि पण त्यामुळे "फक्त" ब्राम्हण समाजाला ज्या रीतीने म. फुले यांनी टार्गेट केले ते चुकीचे होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जातीनिर्मुलनाची चळवळ, ह्या म. फुल्यांच्या अतिरेकी टीकेमुळे कमी झालेल्या ब्राम्हण आणि मराठा समाजाच्या पाठीम्ब्याशिवाय मागे पडली. आजही जाती समाजात घट्ट स्थान पटकावून आहेत.आणि ह्याचा थोडासा का होईना दोष म. फुल्यांकडे जातो. माझ्यासारख्या जातीवर अजिबात विश्वास नसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा, ब्राम्हण समाजाला टार्गेट करण्याचे वैषम्य वाटते. ब्राम्हण कोनपेक्षा श्रेष्ठ नाहीत पण त्याच न्यायाने ते कनिष्ठ सुद्धा नाहीत. - कोहम

https://www.facebook.com/koham.mahok


Thursday, November 14, 2013

श्री.विश्वंभर चौधरी आणि सोशल आ‘डीट






Mandar Lele श्री.विश्वंभर चौधरी यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. पुणे विद्यापिठाचा नामविस्तार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ होणार असा सिनेटचा ठराव होताच हातातील सगळी कामे बाजूला ठेवून श्री.विश्वंभर चौधरी यांनी २ दिवसात लोकसत्तेत लेख लिहिला यावरून त्यांचा नामविस्तार आणि विद्यापिठाची शैक्षणिक गुणवत्ता याबाबतचा प्राधान्यक्रम स्पष्ट होतो. ते म्हणतात माझा सावित्रीबाईंच्या नावाला विरोध नाही.सर, मुद्दा असाय की आपला पाठींबा का नाही? आपल्याला त्यांच्याबद्दल आदर आहे तर नामविस्ताराला पाठींबा द्यायला अडचण काय? आपला लेख मला आवडला नव्हता. कारण तुम्ही "स्वसंरक्षणार्थ आपला विरोध नाही असे मी पुन्हा सांगतो" असे लिहिता यातच सगळे आले. सावित्रीबाईंमुळे जर तुमची आईबहिण पत्नी शिकली तर त्यांच्या नावाला खुल्यादिलाने पाठिंबा देण्यात तुम्हाला अडचण काय? तेच मला समजत नाही.तुम्ही हा लेख लिहून सावित्रीबाईंना मानणार्‍या सगळ्यांची मने गरज नसताना दुखावलेली आहेत. शब्दच्छल करणे, कावेबाजपणे शाब्दीक कसरती करणे हा उद्योग आतातरी आपण सोडला पाहिजे.आपल्या पुर्वजांच्या चुका {सावित्रीबाईंवर चिखलफेक करण्याच्या}निस्तरण्याची चांगली संधी आलेली असताना तुम्ही हा लेख लिहून बहुजनांची मने का दुखावलीत? तुमच्या या उद्योगाचा आम्हाला ताप होतो, त्याचे काय?आणि खुलाश्यातही तुम्ही माझा विरोध नाही असेच पुन्हा तुनतुणे वाजवताय. पाठींबा आहे म्हणायला तुमची तयारी का नाही? तुमच्यामुळे समग्र समाजाला फटके खावे लागतात. आम्ही तुमच्याशी सहमत असतो तर तेही खायला हरकत नव्हती. पण आज समाजातल्या तमाम सगळ्यांचा नामविस्ताराला पाठिंबा असताना तुम्ही हा उद्योग करून ठेवलात.
तुमचे समर्थक नरके सरांवर ज्या असभ्य भाषेत आरोप करीत आहेत ते पाहिले आणि त्यांची ब्राह्मणी आडनावे पाहिली की पुन्हा बहुजन समाज आपल्यावर भडकणार. कोणाला आपण "भाडोत्री विद्वान, भ्रष्ट, लोकांचा पाठींबा नसलेला" म्हणतोय हे त्यांना एक कळत नाही. "सारे ब्राह्मण पुरूष जाळून टाका, कापून मारा" असे सांगणार्‍या पुरुषोत्तम खेडेकरांवर गुन्हा दाखल करणारे नरके सर, ज्या माणसाने एकट्याने जातीयवादी ब्रिगेडला अंगावर घेतले, रोखले त्या नरके सरांबद्दल लिहिताना थोडीतरी कृतज्ञता बाळगा. आपले पुर्वज आजवर वर्ण - जाती अहंकारात आणि मिजाशीत जगल्यानेच सत्ताधारी जातीने आपल्याला बहुजनांचे शत्रू ठरवले हे आपल्याला कळत का नाही?की कळले पण वळत नाहीये?...पणती जपून ठेवा अंधार फार झाला.....

.......................................................

  • साक्य नीतीन "स्वसंरक्षणार्थ माझा सावित्रीबाईंच्या नावाला विरोध नाही" असे जेव्हा चौधरी म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ हाच होतो कि त्याना जर एखाद्या पक्षाचे अथवा संघटनेचे सरंक्षण असते तर त्यानी उघडपणे नामविस्ताराला विरोध केला असता. चौधरी साहेब आत बुन्द से गई वो हौद से नही आती।

    आता विश्वंभर चौधरी म्हटले कि डोळ्यांसमोर सावित्रीमाईंच्या नावाला विरोध करणारा माणुस डोळ्य़ांसमोर येईल.
  • Sagar Killarikar Its True that "तुम्ही तोंडदेखले काय म्हणता यापेक्षा, तुमचा लेख जे बोलतो ते महत्वाचे" !! I agree with objections raised by Shri. Hari Narke ! The Article by Mr. Vishwanbhar Chaudhary was against renaming of Pune University.It was nothing but unsuccessful attempt of Incrustation of Fairness ! We deprecate such mentalities ! We generally call it as an "RSS" mentality i.e. drastic difference between 'inner feelings' & 'actual expressions' !
  • Amravatiche Mali आईच्या नावाला विरोध करतो तो नालायकच म्हटला पाहिजे..........
    Yesterday at 2:43am via mobile · Edited · Like · 1
  • Yogita Rege नरके तुम्हारा तो चुक्याच!...
    "नामाचा गजर...." हा राजकीय - सामाजिक विचारवंत डा.श्री.विश्वंभर चौधरीसर यांचा लोकसत्तेतील लेख अप्रतिम मनोरंजन करणारा आहे. सावित्रीबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला मिळणार म्हटल्यावर आलेल्या सात्विक संतापाने पेटून उठून चौधरींसरांनी २ दिवसात लिहिले, लोकसत्तेने ते सत्वर ठळकपणे छापले. देशाला मार्गदर्शक करण्याचा घाऊक ठेका सध्या एकमेव मा. चौधरीसर आणि लोकसत्ता यांच्याकडेच असल्याने हे दोघेही आम्हा पामरांना विचारांचे कुबेर बनविण्याच्या मोहिमेत रात्रंदिन गर्क आहेत.
    या लेखाचा मतितार्थ संपादकांनी लिडमध्ये दिलेला आहे." ज्या देशात विद्यापिठांना आतून आणि बाहेरून राजकारणाने वेढलेले असते, त्या देशात उत्तम शिक्षण वगैरे वल्गना वृथा ठरतात." माझे मराठी विश्वमराठी किंवा विश्वंभर मराठी नसल्याने एक शंका- वल्गना या "सार्थ" आणि "वृथा" अशा दोन्ही प्रकारच्या असतात हे नवेच ज्ञान या लेखामुळे आम्हाला झाले. जर या देशात काहीही दुरूस्त होऊ शकत नाही इतके सडलेले आहे, अशी चौधरीसरांची खात्री झालेली आहे तर मग लेखाचा हा डोंगर पोखरण्याची गरजच काय होती? चौधरीसर आपण जेव्हा विद्यमान राजकीय प्रक्रियेविषयी जनतेत निराशा/तिरस्कार आणि तुच्छतावाद पेरता, तेव्हा पर्यायी राजकारणाचे आपले संकल्पचित्रही आपण दिले पाहिजे ना?
    शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचा एकही पर्यायी कार्यक्रम ज्या लेखात दिलेला नाही त्या चौधरीसरांच्या लेखाचे गुणगान गाणारे त्यांचे मध्यमवर्गीय समर्थक मला पामराला हे सांगतील का, की राजकारणविरहीत शिक्षण जगाच्या कोणत्या विद्यापिठात मिळते? राजकारण हद्दपार करण्याची तुच्छतावादाव्यतिरिक्त कोणती नवी गुरूकिल्ली चौधरीसर आपल्याला देतात? सध्याचे सगळेच वाईट आहे हे सांगायला तुमची गरज नाही. ते बदलायचे कसे त्यावर जरा बोला की.गुणवत्ता सुधारायची कशी यावर जरा प्रकाश टाकाना. काय आहे ते आम्हाला पुरेसे माहित आहे, ते बदलण्याचे संकल्पचित्र जर तुम्हाला देता येत नसेल तर डोंगर पोखरून ऊंदीरही काढता आला नाही असेच म्हणणे भाग आहे मालक.
    दिवाळीच्या दिवसात चौधरीसरांनी उडवलेले लवंगी फटाके पुढीलप्रमाणे....पोटात एक, ओठात दुसरेच असे हे "कावेबाज" लेखन आहे.
  • Yogita Rege दिवाळीच्या दिवसात चौधरीसरांनी उडवलेले लवंगी फटाके पुढीलप्रमाणे....पोटात एक, ओठात दुसरेच असे हे "कावेबाज" लेखन आहे.
    १]जागतिक दर्जाच्या आक्सफर्ड...वगैरे परदेशी विद्यापिठांची गुणवत्ता आजवर टिकून आहे त्याचे एकमेव कारण त्यांना शहरांची नावे आहेत. राष्ट्रपुरूषांची नावे दिली असती तर हा दर्जा नक्कीच घसरला असता.
    २] ज्या जातीचे मतदार देशात आणि राज्यात कमी आहेत त्यातच केवळ नावे देण्याच्या योग्यतेचे गुणवान महापुरूष आहेत.चौधरीसर यातून कोणती "ज्ञानवंत"! जात सुचवित आहेत ते विश्वकुबेरांना बरोबर कळते. बरोबरच आहे सर, " गुरू तो सकळांशी,,,,," जोवर देशात फक्त उच्चवर्णीय {त्र्यवर्णिक} पुरूष तेव्हढे शिकत होते, तोवर गुणवत्ता शाबूत होती. फुले पतीपत्नींनी स्त्रिया आणि बहुजन यांना शिक्षण देण्याचे काम सुरू करून देशाचे वाटोळे केले. ज्यात त्र्यवर्णिकांचे नुकसान तेच देशाचे नुकसान!’.... मास एज्युकेशनमुळे गुणवत्तेची वाट लागली. फुले शाहू आंबेडकर यांच्या या राष्ट्रीय गुन्ह्याबद्दल त्यांना माफ करता येणार नाही. शिवाय त्यांच्या जातींमुळे त्यांची नावे देणे हाही राष्ट्रीय गुन्हाच मानला पाहिजे.
    ३}प्रतिभावंतांची नावे दिल्याने आपल्या राष्ट्रीय प्रतिभेत घाऊक घट होते.
    ४} रेल्वेगाड्या वेळेत धावत नाहीत, रस्तेअपघात कमी होत नाहीत, विमाने वेळेत धावत नाहीत, रोजगार हमीत भ्रष्टाचार होतो, विद्यापिठांची गुणवत्ता घसरतेय याचे एकमेव कारण रेल्वेस्टेशन्स, रस्ते, विमानतळ, विद्यापिठे यांना फुले शाहू आंबेडकरांची नावे दिल्यामुळे...किती अचूक निदान. नावे पुसा, बघा जादू होईल.सगळे कसे जागतिक दर्जाचे होईल...क्या बात है! अ‍ेव्हढा सोप्पा उपाय ज्यांनी सुचवला त्या चौधरीसरांना आपण राष्ट्रीय सलामच करायला हवा.सर, ग्रेट..तुसी ग्रेट हो सर...
    माझी नम्र विनंती आहे की चौधरीसरांना भारतातल्या सगळ्या विद्यापिठांचे कुलपती करा नी बघा कसे रातोरात ते या सर्वांना सुतासारखे सरळ करतात. जगातल्या पहिल्या ३५० विद्यापिठात फक्त भारतीय विद्यापिठे असतील. हार्वर्ड....वगैरेनी यापुधे ३५१ पासून पुढचा विचार करायचा.....
    ५} आम्ही जनताजनार्दनलोक केवळ भोट...चौधरीसर डा.आंबेडकरांच्या नामांतराची आधीच्या लेखात खिल्लीही उडवणार, नी खुलाश्यात मात्र ते त्या नामांतराचे समर्थक होते असेही सांगणार. त्याबद्दल त्यांना "सुलभपणे सुनितीमान" म्हणून गौरविलेही जाणार....जगात नोनकरप्ट कोण याचे प्रमाणपत्र तुम्हीआम्ही यापुढे चौधरीसरांकडून घ्यायचे. गुणवत्ता कशाशी खातात ते आम्ही यांच्याकडून शिकायचे. ज्या लेखात पहिल्या वाक्यापासून केवळ आणि केवळ उपहास आहे, सावित्रीबाई आणि फुले-शाहू-आंबेडकरांची ऎशी की तैशी करण्यात आलीय, "स्वसंरक्षणार्थ" आपला नामांतराला विरोध नाही अशी जाहीर घोषणा ज्या लेखात आहे, तो लेख नामविस्ताराचा आनंद व्यक्त करण्यासाठी लिहिण्यात आला होता, हे ज्या हरी नरकेंना कळले नाही..ते नक्कीच भोट आहेत...नरके तुम्हारा तो चुक्याच!...
  • Vishwambhar Choudhari नरके सर धन्यवाद...माझ्याकडून ही चर्चा मी इथेच थांबवत आहे...
  • Amol Dixit @ Yogita Rege ..... 
  • साक्य नीतीन विश्वंभरांच दिवाळी रॉकेट बुमरॅंग झाल....
    22 hours ago · Unlike · 4
  • Nitin Chate प्रतिक्रियेच्या ताकाला जाऊन प्रतिवादाचे भांडे लपवू नये !!
    20 hours ago via mobile · Unlike · 3
  • Sanjeev Ghorpade मा.डा.चौधरीसर, कात्रज,पुणे येथे मा.अण्णासाहेब हजारे यांच्या मातोश्रींच्या नावाने वसतीगृह आहे. ते नाव दिल्यामुळे दर्जा उंचावला की खालावला?
    नामविस्ताराच्या निर्णयाआधी आपण पुणे विद्यापिठाच्या गुणवत्तेबद्दल काही लिहिले होते का? असल्यास सांगावे. कधी वाचनात
     आले नाही.
    एसपी कालेज, फर्ग्युसन कालेज, बीजे मेडीकल कालेज, आदी महानुभावांची नावे असलेल्या पुण्यातील नामवंत महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेत गफले केल्याबद्दल, किंवा भ्रष्ट आणि गैर कारभार केल्याबद्दल शिक्षण खात्याने त्यांच्यावर गेले ४ महिने कारवाई सुरू केलीय, यावर आपले भाष्य वाचायला मिळाले नाही. त्यांचे वागणे आणि त्यांची नावे यांचा काडीमात्र संबंध अर्थातच नसणार! आपण कधी केलीय यांच्यावर मल्लीनाथी?
    आपले एक भक्त मा.शशांक हळबे म्हणतात, शरद पवारांना जनाधारच नाही. आपल्या आणखी एका भक्ताने दाभोळच्या एनरोन कंपनीच्या रिबेकाबाईंचे पीएस म्हणून आणि मंत्रालयात एका दिवंगत मुख्यमंत्र्यांचे ओएसडी म्हणून लोकांकडे खोकी पोचवण्याची कामे इमानेइतबारे केल्याचे तमाम महाराष्ट्र जाणतो.सर, त्यांनी आता तुम्हाला मदत करावी, शाबासकीची थाप द्यावी, हळबेंना लाइक करावे याचा अर्थ काय घ्यायचा? की यातच सगळे आले?
    18 hours ago · Unlike · 4...................................

      • Kiran Kendre लेखाच्या शेवटी लिहिलेला नामाचा गाजर हा परिच्छेद तर तद्दन मूर्खपणा आहे. संपादकांना पाठविलेल्या फाईल चे नाव जगात कधीच कुणी लेखाला वापरत नाही. हे चोधरीना चांगले माहित असणारच . पण तरी फालतू कोटी करण्याची संधी त्यांनी घेतलीच . याला मराठीत `गरळ `हा चांगला शब्द आहे .
      • Rationalist Rajendra Gadgil he chaudhari yanche vaicharik daridry ani jatyvaad yacha nishedh .
        ................
        • Vishwambhar Choudhari Mee hi post vachli...sadhya me mazya khede gavat aslyane ithe sanganak nahi ani mazya mobile madhye marathi type karaychi soy nahi..me marathi typing chi soy upalabdh hotach pratyek muddyala uttar dein...kinva denyacha prayatn tari karen.. dhanywaad....
        • Shyam Ranjankar पण या संघाच्या विचारसरणीने अनेक नावे घेउन देशात धुमाकुळ घातला आहेच की, आधी हिदु महासभा, नंतर जनसंध नंतर भाजपा, आणी त्याची उप मुखवटे, घातलेली अ भा वि प, आणि ईतर प्रयेक क्षेत्रात सोईस्कर नामकरणकरुन हे लोक वावरता आहेतच की, जरासं खरवडलं की त्यांचं मुळ रुप उघडं पडतं. आता ते सरदार वल्लभ भाइ पटेल यांचं नाव धेउन त्यंच्या पुतळ्याच्या निमीत्ताने पैसे जमा करता करता आपली जात धर्म दाखवत धुमाकुळ घालतील..